‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा’, भाजप आमदार सुरेश धस यांचा पुन्हा मुन्नीवर हल्ला

Walmik karad and MLA Suresh Dhas: परळीचा नवीन पॅटर्न आता महाराष्ट्राने घ्यावा का?. कुठेही आरोपीला ताब्यात घेतले की शहर बंद करायचे असा हा पॅटर्न आहे. आरोपींसाठी शहरे बंद करण्याचा नवीन पॅटर्न परळीमधून सुरु झाला आहे. व्यापारी शहर बंद करुन स्वत:चे नुकसान करत आहे.

'राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा', भाजप आमदार सुरेश धस यांचा पुन्हा मुन्नीवर हल्ला
वाल्मिक कराड, सुरेश धस
Follow us
| Updated on: Jan 15, 2025 | 4:08 PM

Walmik karad and MLA Suresh Dhas: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यात आरोप-प्रत्यारोप रोज सुरु आहे. या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचे नावही चर्चेत आले आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी हा विषय लावून धरला आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची बडी मुन्नी असा एक उल्लेख केला होता. त्यानंतर ही मुन्नी कोण? याबाबत चर्चा सुरु झाली होती. ही मुन्नी महिला नाही तर पुरुष आहे, असे आमदार धस यांनी म्हटले आहे. बुधवारी पुन्हा त्यांनी हा उल्लेख केला.

मुन्नीला बोलायला लावा…

आमदार सुरेश धस म्हणाले, वाल्मिक कराड याच्या मातोश्रीच्या संदर्भात मी काही बोलणार नाही. त्या माऊलीच्या विरोधात आपणास काहीच बोलायचे नाही. एखाद्या भगिनींच्या बाबतीत काही बोललो तर विषयाचा फोकस दुसरीकडे जातो. त्यापेक्षा माझी तुम्हाला विनंती आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना सांगा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा.

परळी बंदवरुन टीका

आमदार सुरेश धस यांनी मंगळवारी आरोपीसाठी पुकारण्यात आलेल्या परळी बंदवर टीका केली. ते म्हणाले, परळीचा नवीन पॅटर्न आता महाराष्ट्राने घ्यावा का?. कुठेही आरोपीला ताब्यात घेतले की शहर बंद करायचे असा हा पॅटर्न आहे. आरोपींसाठी शहरे बंद करण्याचा नवीन पॅटर्न परळीमधून सुरु झाला आहे. व्यापारी शहर बंद करुन स्वत:चे नुकसान करत आहे. त्यांच्याकडून निर्माण झालेल्या या दबावाला कोणी विचारत नाही, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

हा जातीवाद नाही तर गुंडावाद

परळीत जातीवाद सुरु झाला आहे का? त्यावर बोलताना आमदार धस म्हणाले, हा जातीवाद नाही. वाल्मिक कराड यांना मानणारे चार ते पाच टक्के लोक आहे. त्यांच्याकडून निर्माण केलेला हा गुंडावाद आहे. त्याला जातीवाद हा शब्द वापरु नका. या ठिकाणी कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक आले आहे, त्यांनी काय काय कारवाई केली ते पाहू.

संतोष देशमुख प्रकरणात अजूनही खूप कारवाई होणे बाकी आहे, असे आमदार धस म्हणला. ते म्हणाले, उज्ज्वल निकम यांची नियुक्ती अजून झालेली नाही. आका सापडला आहे पण आकाच्या पुढे आणखी कोण सापडतो का? हा खटला व्यवस्थित चालला आहे का? हे सर्व अजून पाहावे लागणार आहे.

हे ही वाचा…

वाल्मिक कराड याने लाखो रुपयांचा कर थकवला, आता फ्लॅटचा लिलाव होणार

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.