शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? सुनील तटकरे म्हणतात…

मुंबईच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली (CM Uddhav Thackeray and Sharad Pawar meet).

शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? सुनील तटकरे म्हणतात...
Follow us
| Updated on: Jun 11, 2020 | 5:16 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवस कोकणातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर आज (11 जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली (CM Uddhav Thackeray and Sharad Pawar meet). मुंबईच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी प्रसारमाध्यांना माहिती दिली (CM Uddhav Thackeray and Sharad Pawar meet).

“कोकणात कोणत्या भागात किती नुकसान झालं आहे, याची सखोल माहिती शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली”, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं.

“नुकसानग्रस्तांसाठी राज्य सरकारने काही चांगले निर्णय घेतले आहेत. अजूनही काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्या सर्व गोष्टींवर बैठकीत चर्चा झाली. येत्या चार ते पाच दिवसात नुकसानग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून अतिशय सकारात्मक निर्णय घेतले जातील. या निर्णयांमुळे उद्ध्वस्त झालेल्या कोकणवासीयांना निश्चित न्याय मिळेल, असा विश्वास आहे”, असं सुनील तटकरे म्हणाले.

कोकणात पर्यटन हा व्यवसाय गेल्या तीन महिन्यांपासून बंद झाला होता. त्यामुळे पर्यटनाला कशी चालता देता येईल, मत्य व्यवसाय, छोटे-मोठे उद्योगधंद्यांना कसा आधार देता येईल, फळबाग पुनर्जीवित कशा करता येतील, या सर्व गोष्टींवर बैठकीत अतिशय सखोलपणाने चर्चा झाली, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं.

“वीज पुरवठा तातडीने कसा सुरु होईल, याबाबत बैठकीत चर्चा झाली. कारण वीज पुरवठा सुरु झाल्यावर पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल. काही ठिकाणी आम्ही जनरेटर दिले आहेत. परंतु, सगळ्याच ठिकाणी ते देणं शक्य नाही. त्यामुळे सर्वाधिक मनुष्यबळ लावून युद्ध पातळीवर विद्युत पुरवठा सुरु करावा याबाबत चर्चा झाली”, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.

“नुकसानग्रस्त भागांचे 50 टक्क्यांपेक्षा जास्त पंचनामे पूर्ण झाले आहेत. पालकमंत्री आदिती तटकरे, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत आणि मी स्वत: नुकसानग्रस्त भागात फिरत आहोत. मुल्यांकन करत असताना झाडांचं देखील मुल्यांकन करावं, ही भूमिका आम्ही घेतली आहे. तसेच नुकसानग्रस्तांसाठी शासकीय मदत जाहीर केली जाईल”, असं सुनील तटकरे म्हणाले.

दरम्यान, “शरद पवार यांनी कोकण दौऱ्यादरम्यान नुकसानग्रस्त नागरिकांना धीर दिला. पवार यांच्या धीरामुळे आपण पुन्हा उभं राहू शकतो, असा आत्मविश्वास सर्वसामान्य नागरिकाच्या मनात जागृत झाला आहे”, असंदेखील सुनील तटकरे म्हणाले.

संबंधित बातम्या :

शरद पवारांचा झंझावाती कोकण दौरा, नुकसानग्रस्तांना थेट बांधावर जाऊन धीर

समुद्राशी संबंध नसलेल्या फडणवीसांच्या ज्ञानात भर पडेल, कोकण दौऱ्यावरुन पवारांचा टोला

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.