uddhav thackeray vs eknath shinde live : सत्तासंघर्षावरील सुनावणी 7 जणांच्या घटनापीठाकडे जावी; ठाकरे गटाची मागणी

| Updated on: Feb 16, 2023 | 10:03 PM

uddhav thackeray vs eknath shinde live updates : राज्याच्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी होत आहे. हे प्रकरण लार्जर बेंचकडे देण्यात येणार का? याबाबतचा फैसलाही आज होणार आहे. आजही शिंदे गटाचे वकीलच कोर्टात बाजू मांडणार आहेत.

uddhav thackeray vs eknath shinde live : सत्तासंघर्षावरील सुनावणी 7 जणांच्या घटनापीठाकडे जावी; ठाकरे गटाची मागणी
supreme courtImage Credit source: tv9 marathi

मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षावर आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी होत आहे. सकाळी 10.30 वाजता सुनावणीला होणार सुरुवात होणार आहे. सलग तिसऱ्या दिवशी आज ही सुनावणी होत आहे. आज शिंदे गटाच्या वतीने महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंह युक्तिवाद करणार आहेत. सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे प्रकरण जाणार का? याचा फैसला आज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Feb 2023 01:52 PM (IST)

    प्रकरण ७ जणांच्या घटनापीठाकडे जाणार का? निकाल राखून ठेवला

    सर्वोच्च न्यायालयात सर्व बाजूंचा युक्तीवाद पुर्ण

    न्यायालयाने निकाल राखून ठेवला

    प्रकरण ७ जणांच्या घटनापीठाकडे जाणार का? निकाल राखून ठेवला

    गेल्या तीन दिवसांपासून सुरु असणारी सुनावणी पुर्ण

  • 16 Feb 2023 01:39 PM (IST)

    नबाम रेबिया केसवर सिंघवी यांचा युक्तीवाद सुरू

    नबाम रेबिया केसचा आणि महाराष्ट्राच्या घटनेचा संबंध नाही- ठाकरे गटाच्या वकीलांचा युक्तीवाद

    शिंदे गटाच्या याचिकेत तथ्यं लपवण्यात आली – सिंघवी

    किहोटो केस सांगते अध्यक्षांच्या अधीकारात कोर्टाचा हस्तक्षेप नको

  • 16 Feb 2023 01:10 PM (IST)

    काय केला सिब्बल यांनी युक्तीवाद

    अपात्रेची कारवाई झाली नसल्याने ठाकरे सरकार कोसळले

    लोकसभा आणि विधानसभेच्या नियम वेगळा

    बहुमत नसले तरी अध्यक्षांना आमदारांवर कारवाई करता येते

    नबाम रेबिया केसवर पुन्हा झाली चर्चा

  • 16 Feb 2023 12:45 PM (IST)

    ती नोटिस होती, अविश्वास प्रस्ताव नव्हता – कपिल सिब्बल

    नवी दिल्ली : ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद,

    गुवाहाटीमध्ये बसून सरकारसंदर्भात नोटिस पाठविली,

    कपिल सिब्बल यांनी लोकसभेतला अनुभव कोर्टाला सांगितला,

    लोकांना विकत घेऊन सरकार पाडण्यात आले – कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद.

  • 16 Feb 2023 12:40 PM (IST)

    लोकांना विकत घेऊन महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात आलं, कपिल सिब्बल यांचा दावा

    सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर न्यायाधीशांची चर्चा सुरू

    सुनील प्रभू यांनी जारी केलेल्या व्हीपचं उल्लंघन करण्यात आलं

    शिंदे गटाच्या आमदारांनी भाजपला मतदान केलं

  • 16 Feb 2023 12:38 PM (IST)

