Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : सिंधुदुर्गात पोलीस अधीक्षकांनी हाकला शर्यतीचा बैलगाडा, कोकणातल्या पहिल्या शर्यतीत धुरळा

अतिरिक्त पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांना चक्क त्यांनी गाडीवर स्वार होत बैलांचा कासरा हातात घेऊन शर्यतीच्या ट्रॅकवरून बैलगाडी हाकली.

Video : सिंधुदुर्गात पोलीस अधीक्षकांनी हाकला शर्यतीचा बैलगाडा, कोकणातल्या पहिल्या शर्यतीत धुरळा
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 5:48 PM

सिंधुदुर्ग : शर्थीच्या प्रयत्नानंतर बैलागाडा शर्यतीला मान्यता मिळाल्यानंतर आज सिंधुदुर्गातील वैभववाडी येथे कोकणातील पहिली बैलगाडा शर्यत संपन्न झाली. कोकणातील ही पहिलीच बैलगाडा शर्यत असल्यामुळे प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली होती. ही शर्यत शासनाच्या नियमांच्या अधीन राहून पार पडत असल्यामुळे पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त होता. यावेळी बंदोबस्तावर असलेले अतिरिक्त पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांना बैलगाडी पाहून मोह आवरता आला नाही. बैलगाडा शर्यतीचे नुसते नाव जरी काढले तरी अनेकांच्या अंगात संचार अवतरतो, खाकीतल्या या बैलगाडाप्रेमी पोलीस अधिकाऱ्याचेही असेच काही झाले.

पोलीस अधिकाऱ्याच्या हातात कासरा

अतिरिक्त पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांना चक्क त्यांनी गाडीवर स्वार होत बैलांचा कासरा हातात घेऊन शर्यतीच्या ट्रॅकवरून बैलगाडी हाकली. मूळ हिंगोली येथील बगाटे हे शेतकरी कुटुंबातील असून लहानपणी अशा बैलगाडा शर्यती पाहिल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे बैलगाडीत स्वार होण्याचा मोह आवरला नाही असं बगाटे साहेब म्हणाले. शेवटी शेतकऱ्यांची पोरं आणि बैल यांचा जिव्हाळाच वेगळा असतो. आपल्या दारातल्या सर्जाराजाला शेतकऱ्यांची पोरं जीवापाड जपतात. बैलगाडा शर्यत ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कण मानली जाते. शर्यतीसाठी शेतकरी बैलांना कित्येक दिवस ट्रेनिंग देत असतात, बैलांच्या खुराकाची काळजी घेत असतात, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पोराला बैलगाडी समोर दिसली की, कासरा हातात घ्यायचा मोह आवरत नाही.

वर्दीतलं बैलगाडा प्रेम

कर्तव्याप्रती पोलीस बंदोबस्तावर जरी असले तरी अशा वेळी अंगातलं सळसळत शेतकऱ्याचे रक्त दम धरत नाही, त्यामुळेच अधीक्षकांनीही थेट कासरा हातात घेतला, ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतीवर लोकांचे प्रचंड प्रेम आहे, त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर बऱ्याच प्रयत्नानंतर सुप्रीम कोर्टाने शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली, त्यामुळे पुन्हा बैलगाडीची चाकं सुसाट सुटली आहे, पुन्हा धुरळा उडू लागला आहे.

Nigeria : क्रूरतेचा कळस! अंदाधुंद गोळीबारात 200 ठार, दिसेल त्याच्यावर निशाणा का लावला नराधमांनी?

Corona : अशी ओळखा डेल्टा, ओमिक्रॉनची लक्षणे; लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा

गिरीश महाजनांच्या अडचणी वाढणार? पुणे पोलिसांचं पथक तपासासाठी जळगावात! नेमकं प्रकरण काय?

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.