हयातीचा दाखला 31 डिसेंबर पर्यंत सादर करा, अन्यथा पेन्शन बंद; नाशिक कोषागार कार्यालयाचा इशारा
जिल्ह्यातील पेन्शनधारकांनी येत्या 31 डिसेंबर पर्यंत हयातीचे दाखले सादर करावेत. अन्यथा पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यापासून पेन्शन मिळणे बंद होईल, असा इशारा जिल्हा कोषागार कार्यालयाने दिला आहे.
नाशिक: जिल्ह्यातील पेन्शनधारकांनी येत्या 31 डिसेंबर पर्यंत हयातीचे दाखले सादर करावेत. अन्यथा पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यापासून पेन्शन मिळणे बंद होईल, असा इशारा जिल्हा कोषागार कार्यालयाने दिला आहे.
जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय सेवानिवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी या वर्षीच्या हयातीच्या दाखल्यांच्या याद्या जिल्ह्यातील निवृत्ती वेतन अदा करणाऱ्या सर्व बँकांना जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शासकीय निवृत्ती वेतनधारकांनी 31 डिसेंबर 2021 पर्यंत संबंधित बँकांना हयातीचे दाखले सादर करावे, असे आवाहन वरिष्ठ जिल्हा कोषागार अधिकारी, डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी केले आहे.
निवृत्त वेतनधारक ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेत असतील त्यांनी संबंधित बँकेत प्रत्यक्ष हजर राहून यादीतील त्यांचे नाव तपासून स्वाक्षरीच्या रकान्यात शाखा व्यवस्थापकाच्या समोर स्वाक्षरी करावी किंवा अंगठयाचा ठसा उमटवावा. तसेच पुनर्विवाह तसेच पुनर्नियुक्तीबाबत माहिती लागू असल्यास ती ही नोंदवावी. सोबत आपल्या पॅनकार्डची छायांकीत प्रत बँकेत सादर करून आपला दूरध्वनी क्रमांक नोंदवावा. यासोबतच प्रचलित व्यवस्थेव्यतिरिक्त निवृत्ती वेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी ऑनलाईन सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ज्या निवृत्ती वेतनधारकांनी यादीतील त्यांच्या नावासमोर स्वाक्षरी किंवा अंगठयाचा ठसा दिला नसेल किंवा संगणीकृत जीवनप्रमाण दाखला सादर केला नसेल त्यांचे निवृत्ती वेतन जानेवारी 2022 पासून स्थगित करण्यात येईल. त्यामुळे निवृत्ती धारकांनी आपले हयातीचे दाखले बँकामार्फत किंवा ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र सुविधेमार्फत 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये सादर करावेत. तसेच आयकर पात्र निवृत्ती वेतनधारकांनी त्यांचे 2021-22 या आर्थिक वर्षातील नोव्हेंबर 2021 आयकर परिगणना बचतीचे कागदपत्र सादर करावे, असेही वरिष्ठ जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी कळविले आहे.
निवृत्त वेतनधारक ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेत असतील त्यांनी संबंधित बँकेत प्रत्यक्ष हजर राहून यादीतील त्यांचे नाव तपासून स्वाक्षरीच्या रकान्यात शाखा व्यवस्थापकाच्या समोर स्वाक्षरी करावी किंवा अंगठयाचा ठसा उमटवावा. तसेच पुनर्विवाह तसेच पुनर्नियुक्तीबाबत माहिती लागू असल्यास ती ही नोंदवावी. – डॉ. राजेंद्र गाडेकर, वरिष्ठ जिल्हा कोषागार
इतर बातम्याः
भुजबळांनी नांदगावच्या जागेचा नाद सोडावा, राऊतांचा सल्ला; आमदार कांदेंना दिले बळ!
कृषिपंप वीजबिलाच्या थकबाकीत आता 66 टक्के सूट; जळगाव परिमंडळात 82 हजार जणांना लाभ
भुजबळांनी नांदगावच्या जागेचा नाद सोडावा, राऊतांचा सल्ला; आमदार कांदेंना दिले बळ!https://t.co/W9QvudQppB
|#ShivSena|#SanjayRaut|#MLASuhasKande|#ChhaganBhujbal|#NCP|#Nandgaonconstituency
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 24, 2021