सुप्रीम कोर्टाकडून धुळे जिल्हा परिषदेतील 15 ओबीसी सदस्यांचं पद रद्द, भाजपला सर्वाधिक फटका सत्ता टिकवण्याचं आव्हान
15 जागांची नव्याने निवडणूक होणार असून त्यात महाविकास आघाडीचा विजय होणार असल्याचा दावा विरोधी पक्षनेते पोपट सोनवणे यांनी केला. ( )
धुळे: धुळे जिल्हा परिषदेतील नियमबाह्य ओबीसी आरक्षणावर निवडून आलेल्या 15 भाजपाच्या सदस्यांचे पद रद्द होणार आहे. सुप्रीम कोर्टाने तसा आदेश दिल्याची माहिती विरोधी पक्षनेते पोपट सोनवणे यांनी दिली आहे. तसेच लवकरच त्या 15 जागांची नव्याने निवडणूक होणार असून त्यात महाविकास आघाडीचा विजय होणार असल्याचा दावा विरोधी पक्षनेते पोपट सोनवणे यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका भाजपला बसणार असून धुळे जिल्हा परिषदेतील सत्ता गमावण्याची वेळ भाजपवर येईल, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. (Supreme Court cancelled OBC reservation in Dhule ZP can BJP lost his power in ZP)
सुप्रीम कोर्टाचे नवीन आरक्षण काढण्याचे आदेश
ओबीसीच्या जागा रद्द करण्या संदर्भात सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादीचे नेते किरन पाटील यांनी याचिका दाखल केली होती. त्या याचिकेचा निकाल किरण पाटील यांच्या बाजूने लागला असून कोर्टाने नवीन आरक्षण काढण्याचे आदेश दिले आहेत. दोन आठवड्यात त्याची प्रक्रिया होणार आहे. या निकालामुळे भाजपच्या दिग्गज नेत्यांना फटका बसणार असून जिल्हा परिषदेतील सत्तेचे गणित बदलणार काय? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असणार आहे.
धुळे जिल्हा परिषदेत 73 टक्के जागा आरक्षित
भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार आरक्षण हे 50% च्या खाली असायला हवे मात्र धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये 73 टक्के जागा आरक्षित होत्या. तर महाराष्ट्रात ओबीसी जनगणना झाली नसताना कोणत्या निकषांच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत 27 टक्के आरक्षण जाहीर करण्यात आलं, असा सवाल देखील विरोधी पक्ष नेते पोपटराव सोनवणे यांनी केला आहे.
भाजपचे बहुमत घटणार का?
धुळे जिल्हा परिषदेच्या एकूण 56 जागांपैकी भाजपने 39 जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळविले होते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी प्रवर्गातील 15 जिल्हा परिषद गटांवर नव्याने निवडणूक होणार असल्याने भाजपचे बहुमत घटणार की भाजप पुन्हा सत्तेत राहणार हे लवकरच कळेल, याबाबत जिल्हाभरात उत्सुकता वाढली आहे.
धुळे जिल्हा परिषद निवडणुकीला एक वर्ष पूर्ण
धुळे जिल्हा परिषदेच्या 56 जागांची निवडणूक जानेवारी 2020 मध्ये पार पडली होती. यामध्ये 39 जागांवर भाजपने आपला शिक्कामोर्तब केलं होते. काँग्रेसने 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 3 जागा तर शिवसेनेने 4 जागा मिळविल्या आहेत. याशिवाय अपक्ष 3 उमेदवार यात विजयी झाले आहेत. जिल्हा परिषदेत सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपकडे 29 सदस्य असणं आवश्यक आहे.
धुळे जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल
जिल्हा परिषद एकूण जागा -56
जाहीर झालेला निकाल-56
राष्ट्रवादी 03 भाजपा -39 काँग्रेस -07 शिवसेना -04 अपक्ष 03
पाच जिल्हा परिषदेतील ‘ओबीसी’च्या जागा कमी होणार, विद्यमान सदस्याचेही सदस्यत्व रद्द होणार?https://t.co/jOReIZvv41#ZP #zilhaParishad
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 4, 2021
संबंधित बातम्या:
धुळे ZP निकाल : धुळ्यात भाजपची एकहाती सत्ता, महाविकासआघाडीचा पराभव
(Supreme Court cancelled OBC reservation in Dhule ZP can BJP lost his power in ZP)