सुनील तटकरे यांची सर्वात मोठी कारवाई, ‘त्या’ 8 नेत्यांना थेट बाहेरचा रस्ता

राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील घटक पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करुन पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी 8 नेत्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

सुनील तटकरे यांची सर्वात मोठी कारवाई, 'त्या' 8 नेत्यांना थेट बाहेरचा रस्ता
अजित पवार आणि सुनील तटकरे
Follow us
| Updated on: Nov 08, 2024 | 6:19 PM

राज्यभरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीत महायुतीत अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचं बघायला मिळालं. महायुतीच्या घटकपक्षांनी ही बंडखोरी रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. बंडखोरांचे बंड थोपवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. पण असं असतानाही काही ठिकाणी बंडखोरांनी आपली भूमिका बदलली नाही. त्यामुळे त्याचा फटका महायुतीच्या उमेदवारांनादेखील बसण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेकडून याअगोदर बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या पक्षाच्या 8 नेत्यांना पक्षातून निलंबित केलं आहे. सुनील तटकरे यांच्या कार्यालयाकडून याबाबत अधिकृतपणे परिपत्रक जारी करत माहिती देण्यात आली आहे.

‘या’ 8 पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे, अकोला ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार, नांदेड महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती पुजा व्यवहारे, धुळ्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे, दहिसर तालुकाध्यक्षा श्रीमती ममता शर्मा, तुमसर (भंडारा) तालुकाध्यक्ष धनेंद्र तुरकर, युवक प्रदेश सचिव आनंद सिंधीकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या सर्वांना निलंबित केलं आहे.

“या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीतील घटक पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात नामांकन पत्र भरून पक्षविरोधी भूमिका घेतलेली आहे. तसेच महायुती सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे कृत्य जाणीवपूर्वक करून पक्षशिस्तभंग केला असल्यामुळे सदर पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून निलंबित करण्यात येत आहे”, असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

महायुतीला मविआचं कडवं आव्हान

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाविकास आघाडीचं कडवं आव्हान बघायला मिळत आहे. महायुतीकडून लाडकी बहीण योजनेचा दाखल दिला जात होता. यानंतर मविआने आपल्या वचननाम्यात महालक्ष्मी योजना आणण्याची घोषणा केली. या योजनेतून आपलं सरकार आल्यास प्रत्येक महिलेला महिन्याला 3 हजार देऊ, असं मविआने जाहीर केलं. तसेच बेरोजगारांना दर महिन्याला 4 हजार रुपये घरबसल्या देणार, असल्याचं मविआने जाहीर केलंय. याशिवाय शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचं आश्वासन मविआने दिलं आहे. दुसरीकडे महायुतीत बंडखोरी होत आहे. त्यामुळे महायुतीला मविआचं आता कडवं आव्हान असणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.