माझी लाडकी बहीण योजनेचा अशा महिलांना नाही मिळणार लाभ, अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या
माझी लाडकी बहिण योजनेसाठी महिलांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. अर्ज करण्याची पद्धत एकदम सोपी झाली आहे. शासनाने या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून काही अटी शिथिल केल्या आहेत. पण या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार नाही हे देखील अर्ज करण्याआधी जाणून घ्या.
महाराष्ट्र सरकारने प्रत्येक पात्र महिलांना ‘मुख्यमंत्री लाडली बहीण योजने’ अंतर्गत महिन्याला १५०० रुपये देण्याची घोषणा केली आहे. या योजनेची अंतिम तारीख 31 ऑगस्ट असणार आहे. राज्यातील महिलांना याचा लाभ मिळावा यासाठी 8 जुलैपासून विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात ‘लाडली बहिण योजना’ लागू झाल्यापासून योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. 21 ते 65 वयोगटातील विवाहित महिला, घटस्फोटित, निराधार महिला यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. प्रत्येक कुटुंबातील एकच महिला याचा लाभ घेऊ शकतात.
कोणाला नाही मिळणार लाभ
ज्या कुटुंबांकडे ५ एकरपेक्षा जास्त जमीन आहे तेही या योजनेत सहभागी होऊ शकतात. ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा आउटसोर्स, स्वैच्छिक आणि कंत्राटी कर्मचारी देखील या योजनेसाठी पात्र असतील. ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनांतर्गत 1,500 रुपयांपेक्षा जास्त अनुदान मिळते त्या या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. त्यांनी या योजनेसाठी अर्ज करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज करताना कोणीही घाई करू नये. सरकारच्या नवीन निर्णयांमुळे ही योजना अतिशय सोपी आणि सुलभ झाली आहे. आता पिवळे किंवा केशरी शिधापत्रिकाधारकांना उत्पन्नाच्या पुराव्यासाठी इतर कोणत्याही उत्पन्नाच्या पुराव्याची गरज नाही.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे 15 वर्षे जुने रेशन कार्ड हवे. यासोबतच, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र हा रहिवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. आता अधिवास प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. इतर राज्यातील विवाहित महिलांसाठी त्यांच्या पतीचे जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा रहिवासी प्रमाणपत्र स्वीकारले जाणार आहे.
लाडकी बहिण योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. 8 जुलैपासून जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक गावात शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे. ज्यामध्ये महिलांना अर्ज करता येणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आता खूपच सोपी आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या मध्यस्थीची मदत घेऊ नये. शासनातर्फे शिबीर आयोजित केले जाणार आहेत.