BIG BREAKING | सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं वाचन सर्वसामान्यांना टीव्हीवर लाईव्ह पाहता येणार

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाचं उद्या कोर्टातून लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. जनतेला हा निकाल लाईव्ह पाहता येणार आहे. अतिशय ऐतिहासिक असा हा निकाल असेल. त्यामुळे जनतेला कोर्टाचा निकाल थेट कोर्टातून पाहता येणार आहे.

BIG BREAKING | सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं वाचन सर्वसामान्यांना टीव्हीवर लाईव्ह पाहता येणार
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 4:54 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाचं उद्या कोर्टातून लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. जनतेला हा निकाल लाईव्ह पाहता येणार आहे. अतिशय ऐतिहासिक असा हा निकाल असेल. त्यामुळे जनतेला कोर्टाचा निकाल थेट कोर्टातून पाहता येणार आहे. कोर्टाचा निकाल थेट टीव्हीवरुन पाहण्याची ही पहिलीच वेळ असेल. कोर्टात नेमकं काय सुरु आहे, न्यायाधीश निकाल कसं वाचणार हे जसंच्या तसं जनतेला टीव्हीवर पाहता येणार आहे. हा निकाल ऐतिहासिक असल्याने जनतेला थेट कोर्टात सुरु असलेलं निकालाचं वाचन जसंच्या तसं पाहता येणार आहे. सुप्रीम कोर्टाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची ही पहिली अशी केस असेल की जनतेला कोर्टाचं निकाल वाचन थेट टीव्हीवर पाहता येणार आहे.

ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. ही स्वागतार्ह भूमिका असल्याचं उज्ज्वल निकम म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा विषय हा जनतेचा जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय यावर काय भाष्य करत हे जनतेला कळायला हवं अशी भूमिका सुप्रीम कोर्टाने याबाबतचा निर्णय घेतला असेल, असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं.

सरन्यायाधीश निकालचं वाचन करतील किंवा….

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल हा नेमका कसा लागणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी पार पडली. स्वत: सरन्याधीश धनंजय चंद्रचूड यांचा या घटनापीठात समावेश आहे. या प्रकरणात काय-काय वेगळे कंगोरे निघतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

विशेष म्हणजे पाचही न्यायाधीशांचं एकमत असेल तर सरन्याधीश इतर चार न्यायाधीशांच्या बाजूने निकालाचं वाचन करतील. पण पाचही न्यायाधीशाचंं एकमत नसेल तर वेगवेगळं वाचन केलं जाईल. त्यापैकी बहुमत ज्या निकालाच्या बाजूने किंवा मुद्द्याच्या बाजूने असेल तो अंतिम निकाल मानला जाईल, अशी माहिती कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 15 आमदारांचं काय होणार?

या सत्तानाट्याचे उद्गाते आणि प्रमुख असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलवार आहे. एकनाथ शिंदे हे आतापर्यंत चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी हा त्यांचा मतदारसंघ आहे. विधानसभेच्या 2004, 2009, 2014 आणि 2019 या चारही पंचवार्षिक निवडणुकांध्ये ते निवडून आले आहेत. गेल्या 2019च्या निवडणुकीत शिंदे तब्बल 89,300 मतांनी विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार संजय घाडीगांवकर यांचा पराभव केला होता. एकनाथ शिंदे यांच्यासह आणखी 15 आमदारांचं भवितव्य काय असणार हे उद्या स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.