स्वतःच्या घरातील सदस्यांना मंत्री-पंतप्रधान करण्यासाठी विरोधकांना एकत्र करणार का? मुनगंटीवारांचा पवारांना सवाल
भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांनी आपल्या पत्नीला ईडी नोटीस मिळाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेवर सडकून टीका केलीय

चंद्रपूर : भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांनी आपल्या पत्नीला ईडी नोटीस मिळाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेवर सडकून टीका केलीय. नामर्द, नंगा असे शब्द वापरणे हास्यास्पद असल्याचं म्हणत इतका त्रागा का करता? असा सवाल मुनगंटीवार यांनी राऊतांना केला आहे. यावेळी त्यांनी 22 आमदार फोडून सरकार पाडण्याचा आरोपही फेटाळून लावला. ते चंद्रपूरमध्ये बोलत होते.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “खासदार संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेत नामर्द, नंगा अशा पद्धतीचे शब्द वापरणे हास्यास्पद आहे. याआधीही त्यांनी डॉक्टर-कंपाऊंडर यासह यूपीएच्या अध्यक्षपदाबद्दल नाक खुपसून असाच प्रकार केला होता. ईडीचे अधिकारी सुशिक्षित असून त्यांना कशाबद्दल तुम्ही आव्हान देत आहात? राऊत यांना नोटीस मिळाली म्हणून 22 आमदारांचा प्रश्न पुढे आणलाय. 22 आमदार फुटल्यानंतरही हे सरकार पडत नाही हे सत्य आहे. त्यासाठी एवढा त्रागा का करता?”
“आपल्या अग्रलेखातून भारताचे तुकडे होतील असं राऊत कोणाला सांगत आहेत. असे नेते राजकारणात आहेत ही चिंतेची बाब आहे,” असंही मुनगंटीवार म्हणाले.
“स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना खासदार-आमदार-मंत्री-पंतप्रधान करण्यासाठी एकत्र येणार का?”
शरद पवार यांनी विरोधकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे का असा प्रश्न विचारल्यानंतर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “शरद पवारांनी विरोधी पक्षांची मोट बांधावी. मात्र, त्यात एक समान विचार हवा. फक्त सत्तेसाठी तुम्ही एकत्र येणार का? स्वतःच्या परिवारातील सदस्यांना खासदार-आमदार-मंत्री-पंतप्रधान करण्यासाठी एकत्र येणार का? अशा पद्धतीने जनतेच्या प्रश्नांना न्याय कसा देता येईल? हा स्वार्थ आहे.”
हेही वाचा :
“शरद पवार मुख्यमंत्री व्हावेत, संजय राऊतांनी त्यासाठी आग्रह करावा”
मॅरेथॉन बैठक लावायला तयार, फडणवीसांना स्वतः भेटून सांगेन : सुधीर मुनगंटीवार
मला पाडून दाखवा, मुनगंटीवारांना अजित पवारांचं थेट चॅलेंज
व्हिडीओ पाहा :
Sudhir Mungantiwar criticize Sanjay Raut and Sharad Pawar