‘त्या’मुळे तर संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला नाही ना?; सुषमा अंधारे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांचं नाव का घेतलं?

नवणीत राणा याचं जात प्रमाणपत्र खोट आहे. राणा भावाच, बहिणीचं जात प्रमाणपत्र का दाखवत नाही? अक्का बोलती क्यूँ नही है? असा सवाल करतानाच राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर त्या निवडणूक आल्या.

'त्या'मुळे तर संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला नाही ना?; सुषमा अंधारे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांचं नाव का घेतलं?
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 7:01 AM

अमरावती : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर आता आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्याची मागणी मनसेने केली आहे. तर, या प्रकरणी वरुण सरदेसाई यांची चौकशी करण्याची मागणी भाजप नेते नितेश राणे यांनी केली आहे. हे आरोपप्रत्यारोप सुरू असतानाच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आता या प्रकरणात थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ओढलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून चर्चांना उधाण आलं आहे.

सुषमा अंधारे यांची काल बडनेरा येथे सभा होती. या सभेत त्यांनी देशपांडे हल्ल्याचा उल्लेख करत थेट फडणवीस यांनाच या प्रकरणात ओढले. संदीप देशपांडे यांच्यावर असा हल्ला खरंच झाला असेल तर निषेधच आहे. पण कालच्या कसब्यातील पराभवाची चर्चा होत असल्याने देवेंद्रजीनी चर्चा दुसरीकडे वळवण्यासाठी तर हे केलं नाही ना, असा संशय सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे. संदीप देशपांडे यांना थोडं खरचटले आहे. त्यांना काहीच होऊ नये. यावेळी लोकांनी त्यांना पळू पण दिलं नाही, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

अक्का विसरभोळ्या

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या मतदारसंघात सुषमा अंधारे यांची ही सभा होती. यावेळी त्यांनी राणा दाम्पत्यांवर जोरदार हल्ला चढवला. मला कोणी तरी सांगितलं होतं की, नवनीत अक्काला माझी गळाभेट घ्यायची आहे. त्यामुळेच मी नवनीत अक्काची गळाभेट घेण्यासाठी आले आहे. नवनीत अक्काला मला ओळखत नाहीत असं म्हणाल्या होत्या.

खरं तर अक्का विसरभोळ्या झाल्या आहेत. एसीत ड्रायफ्रुट खाऊन त्यांची त्वचा चमकदार झाली आहे. त्यामुळे त्यांना आठवत नसावं बहुतेक. मला तिळगुळ पाठवणार असल्याचं नवनीत अक्का जानेवारीत म्हणाल्या होत्या. त्याची क्लिप माझ्याकडे आहे. तरीही त्या म्हणतात मी सुषमा अंधारेंना ओळखत नाही. जाऊ द्या. अक्का आपलीच आहे, असा चिमटाही अंधारे यांनी काढला.

इलाका तुम्हारा, धमाका हमारा…

नवनीत राणा यांनी निवडणुकीत कुकर दिले. निवडून आल्यावर झाकण देऊ म्हणाल्या होत्या. नवनीत अक्काचं मॅनेजमेंट भारीच आहे, असा टोलाही त्यांनी काढला. यावेळी त्यांनी नवनीत राणा यांचा एक व्हिडीओ दाखवला. त्या एमआरआय रुममध्ये असल्याचा हा व्हिडीओ आहे. एमआरआय रुममध्ये कोणी कॅमेरे घेऊन जातात का? नवनीत राणा यांची प्रत्यके गोष्ट नौटंकी आहे, अशी टीकाही त्यांनी केली. आपण कोणाच्या पाठिमागे बोलत नाही. पण आपली स्टाईल आहे, इलाका तुम्हारा, धमाका हमारा… रवी राणा यांना मंत्री पद मिळावे म्हणून त्या हनुमान चालीसा म्हणत होत्या का? ज्याने ज्याने मातोश्रीवर शिंतोडे उडवले त्यांचा हिशोब घेतला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

अक्का बोलती क्यूँ नही

नवणीत राणा याचं जात प्रमाणपत्र खोट आहे. राणा भावाच, बहिणीचं जात प्रमाणपत्र का दाखवत नाही? अक्का बोलती क्यूँ नही है? असा सवाल करतानाच राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर त्या निवडणूक आल्या. राणा दाम्पत्याचं राजकारण संधीसाधू आहे, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राणा दाम्पत्यांनी केलेल्या टीकेचे व्हिडीओ सुषमा अंधारे यांनी भरसभेत दाखवले.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.