Cyclone Tauktae Tracker LIVE Mumbai rain Updates | रायगडमध्ये 2 महिलांसह चार जणांचा मृत्यू, 5249 घरांचे नुकसान

| Updated on: May 18, 2021 | 12:00 AM

Tauktae Cyclone Latest Update : तौत्के चक्रीवादळाने (Tauktae Cyclone) महाराष्ट्रात दाणादाण उडवून दिली. चक्रीवादळामुळे मुंबईसह राज्याच्या किनारपट्टी भागात दिवसभर जोरदार पाऊस कोसळला.

Cyclone Tauktae Tracker LIVE Mumbai rain Updates | रायगडमध्ये 2 महिलांसह चार जणांचा मृत्यू, 5249 घरांचे नुकसान
Mumbai rains Cyclone Tauktae

Tauktae Cyclone Latest Update | तौत्के चक्रीवादळाने (Tauktae Cyclone) महाराष्ट्रात दाणादाण उडवून दिली. राज्यात दिवसभरात 6 नागरिकांचा मृत्यू  झाला.  चक्रीवादळामुळे मुंबईसह राज्याच्या किनारपट्टी भागात दिवसभर जोरदार पाऊस कोसळला. सध्या वादळ मुंबईपासून पुढे सरकलं आहे. हे चक्रीवादळ रात्री 8 ते 11 यादरम्यान गुजरातमध्ये धडकण्याची चिन्हं आहेत.   दर तासाला अधिक सक्रीय होणारे हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकलं आहे. कोकण किनारपट्टीला समांतर वाटचाल करत असेलल्या तौत्के चक्रीवादळानं गती घेतल्यामुळं त्याचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या राजापूर, रत्नागिरी तालुक्यातील जवळपास सगळ्या गावांना बसलाय. त्यामुळे किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 May 2021 11:27 PM (IST)

    अर्नाळ्यात मच्छीमारांचं नुकसान

    तौत्के चक्री वादळाचा सर्वाधिक फटका अर्नाळा समुद्र किनाऱ्यावरील बोटींना बसला आहे. जोरदार वारा आणि पाऊस यामुळे किनाऱ्यावर असलेल्या छोट्या बोटी वाऱ्याच्या प्रवाहात येऊन तुटून पडल्या आहेत. किनाऱ्यावरील अनेक छोट्या मोठ्या घरांवरील पत्रे तुटून पडले आहेत. छोट्या बोटींची मोडतोड झाल्याने सामान्य मच्छिमारावर उपासमारीची वेळ आली आहे. काही बोटी वाहून गेल्या आहेत तर काही बोटी तुटून पडल्या आहेत.

  • 17 May 2021 10:27 PM (IST)

    चक्रीवादळामुळे ऑनलाईन परीक्षांमध्ये व्यत्यय; राहिलेल्या परीक्षांचं वेळापत्रक नव्यानं जाहीर होणार

    चक्रीवादळामुळं आज राज्यातील विविध विद्यापीठांच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा होऊ शकल्या नाहीत, अनेक ठिकाणची इंटरनेट सेवा झाली खंडित होती. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर झाला आहे. परंतु विद्यार्थ्यांनी काळजी न करण्याचं कारण नाही, राहिलेल्या परीक्षांचं वेळापत्रक नव्यानं जाहीर करणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सामंत यांनी विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

  • 17 May 2021 10:23 PM (IST)

    ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये वीजयंत्रणेची प्रचंड हानी

    गेल्या 24 तासांमध्ये ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे मुसळधार पावसासह प्रामुख्याने रत्नागिरी व सिंधदुर्ग या जिल्ह्यातील 3 हजार 665 गावांमधील वीजयंत्रणेची प्रचंड हानी झाली आहे. यामध्ये 18 लाख 43 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला असून त्यापैकी 52 टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा आज दुपारपर्यंत पूर्ववत करण्यात आला आहे. चक्रीवादळ बाधीत उर्वरित ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा असे निर्देश देण्यात आले असून महावितरणचे 13 हजार 172 कर्मचारी दुरुस्तीची कामे अविश्रांत करीत आहेत, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली आहे.

