गृहखात्याचा सस्पेंस कायम, शपथ घेण्याआधी एकनाथ शिंदे यांनी ठेवली ही अट?
एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीवर अखेर सस्पेंस संपला आहे. ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. पण त्याआधी त्यांनी भाजपसमोर एक अट ठेवली आहे. एकनाथ शिंदे हे गृहखात्यावर ठाम आहे. त्यामुळे गृहखातं मिळणार की नाही याचा फैसला शपथविधीनंतर होऊ शकतो.
Eknath Shinde and Amit shah : मुख्यंमत्रीपदाचा शपथविधी सोहळा काही मिनिटांवर आला आहे. पण अजूनही गृहमंत्रीपदाबाबत सस्पेंस कायम आहे. कारण एकनाथ शिंदे हे गृहखात्यावर ठाम आहेत. आता अशी माहिती समोर येत आहे की, शपथ घेण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी मोठी अट ठेवलीये. जी भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने मान्य केलीये. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. शपथविधी सोहळ्यापूर्वी किंवा नंतर अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची भेट होणार आहे. या बैठकीत विभागांवर चर्चा होणार असल्याची माहिती शिवसेनेच्या नेत्यांनी दिली आहे. त्यामुळे गृहमंत्रालयाबाबत अजूनही सस्पेंस कायम आहे.
महायुतीमध्ये अजूनही नाराजी आणि मन वळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी आणि त्यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावे यासाठी त्यांची मनधरणी केली जात आहे. उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे आज संध्याकाळी शपथ घेतील. आमदारांशी बोलून त्यांनी उपमुख्यमंत्री होण्याचे मान्य केलंय.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुंबईतील त्यांच्या निवासस्थानावरून निघाले आहेत. फडणवीस हे संध्याकाळी आझाद मैदानावर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत.
एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास तयार नव्हते. पण आमदारांनी त्यांची मनधरणी केली आहे. पण याआधी त्यांनी एक अट ठेवली आहे. ते अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते पुन्हा एकदा गृहखातं मागू शकतात.
शपथविधी सोहळ्यापूर्वी भाजप आणि राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रांवरून वाद निर्माण झाला होता. कारण भाजपच्या निमंत्रण पत्रिकेवर फक्त देवेंद्र फडणवीस यांचे नाव आहे तर राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकेवर अजित पवार आणि फडणवीस यांचे नाव आहे. या निमंत्रण पत्रावर शिवसेनेने आक्षेप घेतलाय. शिंदे नसतील तर शिवसेनेचे कोणीही नाही, असे शिंदे गटाने म्हटले होते.