‘संजय राऊत यांच्या कानशीलात लगावल्याशिवाय गप्प बसणार नाही’, संतोष बांगर यांच्या टीकेवर सुनील राऊत म्हणतात…

"संतोष बांगर यांच्या तोंडी या गोष्टी शोभत नाहीत. निवडणूक लागू दे, शिवसैनिक या निवडणुकीत संतोष बांगरला ठेचून काढतील हे लक्षात घ्या", असं प्रत्युत्तर सुनील राऊत यांनी दिलं.

'संजय राऊत यांच्या कानशीलात लगावल्याशिवाय गप्प बसणार नाही', संतोष बांगर यांच्या टीकेवर सुनील राऊत म्हणतात...
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 4:23 PM

गिरीश गायकवाड, नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. “संजय राऊत यांच्या कानशीलात वाजवल्याशिवाय गप्प बसणार नाही”, अशी खोचक टीका संतोष बांगर यांनी केली होती. तसेच संतोष बांगर यांच्याकडून राऊतांचा पिसाळलेला कुत्रा असा उल्लेख करण्यात आला. त्यांच्या या टीकेवर संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. “संतोष बांगर यांना बघून घेऊ”, असं सुनील राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे राऊत आणि बांगर यांच्यात आगामी काळात संघर्ष वाढण्याची चिन्हं आहेत.

संजय राऊत यांनी आज NIT भूखंड घोटाळ्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती. ही टीका करत असताना त्यांनी मांजर-बोका असा उल्लेख केला होता. त्यानंतर आता संतोष बांगर यांची टीका समोर येतेय. संतोष बांगर यांच्या टीकेला संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय.

हे सुद्धा वाचा

“आम्ही वांरवार मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतोय. अनिल देशमुखांना जो कायदा लावला होता, ज्यावेळी देशमुखांवर आरोप लावले त्यावेळी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आमचीसुद्धा अशीच मागणी आहे की, जोपर्यंत एकनाथ शिंदे यांना न्यायालयाकडून क्लीन चीट मिळत नाही तोपर्यंत त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. आमदार म्हणून काम करावं”, असं सुनील राऊत म्हणाले.

“संतोष बांगर यांच्या तोंडी या गोष्टी शोभत नाहीत. निवडणूक लागू दे, शिवसैनिक या निवडणुकीत संतोष बांगरला ठेचून काढतील हे लक्षात घ्या”, असं प्रत्युत्तर सुनील राऊत यांनी दिलं.

“संतोष बांगर यांनी ठेचण्याच्या गोष्टी करु नये, शिवसैनिक काही मजोर नाही. त्यामुळे आम्ही पाहून घेऊ”, असंदेखील आव्हान सुनील राऊत यांनी बांगर यांना दिलं.

“जो संजय राऊत भाजपला न जुमानता, न घाबरता काम करतोय, संजय राऊत म्हणजे संतोष बांगर नव्हे, की नुसती ईडी आणि सीडीच्या नोटीस गेल्यानंतर भाजपखाली लोटांगण घातलं. संजय राऊत न झुकता जेलमध्ये गेले. ते साडेतीन महिने जेलमध्ये राहीले. पण ते झुकले नाहीत”, असं सुनील राऊत म्हणाले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.