  • 17 May 2021 08:04 PM (IST)

    रायगडमध्ये 2 महिलांसह चार जणांचा मृत्यू, 5249 घरांचे नुकसान

    तौत्के चक्रीवादळाने (Tauktae Cyclone) महाराष्ट्रात दाणादाण उडवून दिली. रायगड जिल्ह्यात दिवसभरात 2 महिलांसह 4 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 5244 घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे, तर 5 घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 500 हून अधिक वीजेचे खांब कोसळले आहेत. अलिबाग आणि मुरूड येथे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, नुकसानीचे पंचनामा करण्याचे काम उद्यापासून सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

  • 17 May 2021 07:50 PM (IST)

    ठाण्यात 63 ठिकाणी झाडं पडली

    ठाण्यात 63 ठिकाणी झाडं पडली असून 21 ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. अजूनही वेगवेगळ्या भागांमधून तक्रार येत आहे. तर संध्याकाळी काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे.

  • 17 May 2021 07:50 PM (IST)

    ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळलं

    ठाण्यातील नौपाडा भागात चालत्या चार चाकी गाडीवर झाड पडल्याने चालकाला बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी चालकाला कारमधून बाहेर काढलं आहे.

  • 17 May 2021 07:19 PM (IST)

    Mumbai rains update : मुंबईतील कुलाब्यात संध्याकाळी 5 पर्यंत 189 तर सांताक्रूझमध्ये 194 मिमी पाऊस

    संध्याकाळी 5 पर्यंत कुलाबा 189 मिमी तर सांताक्रूझ 194 मिमी पाऊस नोंद, मुंबई शहरात 105 मिमी, पश्चिम उपनगर 115 मिमी, पूर्व उपनगर 61 मिमी, मुंबई 489 ठिकाणी झाड पडण्याच्या घटना , कोणतीही जीवितहानी नाही, घर पडण्याच्या घटना 26 घटना

  • 17 May 2021 07:07 PM (IST)

    Cyclone Tauktae Live rain Navi Mumbai : एपीएमसी मार्केटमध्ये गाड्यांवर छप्पर कोसळलं

    नवी मुंबईतील एपीएमसी दाना मार्केटमध्ये गाड्यांवर छप्पर कोसळले, छप्पर कोसळल्याने गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, पाच ते सहा गाड्यांवर पत्रा पडल्याने नुकसान, यात एक वॅगनार, एमजी हेक्टर, एक्स यू व्ही 500 आणि रिक्षाचे नुकसान, चक्रीवादळाने नवी मुंबईत अनेक झाडं उन्मळून पडली

  • 17 May 2021 06:23 PM (IST)

    Cyclone Tauktae Live Maharashtra : राज्यात चक्रीवादळाचे 6 बळी, 9 जखमी, नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

    तोत्के चक्रीवादळामुळे मुंबई तसेच सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांत काही प्रमाणात नुकसान होऊन निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला तसेच चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याच्या आणि मदत कार्य वेगाने करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी झाले आहेत. एकूण १२ हजार ५०० जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. किनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये काही नुकसान व पडझड झाली असली तरी कोविड रुग्णालयांना वीज पुरवठा खंडित होऊ देण्यात आलेला नाही त्याचप्रमाणे पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था सक्षमपणे सुरु आहे याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.

  • 17 May 2021 06:11 PM (IST)

    Cyclone Tauktae Live Vasai : वसईत तौत्के चक्रीवादळाने घेतला एकाचा बळी

    वसईच्या भोयदापाडा येथे गाळ्याच्या बांधकामाचा सिमेंटचा दगड अंगावर पडल्याने कामगाराचा जाग्यावरच मृत्यू, सोसाट्याचा वारा आणि पावसात गाळ्यावरील पत्रे उडाले, वाऱ्याने सिमेंटचा दगड अंगावर पडला, यामध्ये अलबु प्रसाद यादव वय 40 या कामागाराचा मृत्यू झाला.

  • 17 May 2021 06:01 PM (IST)

    Cyclone Tauktae Tracker LIVE Gujrat : चक्रीवादळ रात्री 8 वाजता गुजरातला धडकण्याची चिन्हं

    तौत्के चक्रीवादळ सध्या मुंबईपासून 145 किलोमीटर अंतरावर, गुजरात वेरावल पासून 220 किलोमीटर अंतरावर, दीवपासून 180 किलोमीटर अंतरावर तर कराची पासून 475 पासून किलोमीटर अंतरावर, चक्रीवादळ रात्री 8 वाजता गुजरातला धडकण्याची चिन्हं

  • 17 May 2021 04:56 PM (IST)

    Cyclone Tauktae LIVE Sangli : सांगलीत 6 एकरवरील केळी बाग भुईसपाट

    तौक्ते चक्रीवादळाचा फटका सांगली जिल्ह्यालाही बसला आहे.मिरज तालुक्यातील कवलापूर या ठिकाणी सहा एकरावरील केळी बाग वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाली आहे,त्यामुळे लाखो रुपयांचा नुस्कान झालेली आहे. चक्रीवादळाचा परिणाम सांगली जिल्ह्यातही काल दुपारपासून आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू होता, दरम्यान रात्री उशिरा चक्रीवादळाचा मोठा फटका मिरज तालुक्यातल्या कवलापूर या ठिकाणी बसल्याचे पाहायला मिळालं.