    गुवाहाटीत बसून महाराष्ट्र सरकारचा निर्णय घेतला जाऊ शकत नाही: कपिल सिब्बल

    ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचे जोरदार युक्तिवाद

    जगातील कोणत्याही लोकशाहीत हे स्वीकारलं जाऊ शकत नाही

    दहाव्या सूचीचा वापर सरकार पाडण्यासाठी होऊ नये

    तुम्ही 34 असले तरी विलिनीकरण हाच पर्याय

    दहाव्या सूचीत बहुमताला महत्त्व असा काही नियम नाही

    आमदार विलीन झाले तरी मूळ पक्ष तसाच राहतो

    राजस्थानमधील केसचाही दिला दाखला

  • 16 Feb 2023 11:39 AM (IST)

    जेष्ठ वकील मनिंदर सिंह यांचा युक्तिवाद सुरू

    नवी दिल्ली : मनिंदर सिंह हे शिंदे गटाचे वकील,

    सुप्रीम कोर्टात मनिंदर सिंह युक्तिवाद केला जात आहे,

    विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारावर मनिंदर सिंह बोलत आहे.

  • 16 Feb 2023 11:24 AM (IST)

    आमदारांच्या जीवाला धोका होता- जेठमलानी

    जेठमलानी यांचा युक्तीवाद सुरु

    आमदारांच्या जीवाला धोका होता, असा दावा महेश जेठमलानी यांनी केला

    शिवराजसिंह चौहान यांच्या केसचा दाखला देण्यात आला

    मध्य प्रदेशाच्या केसचे वाचन सुरु

  • 16 Feb 2023 10:52 AM (IST)

    चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अपडेट

    चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अपडेट

    -भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची चिंचवड पोटनिवडुकीसाठी बैठकांचे सत्र

    -रात्री ९ पर्यंत मॅरेथॉन बैठका सोसायटी प्रतिनिधी युवा कार्यकर्ते आणि चिंचवड मधल्या विविध भागातील नागरिकांबरोबर दिवसभर करणार

  • 16 Feb 2023 10:03 AM (IST)

    महाराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेशच्या केसमधील फरक: अनिल देसाई

    सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी होणार आहे

    नबाम रिबिया हाच महाराष्ट्राच्या केसला लागू होतो का? याबाबत आमच्या वकिलांनी बाजू मांडली

    महाराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेशमध्ये फरक आहे हे आम्ही सांगितले

    सरन्यायाधीशांनी पण याबाबत काही विसंगती व्यक्त केली.

    घटनाक्रम हा यात बघितलाच पाहिजे

    त्यानुसारच कायद्याचा काय परिणाम होतो हे महत्त्वाचे

    राजीनामा 29/30 तारखेला झाला, पण त्याआधीच अपात्रतेची कारवाई सुरु झाली होती

    16 आमदारांची अपात्रतेची कारवाईचा क्रम पहिला

    29 तारखेला ज्या घटना घडल्या त्याचा अर्थ 21 तारखेच्या आधी कश्या लावू शकतो?

    फ्री फ्लो आँफ ह्यूमन कॅपिटल याचा उल्लेख सरन्यायाधीशांनी केला

    विधानसभा अध्यक्षांचे अधिकार बाधित करून अशा गोष्टी होऊ देणं लोकशाहीला घातक

    7 न्यायमूर्तीकडे जरी केस गेली तरी लवकरात लवकर निकाल लागेल, कारण सरन्यायाधीशांनी पण या गोष्टी लोकशाहीला घातक म्हटले आहे

  • 16 Feb 2023 09:58 AM (IST)

    राज्याच्या सत्तासंघर्षाचं प्रकरण लार्जर बेंचकडे जाणार?; थोड्याचवेळात फैसला

    राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होत आहे

    सलग तिसऱ्या दिवशी ही सुनावणी होणार आहे

    यावेळी शिंदे गटाचे वकील आजही शिंदे गटाची बाजू मांडणार

  • 16 Feb 2023 09:53 AM (IST)

    महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी

    सलग तिसऱ्या दिवशी आज होणार सुनावणी

    आज शिंदे गटाच्या वतीने महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंह युक्तिवाद करणार

    10.30 वाजता सुनावणीला होणार सुरुवात

    सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे प्रकरण जाणार का? याचा फैसला आज होण्याची शक्यता

Published On - Feb 16,2023 9:51 AM

Follow us
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.