‘आमदारकी गेल्यावर कचऱ्याच्या टोपलीत टाकले’, कट्टर शिवसैनिकाचा ठाकरेंवर गंभीर आरोप

शिवसेना ठाकरे गटाच्या माजी आमदाराने भाजपात प्रवेश केला आहे. हा नेता कोकणातला मोठा नेता आहे. या नेत्याने कोकणात एक काळ गाजवला आहे. या नेत्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक मानलं जायचं. पण या नेत्याने आज भाजपात प्रवेश केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर मोठा आरोप केला.

'आमदारकी गेल्यावर कचऱ्याच्या टोपलीत टाकले', कट्टर शिवसैनिकाचा ठाकरेंवर गंभीर आरोप
Uddhav Thackeray
Follow us
| Updated on: Feb 01, 2024 | 5:10 PM

विनायक डावरुंग, Tv9 प्रतिनिधी, रत्नागिरी | 1 फेब्रुवारी 2024 : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी भाजपने त्यांना कोकणात मोठा धक्का देण्याता प्रयत्न केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक असलेले माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. सूर्यकांत दळवी हे तब्बल 25 वर्ष दापोलीचे आमदार होते. ते 1990 पासून 2004 पर्यंत आमदार होते. आमदारकीचा इतका काळ गाजवलेले दापोलीतील प्रसिद्ध नेते सूर्यकांत दळवी यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सूर्यकांत दळवी यांनी आज भाजपात प्रवेश केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. आमदारकी गेल्यावर कचऱ्याच्या टोपलीत टाकले, असा आरोप सूर्यकांत दळवी यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

“२५ वर्ष आम्ही संघर्ष केला आणि आज प्रवेश करत आहोत. एखादी मुलगी जेव्हा लग्न करुन दुसऱ्या घरात जाते तेव्हा काही गोष्टी शिकायला वेळ लागतो. आम्हालाही या पक्षात काही गोष्टी शिकायला वेळ लागेल. आम्ही वैयक्तिक काही मागणार नाही. पण पक्ष वाढीसाठी जसं शिवसेनेसाठी काम केलं तसं भाजपसाठी काम करु”, असं सूर्यकांत दळवी म्हणाले.

‘कचऱ्याच्या टोपलीत पडलेली अवस्था होत असेल आणि…’

“भाजप नेते रवींद्र चव्हाण यांचा खूप अभ्यास करावा लागेल. ते कधी झोपतात तेच कळत नाही. त्यांची काम करण्याची पद्धत पाहिली. जोपर्यंत सूर्य, चंद्र आहेत तोपर्यंत हा झेंडा खाली उतरणार नाही. मी गेले ४० वर्ष शिवसेनेत होतो. आज भाजपमध्ये प्रवेश केला. अनेक कार्यकर्ते देखील आले. ही सुरवात आहे. एक भव्य मेळावा दापोलीत घ्यायचा हे आमच स्वप्न आहे. दिल्लीत नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र आणि कोकणात रवींद्र. आज एकच बोलतो. आजपासून जय श्री राम आणि उद्यापासून दापोली मतदार संघाच्या विकासाचं काम. कचऱ्याच्या टोपलीत पडलेली अवस्था होत असेल आणि त्याला कोणीतरी हाक मारत असेल म्हणून आजचा हा दिवस आहे”, अशी भूमिका सूर्यकांत दळवी यांनी व्यक्त केली.

“भाजपचं नेतृत्व चांगलं आहे. या प्रवाहात आपण सामील होणे काय गुन्हा आहे? काम करायला वाव मिळेल. आपण आणखी चांगली कामे करावी. दापोलीचा पर्यटन तालुका करण्याकरिता माझ्यामागे हे उभे राहतील हा विश्वास आहे. अनेक प्रकल्प मार्गी लावण्याकरिता सर्व भाजपच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. कमळ कोकणात फुलले पाहिजे”, असं सूर्यकांत दळवी म्हणाले.

‘ठाकरेंच्या दौऱ्याच्या दिवशीच पक्षप्रवेश यासारखा पापित निर्णय नाही’

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी सूर्यकांत दळवी यांच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. “बाजारात अनेक दुकानं आहेत. इकडे काही मिळालं नाही की दुसरीकडे जायचं. त्यांना शिवसेनेनं काय दिलं नाही. पाच टर्म त्यांना आमदार शिवसेनेने केलं. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या दिवशी पक्षप्रवेश करायचा यासारखा पापित निर्णय काही नाही असं मला वाटतं”, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.

‘त्यांच्यामागे सुद्धा काही यंत्रणा लावल्या असतील’

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनीदेखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “सूर्यकांत दळवी हे रत्नागिरी जिल्ह्यातले जेष्ठ शिवसैनिक आहेत. त्यांनी भाजप सारख्या मोठ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतलाय. कदाचित त्यांच्यामागे सुद्धा काही यंत्रणा लावल्या असतील. याच यंत्रणांना घाबरून ते कदाचित भाजपमध्ये गेले असतील. सूर्यकांत दळवी गेल्यामुळे उद्धव ठाकरे गटावरती कोणताच परिणाम होणार नाही. माणूस गेल्यामुळे काही प्रमाणात नुकसान होतं. पण त्या ठिकाणी आमचं उभरतं नेतृत्व संजय कदम हे आहेत. पुढचे आमदार संजय कदम होतील. कोकणामध्ये अनेक लोक गेली. काहीही फरक पडत नाही”, असं राजन साळवी म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.