  • 17 May 2021 04:42 PM (IST)

    Cyclone Tauktae Tracker LIVE Pune पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, हवामानाचा अंदाज

    पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज, पुणे जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, शिनोलीमधील भगवान बोऱ्हाडे या शेतकऱ्याचं आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान, 70 झाडांची आंब्याची बाग पूर्ण गळाली, तर खेड तालुक्यातील भिवगाव इथं अंगणवाडीवरचे पत्रे उडाले, तौक्ते चक्रीवादळाचा घाटमाथ्याला फटका बसण्याची शक्यता

  • 17 May 2021 04:01 PM (IST)

    Aditya Thackeray on Mumbai Rains : मुंबईत अभूतपूर्व वादळ, सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष : आदित्य ठाकरे

    वादळचाी दिशा गुजरातकडे आहे, वाऱ्याचा वेग प्रचंड आहे, सखल भागात पाणी साचलंय, जम्बो सेंटर्सच्या मेंटेन्सनची कामं सुरु आहेत, रात्रीपर्यंत ही परिस्थिती अशीच राहील, विनाकारण घराबाहेर पडू नका, हे वादळ आहे, मुंबईत कधीही न झालेलं वारं आपण पाहात आहोत..

    १६० मिमी पाऊस, १२० मिमी पाऊल तो ही वादळ-वाऱ्यासह होतोय, मनुष्यहानी काही होणार नाही, याची काळजी घेत आहोत, हाय टाईड आहे, ती निघून जाईल, पण त्यानंतरही खबरदारी घ्यावी लागेल.. चक्रीवादळ कधीही न पाहिलेलं मुंबई आता पाहात आहे.. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांमध्ये चर्चा झाली

    केंद्र आणि राज्यात चर्चा होते, आवश्यक सूचना दिल्या जातात, एकमेकांशी समन्वय साधून काम करत आहोत…सर्वजण मिळून काम करत आहोत…

  • 17 May 2021 03:45 PM (IST)

    किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार

    हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार, चक्रीवादळाचा प्रभाव मुंबई आणि किनारपट्टी भागावर राहणार, मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस काही ठिकाणी कोसळणार, पुढच्या 24 तासात उत्तर कोकणात पाऊस, दक्षिण कोककणात ढगाळ वातावरण असेल, मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या काही ठिकाणी पाऊस कोसळेल

  • 17 May 2021 03:39 PM (IST)

    पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा

    तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा, पंतप्रधानांकडून वादळाचा आढावा

  • 17 May 2021 03:27 PM (IST)

    Cyclone Tauktae Live Baramati : तौत्के चक्रीवादळाचा वीज यंत्रणेला मोठा फटका

    तौत्के चक्रीवादळाचा वीज यंत्रणेला मोठा फटका बसला आहे. बारामती परिमंडलात 547 वीजेचे खांब कोसळले.तर 18773 रोहित्र बंद पडल्याने 869 गावांतील काही काळ वीजपुरवठा विस्कळीत, वीज कर्मचाऱ्यांनी काही तासांतच 44 उपकेंद्र व 3 लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला.

  • 17 May 2021 02:43 PM (IST)

    Cyclone Tauktae Live Kalyan : जाहिरात फलक टेम्पोवर कोसळला, दोघे गंभीर, पत्रा कापून दोघांना बाहेर काढलं

    कल्याण शीळ रोडवर धक्कादायक प्रकार, रस्त्याच्या कडेला असणारा भलामोठा जाहिरात फलक एका टेम्पोवर पडला, गाडीतील 2 जण गंभीर जखमी, कटर मशिनने टेम्पोचा पत्रा कापून दोघांना काढले बाहेर, गंभीर असलेल्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू, डोंबिवली एमआयडीसी फायर ब्रिगेड अधिकारी नंदकुमार शेंडगे यांची माहिती.

