टँकर आणि दुचाकीचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 3 जण जागीच ठार

बुलढाण्यातल्या मेहकर तालुक्यात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

टँकर आणि दुचाकीचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 3 जण जागीच ठार
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 8:59 PM

बुलढाणा : बुलढाणा तालुक्यात टँकर आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तीनजण ठार झाले आहेत. बुलढाण्यातल्या मेहकर तालुक्यात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचा तपास करत आहेत. (tanker and two wheelers accident in buldhana 3 died on the spot)

मेहकर तालुक्यातील नागापूरजवळ विचित्र अपघात झाला असून एकाच कुटुंबातील 3 जण ठार झाले आहेत. मेहकर तालुक्यातून नागपूर – मुंबई महामार्ग जातो. या मार्गावरील नागापूर गावाजवळ दोन ट्रक आणि एम 80 मोटारसायकलचा भीषण अपघात झाला आहे. या अपघात मोटारसायकलवरील 3 जण जागीच ठार झाले आहेत. एकाच परिवारातील 3 जण जगीच ठार झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

मृतक अकोला जिल्ह्यातील पातूर इथला असून अब्दुल जब्बार अब्दुल रज्जाक (65), त्यांची पत्नी जमीला बी अब्दुल रज्जाक (58) आणि नातू म. हाशिम (12, सर्व रा. सळणीपुरा, पातूर) अशी मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. मृतक हे साखरखेरडा इथं मुलीला भेटायला जात होते. मात्र, दुदैवी मृत्यू झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून तिघांचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाती वाहनं रस्त्याच्या बाजूला करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

इतर बातम्या – 

ICICI बँकेच्या नफ्यामध्ये मोठी वाढ, कोरोनाच्या संकटातही 6 पटीनं झाला फायदा

हेल्मेट न घातल्याने पोलिसांनी फाडली 2 मीटर लांब पावती, दंडाची रक्कम पाहून हादराल

(tanker and two wheelers accident in buldhana 3 died on the spot)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.