अन् शरद पवार यांच्या डोळ्यात पाणी आलं; सुशील कुमार शिंदे यांनी सांगितलेला किस्सा काय?
काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांची कन्या खासदार प्रणिती शिंदे यांचे या समारंभात कौतुक केले. आपल्या खासदारांनी अतिशय सुंदर भाषण केले.खासदारांनी ज्या गोष्टी मांडल्या त्यासाठी मी सोबत आहे असेही सुशील कुमार शिंदे यावेळी म्हणाले.
माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा आज सत्कार करण्यात आला. यावेळी केलेल्या भाषणात सुशीलकुमार शिंदे यांनी छोटेखाणी भाषण करीत सत्काराला उत्तर दिले. त्यावेळी ते म्हणाले की शरद पवार यांच्या सांगण्यावरून विजय दादांनी आज माझा सत्कार केला.यालाही मोठं मन लागतं. 1973 साली पवार साहेबांनीच मला राजकारणात आणलं. पवार साहेबांच्या पुढे मी घाबरून असायचो. पवार साहेबांनी मला त्यावेळेस विचारलं की तू राजकारणात का येत नाही. तेव्हा मी सांगितले होतं की योग्य परिस्थिती आल्यावर येतो, योग्य परिस्थिती आल्यावर मी राजकारणात आलो असेही सुशीलकुमार शिंदे यावेळी म्हणाले.
सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना शरद पवार यांच्याविषयीचा हृद्य किस्सा सांगितला ते पुढे म्हणाले की मी पोलीस खात्यात असताना वरिष्ठांनी मला सांगितले तुम्हाला खूप बक्षीस आहेत तुम्ही पोलीस खाते सोडू नका त्यात या काँग्रेसच्या तर नादीच लावू नका.शरद पवारांनी मला पहिल्यांदा तिकीट दिले होते, मात्र हाय कमांडने ते नाकारले होते त्यावेळेस पवारांच्या डोळ्यात पाणी आले. शरद पवार हे असेच आहेत, ज्यांना… ज्यांना पुढे आणायचे असतं त्यांच्याबद्दल चांगले बोलत असतात.मी शहरात राहणारा माणूस मला झेडपी माहित नाही की तालुका माहीत नाही, परंतु पवार साहेबांच्या मुळे सगळे काही समजले.मला घडवण्यामध्ये शरद पवारांचा मोठा हात आहे असे यावेळी सुशील कुमार यांनी सांगितले.
भगवा दहशतवाद या विधानावर स्पष्टीकरण
मी गृहमंत्री असताना जो रिपोर्ट माझ्याकडे आला तोच मी मांडला होता.मात्र काही लोक याबाबत चकाट्या पिठत बसतात. माझं त्यांना आवाहन आहे की माझ्याकडे या, बसा, मी तुम्हाला सांगतो नक्की काय होतं ते असे भगवा दहशतवाद विधानावर सुशील कुमार शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले. साल 2014 मध्ये मी गृहमंत्री असताना पॅरामिलिटरी फोर्सच्या सैनिकांना गणवेश का दिला नाही अशी टीका मोदी यांनी माझ्यावर केली होती अशी आठवण सुशील कुमार यांनी यावेळी सांगितली.मात्र मागील दहा वर्षात एकही काम भाजपाने केलेले नाही.जे शक्य नाही ते भारतीय जनता पार्टी सांगून मोकळी होते अशी टीका शिंदे यांनी सरकारवर केली
माझ्यापेक्षा लहान आहेत हे आता कळलं
मला माहित नव्हतं शिंदे साहेब 84 वर्षाचे झाले, मला आता समजलं माझ्यापेक्षा साडे आठ वर्षांनी ते लहान आहेत.मी तुमच्या पेक्षा मोठा आहे, थोरला आहे.त्याचं वैशिष्ट्य आहे त्यांनी सत्ता कधी डोक्यात जाऊ दिली नाही. पाय जमिनीवर ठेवले.ते कष्टाने पुढे आले.त्यांनी नाटकात काम केल अनेक उद्योग केले.त्यांच्यासाठी तुम्ही आम्ही जमा झालो आहोत असे शरद पवार यावेळी म्हणाले.
ईडी आणि सीबीआय लहान मुलांनाही माहिती झाले
इतिहास लिहिला जात असतो. मात्र 2024 ला इतिहास लिहिला जाणार आहे. ज्यांनी ज्यांनी महाविकास आघाडीला मतदान केले त्यांचे अभिनंदन आणि आभार मानतो,महाराष्ट्राच्या परिवर्तनाचे हे व्यासपीठ असे यावेळी कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले. सुशील कुमार शिंदे देशाचे गृहमंत्री होते त्यावेळेस ईडी, सीबीआय नव्हते का ? परंतु रस्त्यावर फिरणाऱ्या लहान पोराला देखील आता ते माहिती झाले. हजार कोटीचे काम वीस कोटीला कशी जाते हे सरकार आता शिकवते.राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे मोडून गेली आहे, मणिपूरमध्ये झालेले महिलांवरचे अत्याचार, बदलापूरची घटना ताजी आहे.यांना लाडकी बहीण नाही लाडकी सत्ता आहे अशा शब्दात थोरात यांनी यावेळी सरकारवर टीका केली