मला पास करा… विद्यार्थ्याकडून परीक्षकाला लाच देण्याचा प्रयत्न ; उत्तरपत्रिकेत चक्क..

परीक्षेत पास होण्यासाठी नेटाने अभ्यास करणारे विद्यार्थी बरेच असतात. तर काही जण कॉपी करूनही पास होतात. पण एका विद्यार्थ्याने पास होण्यासाठी जी शक्कल लढवली ते पाहून...

मला पास करा... विद्यार्थ्याकडून परीक्षकाला लाच देण्याचा प्रयत्न ; उत्तरपत्रिकेत चक्क..
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Sep 08, 2023 | 4:19 PM

नांदेड | 8 सप्टेंबर 2023 : परीक्षा म्हटलं की भल्याभल्यांना घाम फुटतो. वर्षभर अभ्यास करणारेही परीक्षेचं नाव घेतल्यावर टेन्शनमध्ये येतात. तर अभ्यास न केल्याने अनेक जण पास होण्यासाठी कॉपीचा (copy in exam)मार्ग निवडतात. वेगवेगळ्या परिक्षांमध्ये पास होण्यासाठी हायटेक पद्धतीने कॉपी करण्याचे अनेक प्रकार आजवर समोर आले आहेत. पण एका विद्यार्थ्याने पास होण्यासाठी जो मार्ग निवडला तो पाहून सर्वच थक्क झाले. नांदेडमध्ये एका विद्यार्थ्याने सर्व उत्तर पत्रिकांमध्ये पैशांची नोट (money in answersheet) चिकटवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेत हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्या विद्यार्थ्याने प्रत्येक उत्तर पत्रिकेमध्ये ५०० रुपयांची नोट चिकटवली आहे. एवढेच नव्हे तर ‘मला पास करा’, अशी खुलेआम मागणी त्या विद्यार्थ्याने त्या नोटेच्या बदल्यात केली आहे. पास होण्यासाठी त्याने सरळसरळ लाचच दिली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यावर सर्व जण हैराण झाले आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने कॉपी करणाऱ्या नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर जिल्ह्यातील 1843 विद्यार्थ्यांवर विद्यापीठाने कारवाई केली आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या या गैरकृत्यामुळे विद्यापीठ प्रशासनही चक्रावून गेलं आहे. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणात कॉपीचा वापर यंदा प्रथमच झाल्याचे उघड झाले आहे, असे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या संचालकांनी नमूद केले आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.