दहा वर्ष नक्षली चळवळीत अन् कोट्यवधीचे बक्षीस असलेल्या कमांडर तारक्कासह 11 सक्रीय नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Tarakka Sidam Gadchiroli: मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील विशेष कार्यक्रम म्हणजे मध्य भारतातील नक्षल कारवायांचा मोहरक्या भूपती याची पत्नी तारक्का हिने अन्य 10 नक्षल्यांसह केलेले आत्मसमर्पण महत्त्वाचे ठरले. तारक्का गेली 38 वर्ष नक्षल चळवळीत सक्रिय होती.

दहा वर्ष नक्षली चळवळीत अन् कोट्यवधीचे बक्षीस असलेल्या कमांडर तारक्कासह 11 सक्रीय नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
Devendra fadnavis
Follow us
| Updated on: Jan 01, 2025 | 9:12 PM

Tarakka Sidam Gadchiroli: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्हा दौरा केला. आपल्या दौऱ्यात त्यांनी अतिदुर्गम नक्षल संवेदनशील पेनगुंडा पोलीस स्टेशनला भेट देत जनजागरण मेळाव्याला उपस्थिती लावली. फडणवीस यांच्या हस्ते कोनसरी येथे पोलाद प्रकल्पाची सुरुवात देखील करण्यात आली. गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयात हेलिकॉप्टर हँगरचे देखील त्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. तसेच पोलीस मुख्यालय मैदानावर गडचिरोली पोलिसांना नवीन वाहनांचे वितरण देखील करण्यात आले.

पोलीस मुख्यालयातील एकलव्य सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षभरात उत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकारी व पोलीस जवानांना सन्मानित केले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील विशेष कार्यक्रम म्हणजे मध्य भारतातील नक्षल कारवायांचा मोहरक्या भूपती याची पत्नी तारक्का हिने अन्य 10 नक्षल्यांसह केलेले आत्मसमर्पण महत्त्वाचे ठरले. तारक्का गेली 38 वर्ष नक्षल चळवळीत सक्रिय असून तिने आपल्या अन्य सहकाऱ्यांसह मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला.

या नक्षलींनी केले आत्मसमर्पण

  1. विमला चंद्रा सिडाम ऊर्फ तारा ऊर्फ वत्सला ऊर्फ ताराक्का, (डिकेएसझेडसीएम, डिके मेडीकल टिम इंचार्ज), वय ६२ वर्ष, रा. किष्टापूर, तह. अहेरी, जि. गडचिरोली,
  2. सुरेश बैसागी ऊईके ऊर्फ चैतु ऊर्फ बोटी (डिव्हीसीएम, कुतुल एरीया कमिटी (कृषी विभाग)), वय ५६ वर्ष, रा. पल्ले, तह. भामरागड, जि. गडचिरोली,
  3. कल्पना गणपती तोर्रेम ऊर्फ भारती ऊर्फ मदनी (डिव्हीसीएम, कुतूल एरीया कमिटी (डॉक्टर/कृषी विभाग)) वय ५५ वर्षे, रा. किष्टापूर तह. अहेरी, जि. गडचिरोली,
  4. अर्जुन तानु हिचामी ऊर्फ सागर ऊर्फ सुरेश (डिव्हीसीएम, राही दलम), वय ३२ वर्षे, रा. झुरी, तह. एटापल्ली, जि. गडचिरोली,
  5. वनिता सुकलु धुर्वे ऊर्फ सुशिला, (एसीएम, भामरागड दलम) वय ३१ वर्षे, रा. चिमरीकल, तह. धानोरा, जि. गडचिरोली,
  6. सम्मी पांडु मट्टामी ऊर्फ बंडी (एसीएम, डिके झोन डॉक्टर टिम) वय २५ वर्षे, रा. बेरेलटोला, तह. पाखांजूर, जि. नारायणपूर (छ.ग.),
  7. निशा बोडका हेडो ऊर्फ शांती (उप-कमांडर, पेरमिली दलम), वय ३१ वर्ष, रा. मेंढरी, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली
  8. श्रुती उलगे हेडो ऊर्फ मन्ना (सदस्य, कंपनी क्र. १०), वय २६ वर्ष, रा. मोहंदी, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली,
  9. शशिकला पत्तीराम धुर्वे ऊर्फ श्रुती (सदस्य, पश्चिम सब झोनल प्रेस टिम) वय २९ वर्षे, रा. कोसमी नं. १, तह. धानोरा, जि. गडचिरोली
  10. सोनी सुक्कु मट्टामी (सदस्य, राही दलम) वय २३ वर्षे, रा. टेकामेट्टा, तह. पाखांजूर, जि. नारायणपूर (छ.ग.)
  11. आकाश सोमा पुंगाटी ऊर्फ वत्ते (सदस्य, प्लाटुन क्र. ३२ (नीव)) वय २० वर्षे, रा. मेतावाडा, तह. ओरच्छा, जि. नारायणपूर (छ.ग.) आदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. या सर्वांवर एकूण 1 कोटींहून अधिक रकमेचे बक्षीस होते.
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.