लोकशाही मार्गाने सत्तेत येऊ शकत नसल्यानेच हिंसेला बळ; मुनगंटीवारांची विरोधकांवर टीका
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. (Sudhir Mungantiwar Slams Shiv Sena, Congress, NCP Over Farmer Protests)
नागपूर: दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या आंदोलानावरून विरोधकांना लक्ष्य केलं आहे. लोकशाही मार्गाने सत्तेवर येऊ शकत नसल्याने काही ढोंगी नेते हिंसेला बळ देत आहेत, असा आरोप सुधीर मुनंगटीवार यांनी केला आहे. (Sudhir Mungantiwar Slams Shiv Sena, Congress, NCP Over Farmer Protests)
सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा आरोप केला आहे. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या नावाने हिंस होत आहे. शेतकऱ्यांची भूमिका केंद्र आणि सुप्रीम कोर्टानेही मान्य केली आहे. त्यानंतर होणारी हिंसा हे मोठे षडयंत्र आहे. लोकशाही मार्गाने सत्तेवर येऊ शकत नसल्याने काही ढोंगी नेतृत्व हिंसेला बळ देत आहेत. हा भारतीय संविधानाचा अवमान आहे. त्यामुळे या घटनेची न्यायालयीन चौकशी जालीच पाहिजे. तिरंग्याचा अवमान करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी मुनंटीवार यांनी केली.
आंदोलक दहशतवाद माजवत आहेत
रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही या आंदोलनावरून विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. काही मंडळीं या आंदोलनाच्या माध्यमातून रक्तपात कसा होईल आणि दिल्लीच्या तख्ताकडे जाण्याचा मार्ग कसा सुकर होईल यादृष्टीने प्रयत्न करत आहेत, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे. ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये बोलत होते. दिल्लीतील आंदोलनकर्ते सरकारशी चर्चाही करत नाहीत. न्यायालयाचेही ऐकत नाहीत. केवळ कायदेच रद्द करा अशी मागणी धरून बसलेत. शेतीक्षेत्र मुक्त होता कामा नये. देशातील शेतकरी गुलामच राहिला पाहिजे. सरकारच्या हस्तक्षेपातच शेती व्यवसाय चालला पाहिजे, अशी हटवादी भूमिका आंदोलक घेऊन बसले आहेत, असे खोत म्हणाले. आंदोलनकर्त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काही घेणेदेणे नाही. हे आंदोलक दहशतवाद माजवत आहेत असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
शिवसेना अहंकाराची भाषा करतेय
भाजपचे आमदार राम कदम यांनीही शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. शिवसेनेचे नेते गोंधळलेले आहेत. काल आझाद मैदानावरील बॅनरवर शिवसेनेचं नाव होतं. पण आंदोलक मोर्चात सहभागी झाले नाहीत. आजच्या हिंसाचाराचं कुणीही समर्थन करू शकत नाही. पण ही आरोप-प्रत्यारोप करण्याची वेळ नाही तर शेतकऱ्यांना सावरण्याची वेळ आहे पण याचं भान शिवसेनेच्या नेत्यांना नाही. ते आता अहंकाराची भाषा करताहेत, अशी टीका राम कदम यांनी केली आहे. (Sudhir Mungantiwar Slams Shiv Sena, Congress, NCP Over Farmer Protests)
संबंधित बातम्या:
पंजाबला अस्वस्थतेकडे नेण्याचं पातक करू नका; पवारांचं केंद्र सरकारला आवाहन
Delhi Farmers Tractor Rally | केंद्राने अजूनही शहाणपणा दाखवावा, टोकाची भूमिका घेऊ नये : शरद पवार
गुप्तचर यंत्रणेने माहिती देऊनही गृहखात्याने दखल घेतली नाही; शरद पवारांचा अमित शाहांवर निशाणा
(Sudhir Mungantiwar Slams Shiv Sena, Congress, NCP Over Farmer Protests)