Sudhir Mungantiwar : आम्ही बॅक डोअर एन्ट्री करत नाही, राष्ट्रपती राजवटीच्या आरोपावर मुनगंटीवारांचं जोरदार प्रत्युत्तर

संविधानाचा सन्मान टिकवण्याऐवजी संविधान आणि लोकशाहीला बोट लागेल अशी कृती होते. मात्र जो वाईट कृती करतो त्याला संविधानाच्या शक्तीच्या आधारावर सर्व भोगाव लागतं असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी म्हटलंय.

Sudhir Mungantiwar : आम्ही बॅक डोअर एन्ट्री करत नाही, राष्ट्रपती राजवटीच्या आरोपावर मुनगंटीवारांचं जोरदार प्रत्युत्तर
सुधीर मुनगंटीवार Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 9:44 PM

शिर्डी : राज्यात सध्या पुन्हा मोठा राजकीय (Bjp Vs Shivsena) वाद सुरू झालं आहे. राज्यात सध्या सुडनाट्य , गुंडाराज सुरू आहे. संविधानाचा सन्मान टिकवण्याऐवजी संविधान आणि लोकशाहीला बोट लागेल अशी कृती होते. मात्र जो वाईट कृती करतो त्याला संविधानाच्या शक्तीच्या आधारावर सर्व भोगाव लागतं असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी म्हटलंय. ते शिर्डीत बोलत होते, कार्यकर्मानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ‌ठाकरे सरकारवर (Cm Uddhav Thackeray) सडकून टिका केली आहे. या राज्यात भाजपच्या अनेक नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले.बेईमानाच्या आधारावर जन्माला आलेल ‌सरकार आपल्या बेईमानीचा पिच्छा सोडायला तयार नाही. त्यावेळी छगन भुजबळांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली. आणि भुजबळांना व्याजासकट अडीच वर्ष जेल मध्ये जावं लागलं. शेवटी नियती आपलं व्याज वापस करते असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त करत ठाकरे सरकारला सूचक इशारा दिलाय.

राष्ट्रपती राजवटीबाबत काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलय कधीही बॅक डोअर एंट्री करू नका. मोदी देखील राज्यसभेतून येऊ शकले असते, मात्र ते जनतेतून निवडून आले. बॅक डोअर एंट्री करणाऱ्यांना फक्त षडयंत्री राजकारण समजत.जनतेतून निवडून न आल्याने जनतेच्या‌ समस्या त्यांचे प्रश्न काय ? लोकहीत काय यापेक्षा फक्त स्वार्थाचा बाजार कसा करायचा हे त्यांना समजत.हे दुर्देवी आहे. भारतीय जनता पार्टी राष्ट्रपती राजवट लावेल असे त्यांना वाटत असेल मात्र भाजप दुसऱ्या मार्गाने राष्ट्रपती राजवट लावणार नाही असे मुनगंटीवार यांनी ठामपणे सांगीतलं.

सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत काय म्हणाले?

वंदे मातरम , भारत माता तसेच पंतप्रधानांसंदर्भात अपशब्द वापरणे हा राजद्रोह नाही. मात्र हनुमान चालिसाचे पठण करणे हा राजद्रोह ठरत आहे.कसे हिंदुत्व वादी बेगडी आहे. ते या उदाहरणावरून दिसत असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. तुम्ही हनुमान चालिसा म्हणणार असाल तर हे देशातील सर्वात अपवित्र कार्य , हा राजद्रोह परंतु वंदे मातरम , भारत माता की जय न म्हणणारे हे तर मांडीवर बसले पाहिजेत. यांच्याच मतावर सत्तेचं दुकान चालतं.परिवारात पात्रता नसताना मोठ्या पदावर ‌जाता येत.ज्यांना वाईट कृती करायची त्यांनी करावी. न्यायपालिकेवर आम्हाला विश्वास असून अपिलात राणा दांम्प्त्याचा विजय नक्की होईल असं माझ मत आहे, असेही ते म्हणाले आहेत.

तसेच संजय राऊतांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. कधी कधी वाटतं त्यांचाच शिवसेनेवर काही राग असेल , शिवसेना संपवण्याचा विडा त्यांनी उचलला असेल. राहुल गांधीनी मात्र काँग्रेस संपण्याचा निश्चित तो संकल्प केलाय. 20 राज्यात कॉग्रेस नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते ज्या दिवशी आम्ही काँग्रेस सोबत जावू त्या दिवशी शिवसनेच दुकान मी बंद करेल.ते स्वप्न संजय राऊंतांना कदाचित पुर्ण करायचे असेल. साईचरणी एवढीच प्रार्थना करेल की ते स्वप्न राऊतांचे हस्ते पुर्ण होईल असा मिश्किल टोला मुनगंटीवार यांनी संजय राऊतांना लगावलाय.

Amruta Fadnavis : “उद्वस्थ ठ_ _ ने कुठे नेवुन ठेवला आहे महाराष्ट्र आमचा? बायकोच्या भावाच्या ताब्यात?” अमृता फडणवीसांचा पुन्हा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Solar Energy : विकास निधीतून ५ % निधी खर्च करून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सौर ऊर्जेवर आणणार : पालकमंत्री यशोमती ठाकूर

Shalini Thackeray : थप्पड मारने से डर नहीं लगता साहब ,पर हनुमान चालीसा से लगता हैं! शालीनी ठाकरे यांनी पुन्हा सेनेला डिवचलं

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....