Uddhav Thackeray VS Eknath Shinde Live : पुरेसं संख्याबळ नसताना सुनील प्रभू यांनी आमदारांना नोटीस बजावली; नीरज कौल यांचा दावा
uddhav thackeray vs eknath shinde live updates : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होत आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
मुंबई: राज्यातील सत्ता संघर्षावर आज सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी होणार आहे. काल ठाकरे गटाचा युक्तिवाद झाल्यानंतर आज खंडपीठाकडून शिंदे गटाचा युक्तिवाद ऐकला जाणार आहे. शिंदे गट आज काय बाजू मांडणार आणि ठाकरे गटाचा युक्तिवाद कसा खोडून काढणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. शिंदे गटाच्या युक्तिवादात आज कोणते नवे मुद्दे मांडले जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
आजची सुनावणी पुर्ण, उद्या परत सुनावणी
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणात आजची सुनावणी संपली
गुरुवारी पुन्हा होणार सुनावणी होणार
आज शिंदे गटाचे वकील नीरज कौर यांचा झाला युक्तीवाद
हरीश साळवे यांनीही मांडली बाजू
-
नीरज कौल, हरीश साळवे यांचा युक्तीवाद
विधानसभा अध्यक्षांच्या काही निर्णयावर नीरज कौल यांचा युक्तीवाद
अध्यक्षांच्या काही निर्णयावर प्रश्न उपस्थित केले
नीरज कौर यांच्या युक्तीवादानंतर न्यायमूर्तींमध्ये चर्चा
सरकार कोसळण्यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार
-
-
अविश्वासाचा प्रस्ताव प्रलंबित, निर्णायवर प्रभाव होऊ शकतो
अपात्रतेची नोटीस देताना नियमावलीचं काय
अपात्रतेची कारवाई करताना 14 दिवसांची नोटीस दिली होती का?
नीरज कौल यांचा मोठा युक्तिवाद
नीरज कौल नोटीसीसंदर्भातील नियमावली वाचून दाखवत आहेत
लंच ब्रेकनंतर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी सुरू
-
अविश्वासाचा प्रस्ताव आणल्यास उपाध्यक्ष निर्णय घेऊ शकत नाही- कौल यांचा युक्तीवाद
बनावटी कथानकावरून केस मोठ्या बेंचकडे देता येणार नाही- कौल
15 ते 20 मिनीटं कौल यांना युक्तिवादासाठी देण्यात आली आहेत
कौल यांच्या युक्तीवादानंतर तुषार मेहता यांचा युक्तीवाद
-
अविश्वास प्रस्तावाचा मेल पाठवण्यात आला होता, अॅड. नीरज कौल यांचा दावा
मेल अज्ञात ई-मेलवारून आल्याचं उपाध्यक्षांनी म्हटलं आहे
21 जूनला विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव पाठवला होता
ठाकरेंवर आम्हाला विश्वास नाही, असं आमदारांनी कळवलं होतं
-
-
पक्षांतर बंदी कायद्यामुळे पक्षांतर थांबलं नाही: हरीश साळवे
नबाम रेबिया प्रकरण महाराष्ट्रातील सत्तांतराशी लागू
सत्ता संघर्षाचा प्रश्न हा घटनात्मक प्रश्न आहे
अजय चौधरी यांचं गटनेतेपद बेकायदेशीर
त्यांच्या बैठकीला फक्त १४आमदार उपस्थित होते, ही कायदेशीर बैठक नव्हती
नरहरी झिरवळ हे उपाध्यक्ष यांनी आमदार अपात्र ठरवले
पाच न्यायामूर्तींच्या घटनापीठापुढे सुनावणी
हरीश साळवे यांनी घटनाक्रम मांडला
-
शिंदे गटाकडून आज सर्वोच्च न्यायालयात आज बाजू मांडली जाणार: अनिल देसाई
नबाब रेबिया केस संदर्भात आम्ही बाजू मांडली
आज ते नबाब रेबिया केसच्या बाजूनं आपली आपली मांडतील
निकाल लांबण्यापेक्षा निकाल योग्य होईल
आज शिंदे गटाचं युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालय आज या संदर्भात दिशानिर्देश देतील
कोणीही किती बाजू मांडली तरी सत्याच्या पलिकडे कोणीही जाऊ शकत नाही
केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी पूर्ण झाली, आता ती स्वायत्त बॉडी आहे, लोकशाहीला साजेसा निर्णय येईल : अनिल देसाई
-
राज्यातील सत्ता संघर्षावरील सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात सुरुवात
हरीश साळवे शिंदे गटाची बाजू मांडणार
16 आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी
सर्व न्यायाधीश कोर्टात उपस्थित
-
आज राज्याच्या सत्ता संघर्षावर पुन्हा सुनावणी
सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात सुनावणी
आज शिंदे गट आपली बाजू मांडणार
ज्येष्ठ वकील हरीश साळवे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार
Published On - Feb 15,2023 10:58 AM