“हारकर जितने वाले को बाजीगर कहते है”… सुनेत्रा पवार यांच्या बॅनरच्या माध्यमातून कोणावर निशाणा

बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचे भावी केंद्रीय मंत्री म्हणून बॅनर लागले. सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. श्रीकांत जाधव मित्र परिवाराच्या वतीने बारामती शहरात भावी केंद्रीय मंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचे बॅनर लावले आहे.

हारकर जितने वाले को बाजीगर कहते है... सुनेत्रा पवार यांच्या बॅनरच्या माध्यमातून कोणावर निशाणा
पुणे शहरात लागलेले बॅनर
Follow us
| Updated on: Jun 15, 2024 | 8:41 AM

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आहे. परंतु या निवडणुकीचे पडसाद अजून उमटत आहे. देशात सर्वाधिक लक्षवेधी बारामती लोकसभा मतदार संघातील लढत ठरली होती. पवार कुटुंबातच ही लढत होती. एकीकडे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे होत्या तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार होत्या. या लढतीत सुप्रिया सुळे यांनीच बाजी मारली. सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेवर पाठवले. त्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीच्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे. त्यामुळे सर्वत्र सुनेत्रा पवार यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागले आहे. परंतु पुण्यामध्ये असलेल्या कात्रज चौकामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे लावलेल्या बॅनरची चर्चा रंगली आहे. “हारकर जितने वाले को बाजीगर कहते है”, असे वाक्य लिहून सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. यामुळे रिपाइंने कोणावर निशाणा साधला आहे, त्यावर राजकीय चर्चा सुरु झाली आहे.

काय आहे बॅनर्सवर

पुणे शहरात बॅनरबाजी गाजत असते. भावी खासदार, भावी आमदार असे बॅनर पुण्यात लागले. विधान सभा पोटनिवडणुकीत “आमचेही ठरले धडा शिकवायाचा”, असे बॅनर लागले होते. त्यानंतर भाजप उमेदवार भाजपच्या गडात पराभूत झाले होते. आता पुन्हा कात्रज चौकामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे लावलेल्या बॅनरची चर्चा शनिवारी रंगली आहे. रिपाइंच्या सचिन खरात गटातर्फे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल बॅनर लावले आहे. त्यावर “हारकर जितने वाले को बाजीगर कहते है” असा उल्लेख करण्यात आलेला आहे. या बॅनर्सवर सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. सचिन खरात आणि राजाभाऊ कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावर अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो आहे.

बारामती सुनेत्रा पवार यांचे लागलेले बॅनर

बारामतीमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून बॅनर

बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचे भावी केंद्रीय मंत्री म्हणून बॅनर लागले. सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. श्रीकांत जाधव मित्र परिवाराच्या वतीने बारामती शहरात भावी केंद्रीय मंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचे बॅनर लावले आहे.

हे सुद्धा वाचा

मंत्रीपदावर सुनेत्रा पवार म्हणाल्या…

सुनेत्रा पवार यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, बारामतीत लोकसभा मतदार संघात फिरत असताना मला अनेक समस्या जाणवल्या आहेत. त्या सोडवण्यास आता प्राधान्य देणार आहे. केंद्रीय मंत्रीपदाच्या प्रश्नावर सुनेत्रा पवार यांनी थेट उत्तर दिले. संधी मिळाली तर त्याचे सोने करणार, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभेतील पराभवावर बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, जनतेचा कौल मला मान्य आहे. आम्ही आत्मपरीक्षण करत आहोत. पराभवाच्या कारणांवर विचार मंथन करत आहोत. काय घडले त्याचा विचार करून पुढची वाटचाल करू.

हे ही वाचा

पुण्याची राजकीय पॉवर, पुण्याला सात खासदारानंतर केंद्रात वजन वाढणार, एकाच परिवारात तीन खासदार

Non Stop LIVE Update
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय.
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना...
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना....
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी.
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत.
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी....
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी.....
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर.
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय.
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन.
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा.
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी.