SHARE MARKET UPDATE: घसरणीचं सत्र थांबेना, सेन्सेक्स 150 अंकांनी गडगडला; गुंतवणुकदारांत अनिश्चितता

सेसेक्सवर 150 अंकांची घसरण झाली. तर, निफ्टी 17200 अंकांच्या नजीक बंद झाला. आज निफ्टी वर मेटल इंडेक्स (METAL INDEX) 2 टक्क्यांनी घसरला.

SHARE MARKET UPDATE: घसरणीचं सत्र थांबेना, सेन्सेक्स 150 अंकांनी गडगडला; गुंतवणुकदारांत अनिश्चितता
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 4:53 PM

मुंबई- आंतरराष्ट्रीय घडामोडींचा प्रभाव भारतीय शेअर बाजारावर (SHARE MARKET UPDATE) कायम राहिला. आज (सोमवारी) शेअर बाजारात तेजी-घसरणीचं सत्र दिसून आलं. आज दिवसभरात सातत्यपूर्ण कामगिरीच्या अभावामुळे सेंन्सेक्स व निफ्टी मध्ये घसरण नोंदविली गेली. सेसेक्सवर 150 अंकांची घसरण झाली. तर, निफ्टी 17200 अंकांच्या नजीक बंद झाला. आज निफ्टी (NIFTY) वर मेटल इंडेक्स (METAL INDEX) 2 टक्क्यांनी घसरला. पीएसयू बँक, फार्मा आणि रिअल्टी शेयरवर विक्रीचा दबाव कायम राहिला. बँक आणि फायनान्शियल इंडेक्सची निफ्टी वर समाधानकारक कामगिरी राहिली. आज सेन्सेक्स 149 अंकांच्या घसरणीसह 57,683.59 वर बंद झाला. निफ्टी 70 अंक अंकांच्या घसरणीसह 17207 वर पोहोचला. सेन्सेक्स 30 पैकी 21 शेअर वर घसरण झाली.

आजचे वधारणीचे शेअर्स:

• विप्रो(1.48) • इन्फोसिस(1.39) • श्री सिमेंट(1.35) • पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन(1.25) • आयसीआयसीआय बँक(0.74)

आजचे घसरणीचे शेअर्स:

• कोल इंडिया(-3.65) • हिंदाल्को(-3.32) • यूपीएल(-2.87) • ओएनजीसी(-2.68) • अदानी पोर्ट्स (-2.25)

पेटीएमची नीच्चांकी घसरण

आजच्या घसरणीच्या शेअर्समध्ये सन फार्मा (SUNPHARMA), टीसीएस (TCS),आयटीसी (ITC) यांचा समावेश झाला. Paytm (One 97 Communications) शेअर्सचे घसरणीचे सत्र अद्यापही कायम आहे. आज (सोमवारी) कंपनीच्या शेअर्स नीच्चांकी 816 रुपयांच्या भावावर पोहोचला. गेल्या आठवड्यात शुक्रवारी शेअर 833 रुपयांवर बंद झाला होता. पेटीएम शेअर इश्यू प्राईसच्या 62 टक्के आणि लिस्टिंग प्राईसच्या 47 टक्के डिस्काउंट वर ट्रेड करीत आहे.

वाद मिटेना, गुंतवणुकदारना टेन्शन

गेल्या आठवड्याभरात युक्रेन-रशिया वादाचे पडसाद भारतासह आंतरराष्ट्रीय अर्थजगतावर उमटले. रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेल्या निवेदनानंतर वातावरणातील तणाव निवळला होता. पश्चिमी देशांसोबत चर्चेची दारं खुली असल्याचं निवेदन केलं होतं. त्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण नोंदविली गेली. सध्या कच्च्या तेलात 2.55 टक्क्यांची घसरण दिसून आली आणि 94.21 डॉलर प्रति बॅरल वर तेलाचे व्यापार सुरू आहेत. मात्र, पुन्हा एकदा वादानं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांवर अनिश्चिततेचं सावट आहे.

NSE वर ट्रेडिंग बॅन

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर F&O अंतर्गत 3 शेअरमध्ये ट्रेडिंग बॅन राहिली. ट्रेडिंग न झालेल्या शेअर्समध्ये एक्सॉर्ट्स (Escorts), इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स (Indiabulls Housing Finance) आणि पंजाब नॅशनल बँकेचा (Punjab National Bank) समावेश होतो.

इतर बातम्या

Gold rate Today : सोन्याचा दर 50 हजारांच्या खाली! काय आहे आजची किंमत? जाणून घ्या

Shark Tank India: कोण आहेत मालू सिस्टर्स, ज्यांनी पुरुषांच्या ‘हायजिन प्रोडक्ट’वर डील मिळवली ?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.