Anil Deshmukh: अनिल देशमुखांची संपत्ती परत करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश, ईडीला फटकारले; रुपाली पाटील यांची पोस्ट चर्चेत
anil deshmukh: राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांची जप्त केलेली संपत्ती परत देण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे: राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांची जप्त केलेली संपत्ती परत देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे देशमुख कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादीच्या पुण्यातील फायर ब्रँड नेत्या रुपाली पाटील (rupali patil) यांनीही फेसबुक पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांना ईडीने (ed) ताब्यात घेतले होते. तेव्हापासून ते कोठडीत आहेत. ईडीने देशमुख यांना अटक करतानाच त्यांच्या घर आणि कार्यालयावर धाडी मारून त्यांच्या एकूण 11 मालमत्ता जप्त केल्या होत्या. त्यानंतर कोर्टाने आता महत्त्वाचे आदेश देतानाच ईडीला फटकारले असून त्यांच्या सर्व मालमत्ता परत करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती देशमुख यांचे वकील विपुल अग्रवाल यांनी दिले.
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला 100 कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट दिल्याप्रकरणी अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही देशमुखांवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणाची दखल घेत ईडीने देशमुख यांच्या घरावर छापेमारी केली होती. त्यानंतर देशमुख यांनना अटक केली होती. या धाडी दरम्यान ईडीने देशमुखांच्या 11 मालमत्ता जप्त केल्या होत्या. 180 दिवसानंतर ईडीने ही कारवाई केली होती. कायद्यानुसार 180 दिवसानंतर मालमत्ता जप्त करता येत नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने 180 दिवसानंतर मालमत्ता जप्त केल्याप्रकरणी ईडीला फटकारलं असून अनिल देशमुख यांचे पुत्र आणि सूनेलाही मालमत्ता परत करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचं वृत्त मॅक्स महाराष्ट्राने दिलं आहे.
रुपाली पाटलांची पोस्ट काय?
दरम्यान, कोर्टाच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाचा ईडीला दणका. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची व कुटुंबाची ED ने जप्त केलेली सर्व संपत्ती अनिल देशमुख यांना परत करावी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. कायद्यापुढे कोणी मोठा नाही. जय संविधान. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, अशी पोस्ट रुपाली पाटील यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण?
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून देशमुखांवर मोठे आरोप केले होते. सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या वाझे हे अनिल देशमुखांना कित्येक वेळेस त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं.मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये जमा करा. त्यामुळे महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये मिळतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करा. देशमुख इतर पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. त्यांनाही टार्गेट द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे. टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे, असा दावा या पत्रात सिंग यांनी केला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.
संबंधित बातम्या:
अनिल देशमुखांना दिलासा नाहीच! जामीन अर्ज कोर्टाने नाकारला
Sanjay Raut: महाराष्ट्रातील एका नेत्याच्या इशाऱ्यावर ईडीच्या कारवाया; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप