सुनेत्रा पवार यांना खासदारकी दिल्यावर पवार कुटुंबियांत घरणेशाही झाली का? छगन भुजबळ काय म्हणाले…

chhagan bhujbal: लोकसभा निवडणुकीत ४०० पारची घोषणा म्हणजे धोका ठरला आहे, असे आपण सांगितले होते.  आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते सांगत आहे. या घोषणेमुळे दलित समाज, आदिवासी समाज नाराज झाला. त्यामुळे संविधान बदलणार असल्याची चर्चा सुरु झाली होती.

सुनेत्रा पवार यांना खासदारकी दिल्यावर पवार कुटुंबियांत घरणेशाही झाली का? छगन भुजबळ काय म्हणाले...
chagan bhujbal
Follow us
| Updated on: Jun 14, 2024 | 9:42 AM

राज्यसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेमधील नाराजीनाट्य समोर आले आहे. खासदार होण्यासाठी इच्छूक असलेले छगन भुजबळ पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. त्यावर माध्यमांसमोर बोलताना आपण नाराज नसल्याचे ते सांगत आहेत. परंतु सर्वच गोष्टी मनासारख्या होत नाही. काही वेळा तडजोडी कराव्या लागतात, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांना तिकीट देणे म्हणजे घराणेशाही नाही का? या प्रश्नावर एका शब्दात उत्तर दिले.

काय म्हणाले छगन भुजबळ

लोकसभा लढवण्यास मी तयार झालो होतो. मला दिल्लीतून निवडणूक लढवण्याचा संदेश मिळाला होता. त्यानंतर मी तयारी सुरु केली होती. परंतु एक महिना झाल्यानंतर उमेदवारी जाहीर केली गेली नाही. यामुळे मी थांबण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे स्पर्धक उमेदवार एका महिन्यापासून कामाला लागले होते. नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार अर्ज भरण्याच्या एका दिवशीपूर्वी जाहीर झाला. त्या सर्वांचे परिणाम जय पराजय झाला, असे स्पष्टपणे छगन भुजबळ यांनी सांगितले.

ही घराणेशाही नाही का?

राज्यसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही? यामुळे तुम्ही नाराज नाही का? त्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटले की, मला राजकारणात ५७ वर्ष झाले आहेत. अनेकवेळा आपणास वाटते की असे झाले पाहिजे झाले. परंतु नेहमी मनासारखे होते नाही. तुम्हाला तडजोडी कराव्या लागतात. त्यानंतर छगन भुजबळ यांनी दोन्ही वेळीस तुमच्यावर अन्याय का झाला? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “त्याचे उत्तर त्यांना विचारा”. पवार कुटुंबात दोन्ही पदे गेली आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कधी न्याय मिळणार आहे? त्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी “नेक्स्ट” असे उत्तर दिले.

हे सुद्धा वाचा

लोकसभा निवडणुकीत ४०० पारची घोषणा म्हणजे धोका ठरला आहे, असे आपण सांगितले होते.  आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते सांगत आहे. या घोषणेमुळे दलित समाज, आदिवासी समाज नाराज झाला. त्यामुळे संविधान बदलणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. तसेच आता लोकसभा निवडणुकीत कमी जागा मिळाल्यानंतर संघाकडून नाराजी व्यक्त होत आहे. संघाचे नाराज होणे स्वाभाविक आहे. त्याचे विश्लेषण संघाकडून केले गेले आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.