‘चंद्रशेखर बावनकुळे यांना मुख्यमंत्रीपदापासून का डावललं जातं?’; सुषमा अंधारे यांचा तिखट सवाल 

सुषमा अंधारे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उल्लेख करत भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी बावनकुळे यांच्या ओबीसी प्रतिनिधित्वाबाबत आणि मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. ईव्हीएम मशीनच्या चुकीच्या वापराच्या आरोपाबरोबरच महायुतीच्या विजयाचा जल्लोष नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. रिकाउंटिंग मागणीच्या बाबतीत पक्षपातीपणा असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

'चंद्रशेखर बावनकुळे यांना मुख्यमंत्रीपदापासून का डावललं जातं?'; सुषमा अंधारे यांचा तिखट सवाल 
सुषमा अंधारे
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 9:59 PM

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत खोचक प्रश्न विचारत भाजपवर निशाणा साधला आहे. “चंद्रशेखर बावनकुळे यांची साउथच्या ब्रह्मासारखी अवस्था होती की काय ते बघा? जेव्हा जेव्हा भाजपच्या अंगावर येतं तेव्हा वारं झेलायला बावनकुळे आहेत की काय? मेवा खायच्या वेळेस मात्र तेच तेच चेहरे पुढे येतात. भाजपमध्ये ओबीसीचा माणूस मुख्यमंत्री पदापर्यंत का पोहोचू शकत नाही? बावनकुळे साहेबांनी आमच्या 20 लोकांची चिंता करण्यापेक्षा मुख्यमंत्री पदासाठी त्यांना का डावलले जात आहे याचा त्यांनी विचार करावा”, असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.

“ईव्हीएमबद्दलचा उद्रेक याच्याआधी कधीच झाला नव्हता, जो आता महाराष्ट्रात दिसून येत आहे. महायुतीने एवढा मोठा विजय मिळवला आहे. मात्र त्याचा विजयाचा जल्लोष कुठे दिसत नाही. अनेक ठिकाणी मतदानाची आकडेवारी मिस मॅच आहे. जिथे जिथे महायुतीच्या उमेदवारांनी रिकाउंटिंगची मागणी केली ती स्वीकारली गेली. मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवाराची रिकाउंटिंग मागणी स्वीकारली नाही. हा पक्षपातीपणा आहे. ईव्हीएम मशीनची याचिका जर कोर्टाने फेटाळून लावली तर शेवटचं आशा स्थान म्हणून आम्ही कोणाकडे पाहायचं?”, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

हे सुद्धा वाचा

‘बावनकुळे यांना मुख्यमंत्री पदासाठी का डावलले जात आहे?’

“हा सर्व खेळच खुर्चीचा आहे. पक्षपातीपणा केला जात आहे. यावेळेस मुख्यमंत्री पदाचे खरे हकदार देवेंद्र फडवणीस आहेत. भाजपमध्ये ओबीसीचा माणूस मुख्यमंत्री पदापर्यंत का पोहोचू शकत नाही? चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमच्या 20 लोकांची चिंता करण्यापेक्षा मुख्यमंत्री पदासाठी त्यांना का डावलले जात आहे? याचा त्यांनी विचार करावा”, असा पुनरुच्चार सुषमा अंधारे यांनी केला.

'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....