मोठा दिलासा, इंधन टँकर चालकांचा संप मिटला, १२ जिल्ह्यांत संपाचा परिणाम
petrol diesel company truck drivers strike | राज्यातील इंधनाची वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांनी पुन्हा संप सुरु केला आहे. आठ दिवसांपूर्वी मागे घेतलेला संप पुन्हा सुरु झाल्यामुळे राज्यात इंधन टंचाई निर्माण होणार आहे. हिट अँड रन कायद्याच्या विरोधात हा संप आहे.

मनोहर शेवाळे, मनमाड, नाशिक, दि. 10 जानेवारी 2024 | हिट अँड रन कायद्याच्या विरोधात टँकर चालकांनी पुन्हा आंदोलन सुरु केले आहे. मनमाडच्या भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑइल प्रकल्पातील इंधन वाहतूक करणारे टँकर चालक मंगळवारी रात्री 12 वाजल्यापासून संपावर गेले आहे. टँकर चालकांनी पुन्हा स्टेअरिंग छोडो आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मनमाडच्या इंधन प्रकल्पात चालक फिरकलेच नाही. सकाळपासून एकही इंधन टँकर बाहेर पडला नाही. यामुळे पुन्हा पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण होणार आहे. दरम्यान संध्याकाळी टँकर चालकांचा संप मिटला. भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या पानेवाडी प्रकल्पातून टँकर मध्ये इंधन भरण्यास सुरुवात झाली आहे.
प्रशासनाच्या बैठकीत यश
टँकर चालकांनी संप पुकारल्यानंतर प्रशासनाने बैठक घेतली. या बैठकीत झालेल्या चर्चेअंती चालक कामावर रुजू झाले. तीन कंपन्याच्या प्रकल्पातून सुमारे 40 टँकरमध्ये बुधवारी संध्याकाळी इंधन भरण्यास सुरुवात झाली. सकाळपासून ट्रँकर चालक आलेच नव्हते. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये संपाचा परिणाम जाणवला.
सकाळी एकही टँकरचालक आला नाही
देशात नवीन वाहन कायदा येणार आहे. या कायद्यातील तरतुदीच्या विरोधात ट्रक, टँकर चालकांनी एक जानेवारी रोजी संप पुकारला होतो. दोन दिवस हा संप सुरु होता. त्यानंतर दोन जानेवारी रोजी मनमाड येथे जिल्हाधिकारींनी बैठक घेतली. त्यानंतर तोडगा निघाल्यावर एचपीसीएल, बीपीसीएल, इंडीयन ऑईल आणि गॅस प्लँटमधून टँकर रवाना झाले होते. परंतु आता दहा जानेवारीपासून पुन्हा संप सुरु झाला आहे. अनेक चालक आज टँकर भरण्यासाठी आले नाही. यामुळे भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑइल प्रकल्पातून उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात होणारा इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. संध्याकाळी संप मिटल्यावर टँकर भरले जाऊ लागले. दरम्यान कुठलयाही वाहतूक संघटनेने संपाची अधिकृत जबाबदारी स्वीकारली नाही.
मालेगावात ट्रक चालकाचा रस्ता रोको
हिट अँड रन कायद्याच्या विरोधात ट्रक, टँकर चालक आक्रमक झाले आहे. संतप्त चालकांनी मालेगावला मुंबई आग्रा महामार्गांवर रस्ता रोको केला. यामुळे मालेगावातील स्टार हॉटेल परिसरात वाहतूक ठप्प झाली.
महामार्गावर बेफाम धावणाऱ्या वाहनांना लागणार ब्रेक
महामार्गावर बेफाम धावणाऱ्या वाहनांना ब्रेक लावण्याची तयारी सुरु झाली आहे. मर्यादा ओलांडून वेगाने वाहन चालवणाऱ्यांना चाप लावला जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रात 187 ठिकाणी स्पीड गन इंटरसेप्टर व्हेईकल तैनात करण्यात येत आहे. 57 कोटी रुपयांचा खर्चाचा हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या स्कीम फॉर स्पेशल असिस्टंस टु स्टेट फॉर पॅपिटल इन्व्हेस्टमेंटअंतर्गत सुरु केला आहे. त्यात स्पीड गन पॅमेरा स्टेंट्रल कंट्रोल रूमला जोडला जाणार आहे. यामुळे अतिवेगाने किंवा निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या गाड्यांची माहिती कंट्रोल रूमला तत्काळ मिळणार आहे. त्यानंतर वाहन चालकांना दंड बसणार आहे.