ठाण्यात आता कोरोनाचे नियम न पाळल्यास थेट दुकाने, आस्थापना सील; पालिका आयुक्तांचे फर्मान
कोरोनाची वाढती संख्या रोखण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी कंबर कसली आहे. (take Action against shops violating corona protocol says vipin sharma)
ठाणे: कोरोनाची वाढती संख्या रोखण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी कंबर कसली आहे. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन आणि मास्क वापरण्याच्या नियमांचा भंग केल्यास दुकाने आणि आस्थापना सील करा, असे आदेशच विपिन शर्मा यांनी दिले आहेत. त्यांनी ठाण्यातील परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना या आदेशांची सक्तीने अमलबजावणी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. (take Action against shops violating corona protocol says vipin sharma)
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी प्रभाग समिती स्तरावरील कामाची पाहणी करण्यास सुरूवात केली असून आज त्यांनी कळवा प्रभाग समितीतंर्गत विविध ठिकाणांची पाहणी करून स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी हे आदेश जारी केले आहेत. शर्मा यांनी सुरुवातीला प्रभाग समिती कार्यालयामध्ये बैठक घेवून सर्व स्थानिक नगरसेवकांशी संवाद साधला. यावेळी प्रभाग समिती अध्यक्षा वर्षा मोरे, नगरसेवक मिलिंद पाटील, उमेश पाटील, गणेश कांबळे, नगरसेविका अपर्णा साळवी, अनिता गौरी, आरती गायकवाड, विजया लासे आणि पूजा करसुळे आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीनंतर महापालिका आयुक्तांनी खारेगाव नाका, खारीगाव नाका शौचालय, वास्तू आनंद गृह संकूल, ओझोन व्हॅली गृह संकूल आदी ठिकाणी भेट देवून तेथील नागरिकांशी संवाद साधला.
शौचालयांची रोज पाच ते सहा वेळा सफाई करा
प्रभाग समिती अंतर्गत येणारी सर्व सार्वजनिक शौचालयांची रोज पाच ते सहावेळा नियमितपणे साफसफाई करावी, समिती अंतर्गत येणारी सार्वजनिक ठिकाणे, गर्दीची ठिकाणे सॅनिटाईज करावेत, असे सांगून मंगल कार्यालये, क्लब या ठिकाणी रोजच्या रोज भेटी देवून तेथील कार्यक्रमांचा आढावा घ्यावा, त्यांच्याकडून आगावू माहिती घ्या, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
‘या’ कामांना प्राधान्य द्या
प्रभाग समितीमधील आरोग्य केंद्रांसाठी औषधांचा आवश्यक तो साठा करणे, कोविड १९ चाचणीसाठी आवश्यक असणारी यंत्रणा गतीमान करणे, टीएमटीच्या बसेसचा फिरते अँटीजन चाचणी केंद्र म्हणून वापर करणे, ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्या ठिकाणचे निर्जंतुकीकरण करणे, तेथील सर्वेक्षण करणे, तापाची तपासणी करणे आदी कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
दीड लाखांची वसूली
दरम्यान, ठाण्यात मास्कचा वापर न करणाऱ्या 305 नागरिकांकडून दोन दिवसात तब्बल 1 लाख 52 हजार, 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी विना मास्क फिरणाऱ्यांवर आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडणाऱ्यांवर कडक करवाई करण्यात येणार असून दंड वसूल करण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रात प्रभाग समिती निहाय पथक तयार करण्यात आले असून दररोज मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. 20 फेब्रुवारी आणि 21 फेब्रुवारी 2021 या दोन दिवसात मास्कचा वापर न करणाऱ्या 305 जणांकडून प्रत्येकी 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत 13,000, कळवा,16,500, उथळसर प्रभाग समिती 12,000, माजिवडा प्रभाग समिती 18,500, वर्तकनगर प्रभाग समिती 11,500, लोकमान्य सावरकर प्रभाग समिती 14,000, नौपाडा कोपरी 43,500, वागळे प्रभाग समिती 12,000, तर दिवा प्रभाग समिती 11,500 असा एकूण 1 लाख, 52 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. (take Action against shops violating corona protocol says vipin sharma)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5 : 30 PM | 21 February 2021 https://t.co/v0THduuFjY
| #Mumbai | #MarathiNews | #Maharashtra | #Politics |
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 21, 2021
संबंधित बातम्या:
गावसकर-तेंडुलकरची शतकं ते पवार-ठाकरेंची भाषणं, ठाण्यातील मूक साक्षीदाराची पन्नाशी
आमच्याकडून कामात कॉम्प्रमाईज नाही, पण तुम्ही नियम पाळा : अजित पवार
हॉटेलमध्ये 21 कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानं महापालिकेला जाग; अँटिजेन टेस्ट आणि RTPCR तपासणीला वेग
(take Action against shops violating corona protocol says vipin sharma)