‘राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत बसल्याने उलट्या होतात’, तानाजी सावंत यांचा आधी निशाणा, आता…, महायुतीत काय घडतंय?

तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीत मोठा वाद निर्माण झाला आहे. तानाजी सावंत हे राज्य मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री आहेत. ते आरोग्य खात्याचे मंत्री आहेत. असं असताना त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत मंत्रिमंडळ बैठकीत बसल्यानंतर बाहेर आल्यावर आपल्याला उलट्या होतात, असं वक्तव्य केलं आहे.

'राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत बसल्याने उलट्या होतात', तानाजी सावंत यांचा आधी निशाणा, आता..., महायुतीत काय घडतंय?
Follow us
| Updated on: Aug 30, 2024 | 5:51 PM

शिवसेना नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीत ठिणगी पडली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत बसल्यानंतर बाहेर आल्यावर आम्हाला उलट्या होतात, असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी भर सभेत केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन महायुतीत मोठा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट सत्तेतून बाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते भरत गोगावले यांनी तानाजी सावंत यांचं वक्तव्य बरोबर नसल्याचं म्हणत कान टोचले आहेत. तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावरुन महायुतीत वाद उफाळल्यानंतर त्यांनी याविषयी फार बोलणं टाळलं आहे.

तानाजी सावंत धाराशिवच्या वाशी तालुक्यातील सारोळा मांडवा येथे आले असता प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण तानाजी सावंत यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. “माझा इतर वेळ कमी असतो. मला भेटू दे लोकांना”, असं तानाजी सावंत म्हणाले. यानंतर ते पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले.

तानाजी सावंत यांचं वादग्रस्त वक्तव्य काय?

“काँग्रेस, राष्ट्रवादीचं आणि माझं कधी जमलेलं नाही. हे वास्तव आहे. कारण ते विचार परिपूर्ण अंगात भिनलेले आहेत. त्यामुळे ते शक्य आहे. आज जरी आम्ही कॅबिनेटला मागे राहून बसलो असलो तरी बाहेर जावून आम्हाला उलट्या होतात. सहन होत नाही. ते आता वयाच्या 60 व्या वर्षी माणूस बोलू शकत नाही”, असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं. याच वक्तव्यावरुन राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर आता टीका केली जात आहे.

राष्ट्रवादीच्या सुनील शेळके यांचा पलटवार

मंत्री तानाजी सावंतांना उत्तर देताना अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी चांगलाच पलटवार केला. “अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीच्या सत्तेत आल्यापासून तानाजी सावंतांच्या पोटात नेमकं काय गेलंय हे माहीत नाही. त्यांना जे बोलायचं ते बोलून घेऊ द्यात. आगामी विधानसभा निवडणुकीत कोण-कोणाच्या मांडीवर बसतं अन कोणाची गरज कोणाला आहे, हे लक्षात येईल”, असं प्रत्युत्तर सुनील शेळके यांनी दिलं.

'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ...
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ....