मुख्यमंत्रीजी, आम्ही काळजी घेतो, तुम्ही शाळा सुरु करा, पाचवीच्या विद्यार्थ्यानी काय लिहिले पत्रात?

ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेणे शक्य नाही. त्यामुळे पाचवीतील एका विद्यार्थ्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहून शाळा सुरु करण्याची विनंती केली. शाळा बंद असल्यामुळे आमचे नुकसान होत, असेही या पत्रात म्हटले आहे.

मुख्यमंत्रीजी, आम्ही काळजी घेतो, तुम्ही शाळा सुरु करा, पाचवीच्या विद्यार्थ्यानी काय लिहिले पत्रात?
पाचवीच्या विद्यार्थ्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 10:15 AM

मुंबईः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत संसर्ग कमी करण्यासाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण (Online Education) घेणे शक्य नाही. त्यामुळे पाचवीतील एका विद्यार्थ्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनाच पत्र लिहून शाळा सुरु करण्याची विनंती केली. शाळा बंद असल्यामुळे आमचे नुकसान होत, असेही या पत्रात म्हटले आहे.

कोणत्या शाळेच्या विद्यार्थ्याचे पत्र?

सोलापूर येथील केंद्रीय विद्यालय, सेंट्रल रेल्वे या शाळेत पाचवीत शिकणाऱ्या कौस्तुभ प्रभू याने मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले आहे. ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा आहेत, ही व्यथा त्याने पत्रात व्यक्त केली आहे.

काय लिहिलंय पत्रात?

कौस्तुभने पत्रात लिहिलंय, मी कौस्तुभ भूषण प्रभू इयत्ता पाचवीच्या वर्षात केंद्रीय विद्यालय सेंट्रल रेल्वे सोलापूर इथे शिकत आहे. तुम्ही आमच्या आरोग्याच्या काळजीने शाळा प्रत्यक्ष बंद ठेवत आहात. पण ऑनलाइन शिक्षण खेडोपाड्यातील अनेक मुलांना ऑनलाइन सोयीसुविधा अभावी घेणे शक्य होत नाही. ऑनलाइन शिक्षणामुळे गणित व विज्ञानासारखे विषय शिक्षक अनुभवी असले तरी शिकवण्याच्या मर्यादा पडतात. या विषयांचा आमचा शैक्षणिक पाया मजबूत होत नाही. तुम्ही बोलला होता की सरसकट ठिकाणच्या शाळा आधी बंद करणार नाहीत, पण तुम्हीच आता सरसकट शाळा बंद करत आहात, तुम्ही तुमच्या निर्णयावरून असा अचानक मागे का घेत आहात. आम्ही स्वतःच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन परत शाळेत येण्यास उत्सुक आहोत. तुम्ही प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, असे त्याने पत्रात म्हटले आहे.

मेस्टाचेही मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) या संस्थेनेही मुख्यमंत्र्यांना याच संदर्भात पत्र लिहिले आहे. राज्यातील गोरगरीब मुलांकडे ऑनलाइन शिक्षणासाठीची साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे शाळा बंद करू नका, असी मागणी मेस्टा संघटनेने मुख्यमंत्री, शाळेय शिक्षणमंत्री यांना पत्राद्वारे केली आहे.

इतर बातम्या-

सरकारी नोकरी शोधताय? ‘इएसआयसी’त विविध पदांसाठी अर्ज प्रक्रिया, जाणून घ्या स्टेप्स

cold wave | विदर्भात पाऊस, गारपीट आणि नुकसान; थंडीची लाट आजही कायम?

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.