SC Hearing on MLA disqualification Live : सत्तासंघर्षाची आजची सुनावणी संपली, उद्या कपिल सिब्बल युक्तिवाद करणार
Maharashtra Breaking News Live : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी; सुनावणीकडे राज्याचं लक्ष
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सलग दुसऱ्या दिवशी आज सुनावणी होत आहे. काल शिंदे गटाचे वकील हरीश साळवे, महेश जेठमलानी आणि नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. यावेळी साळवे यांनी चार प्रकरणाचा दाखला दिला. तर जेठमलानी यांनी राज्यातील सत्ता संघर्षाचा घटनाक्रमच मांडला. आज ठाकरे गटाकडून युक्तिवाद केला जाणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल कोणत्या मुद्द्यांकडे सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष्य वेधतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
सत्तासंघर्षाची आजची सुनावणी संपली, उद्या कपिल सिब्बल युक्तिवाद करणार
नवी दिल्ली : सत्ता संघर्षाची आजची सुनावणी संपली उद्या पुन्हा सुनावणी होणार उद्या ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करणार
-
अख्खं गाव हळहळलं, यात्रेत बैलगाडीवरच्या जनरेटरमुळे 13 वर्षाच्या मुलीचं संपलं आयुष्य
बैलगाडीवरच्या जनरेटरमुळे मुलीचा मृत्यू कसा झाला? नेमकं काय घडलं? लाऊड स्पीकरमुळे कोणालाच तिचा आवाज ऐकू आला नाही. वाचा सविस्तर….
-
-
दिल्लीतून मोठी बातमी
केंद्रीय निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात उत्तर केलं सादर
10 पानी उत्तर केलं सादर
एकनाथ शिंदेंना चिन्ह देण्याचा निर्णय कायद्यानुसार योग्य
उद्धव ठाकरेंनी केंद्रीय निवडणूक आयोगावर जो आरोप केला तो चुकीचा
आम्ही हा निर्णय संविधानाला अनुसरून केला आहे
नियमांनुसारच आम्ही हा निर्णय घेतला
-
राज्यपाल परिस्थिती पाहूनच निर्णय घेतात, तुषार मेहता यांचा युक्तिवाद
39 आमदारांचा सरकारवर विश्वास नव्हता
आमदारांना धमक्या येत असताना राज्यपाल शांत कसे राहतील?
तत्कालीन मुख्यमंत्री बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत
-
मै चूप रहा तो बहोत गलतफहमिया बढी, वो भी सुना उसने जो मैने कहा नही : तुषार मेहता
आमदारांना केवळ धमक्या नव्हत्या तर काही ठिकाणी हल्लेही झाले
तरीही पुढे अधिवेशन आहे म्हणून राज्यपालांनी मौन बाळगणं योग्य आहे का? तुषार मेहता यांचा सवाल
राज्यपाल फक्त बहुमत चाचणी बोलावू शकतात, इतर राजकारणाशी त्यांचा संबंध नाही
कायद्याच्या आधारे आपण चर्चा करू. त्यानंतर इतर घटनांकडे पाहू
-
-
Live- शिवसेना उत्तर प्रदेश संपर्कप्रमुख पदी विक्रम प्रताप सिंह यांची नियुक्ती..
शिवसेना मुख्यनेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली नियुक्ती..
विक्रम प्रताप सिंह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या जवळचे मानले जातात.
-
Live- कोल्हापूर – केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंबाबाई मूर्तीशी छेडछाड केली – श्री पूजक याचे वकिल नरेंद्र गांधी याचा गंभीर आरोप
कोणत्याही परवानगी शिवाय चेहऱ्यावर यापूर्वी लावलेला लेपचा काही थर काढून टाकला – वकील गांधी
लेपचा काही थर काढून टाकल्यानंतर मूर्तीचा चेहरा आणखी खराब झाल्याचे समोर.
केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यानी बेकायदेशीर कृत केल्याचा श्री पूजकांच्या वकिलांचा दावा
श्री पूजकाची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात धाव
-
Supreme court Live- राज्यपालांच्या कृतीवरून सरन्यायाधीशांकडून प्रश्नांच्या फैरी
– बंडखोर आमदार ३ वर्ष राज्यपालांकडे गेले नाहीत-सरन्यायाधीश
– या सगळ्या घटना सरकार आल्यानंतर १ महिन्याने नाही तर ३ वर्षानंतर कसे आले?
– राज्यपालांनी हा प्रश्न स्वतःलाच विचारायला हवा- सरन्यायाधीश
-
Supreme court Live- सत्तासंघर्षात राज्यपालांच्या कृतीवरून सुप्रीम कोर्टाची नाराजी
राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावणं हे सरकार पाडण्याचं कृत्- सरन्यायाधीश
सरकार पडेल असं कोणतंही कृत्य राज्यपालांनी करायला नको – सरन्यायाधीश
जीवाला धोका आहे म्हणून बहुमत चाचणी बोलावणं योग्य नाही- सरन्यायाधीश
-
Shivsena case Live- सत्तासंघर्षात सुप्रीम कोर्टाची सर्वात महत्त्वाची टिप्पणी
3 वर्षात एकही पत्र लिहिलं नाही, एका आठवड्यात ६ पत्र लिहिली?
३ वर्षांचा संसार एका रात्रीत कसा मोडला?
राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी पत्र लिहिणं अयोग्य
महाराष्ट्र हे राजकीयदृष्ट्या सुसंस्कृत राज्य, अशा प्रकरणांमुळे राज्याला कलंक लागतो- सरन्यायाधीश
-
सुप्रीम कोर्टात तुषार मेहता यांचा युक्तिवाद
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू
विधिमंडळ पक्षाने शिंदेंची गटनेता म्हणून नियुक्ती केली- तुषार मेहता
-
शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरण
साईनाथ दुर्गेसह अन्य आरोपींना काही वेळात बोरिवली न्यायालयात हजर केलं जाणार
साईनाथ दुर्गेंना काल एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती
-
राज्यपालांचे वकील तुषार मेहता यांचा युक्तिवाद सुरू, एक तास युक्तिवाद करणार
सत्तासंघर्षाच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात सुरुवात
तुषार मेहता यांच्यानंतर कपिल सिब्बल युक्तिवाद करणार
ठाकरे गटाचा युक्तिवाद आजच पूर्ण होणार
-
सत्तासंघर्षाची सुनावणी आज पूर्ण होणार?; सर्वोच्च न्यायालयात आज काय घडणार?
राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पूर्ण होण्याची शक्यता आहे
काल शिंदे गटाच्या वकिलांनी बाजू मांडली होती, आज ठाकरे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जाणार आहे
त्यानंतर घटनापीठ आपला निर्णय राखून ठेवेल आणि निर्णयाची तारीख देण्याची शक्यता आहे
-
राज्यातील सत्तासंघर्षावर थोड्याच वेळात सुनावणी; ठाकरे गटाचे वकील बाजू मांडणार
राज्यातील सत्तासंघर्षावर काल शिंदे गटाच्या वकिलांनी बाजू मांडली होती
ज्येष्ठ वकील हरीश साळवे, नीरज कौल आणि महेश जेठमलानी यांनी शिंदे गटाच्यावतीने बाजू मांडली होती
या वकिलांनी राज्यपालांचे अधिकार, विधानसभा अध्यक्षांची भूमिका आणि सत्तासंघर्षाचा घटनाक्रम यावर भाष्य केलं होतं
आज ठाकरे गटाचे वकील बाजू मांडणार आहेत
Published On - Mar 15,2023 10:34 AM