  • 17 May 2021 02:01 PM (IST)

    Cyclone Tauktae Live Raigad : रायगडमध्ये 1 हजार घरांचे अंशत: नुकसान, 8 हजार नागरिकांचं स्थलांतर

    अलिबाग,जि.रायगड,दि.17 :- “तौक्ते” चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर जाणवू लागला. सर्वत्र सोसाट्याचा वारा आणिमुसळधार पाऊस असे चित्र दिसत आहे. या दरम्यान जिल्ह्यातील आज सकाळी 11 .00 वाजेपर्यंत झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. आतापर्यंत एकूण 23.42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील 1 हजार 104 घरांचे अंशत: नुकसान तर 1 घराचे पूर्ण नुकसान झाले आहे. एका व्यक्तीचा मृत्यू आणि दोन व्यक्ती जखमी झाल्याची नोंद झाली आहे. त्याचबरोबर एका प्राण्याचाही मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 2 हजार 299 कुटुंबांचे मिळून एकूण 8 हजार 383 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

  • 17 May 2021 01:52 PM (IST)

    Cyclone Tauktae Live Satara : तौक्ते वादळाचा साताऱ्याला फटका, अनेक घरांची पडझड

    सातारा जिल्हयातील पश्चिम भागाला तौक्ते वादळी वाऱ्याचा मोठा फटका, जिल्ह्यातील प्रतापगडसह, महाबळेश्वर, पाचगणी परिसरात तौक्ते चक्रीवादळाचा फटका, महाबळेश्वर तालुक्यात 22 घरांचे, 3 शासकीय इमारतींचे अंशतः नुकसान, तसेच 18 विद्युत पोल आणि विद्युत वाहिनीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती, वाई तालुक्यात 7 घरांचे तर एका शाळेचे, 10 विद्युत खांबांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती

  • 17 May 2021 01:47 PM (IST)

    Cyclone Tauktae Live Mumbai Gateway of India : मुंबईच्या समुद्रात भरती, 3.94 मीटरपर्यंत लाटा उसळणार

    मुंबईच्या समुद्रात दुपारी भरती, दुपारी 3 वाजून 44 मिनिटांनी समुद्राला भरती, समुद्र किनारी नागरिकांनी न जाण्याचं मुंबई महापालिकेचं आवाहन, अरबी समुद्रात उसळणार 3.94 मीटरपर्यंत लाटा

  • 17 May 2021 12:57 PM (IST)

    Cyclone Tauktae Mumbai Gateway of India : अरबी समुद्राला उधाण, गेट वे परिसरात तुफान पाऊस

    मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरातील दृश्य, तुफान पाऊस आणि तौत्के चक्रीवादळाचा परिणाम, समुद्राला उधाण, उंचच उंच लाटा आणि वाऱ्याचे प्रंचड वेग

  • 17 May 2021 12:30 PM (IST)

    Cyclone Tauktae Nashik Live : चक्रीवादळाचा नाशिकला फटका, झेडपी शाळेचं छप्पर उडालं

    तौक्ते चक्रीवादळाचा नाशिक जिल्ह्यातील हरसूल तालुक्याला फटका, सकाळी आलेल्या वादळाने जिल्हापरिषदेच्या शाळेचे छप्पर उडाले, जिल्हा परिषदेच्या सांबरखल शाळेचं मोठं नुकसान, राज्यपालांनी दौरा केलेल्या गुलाबी गावातही मोठं नुकसान

  • 17 May 2021 11:53 AM (IST)

    Cyclone Tauktae and Mumbai rain update : मुंबईत ऑरेंज अलर्ट, रायगडमध्ये रेड अलर्ट

    मुंबई वेध शाळेच्या संचालिका शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 24 तास ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. रायगडमध्ये रेड अलर्ट आहे, मुंबईत 102 किमी वेगाने वारे वाहत होतं, आज संध्याकाळपर्यंत अशीच परिस्थिती राहील, मुंबई, ठाणे, पालघर ,रायगडमध्ये 90 किमी प्रतितासाच्या वेगाने वारे वाहतील, उद्या वाऱ्याचा वेग 40 ते 50 किमी असा राहील, उद्या पाऊस हलक्या स्वरुपाचे असेल

  • 17 May 2021 11:28 AM (IST)

    Cyclone Tauktae Mumbai Mayor Kishori Pednekar : मुंबईत सर्व यंत्रणा सज्ज, सीलिंक सुरक्षतेसाठी बंद : महापौर

    मुंबईत सर्व यंत्रणा सज्ज आहे, मुंबईत चक्रीवादळाचे परिणाम दिसत आहेत, अनेक भागात झाडं पडली आहेत, जीवितहानी नाही, मुंबईकरांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, वरळी सीलिंक सुरक्षतेसाठी बंद ठेवला आहे – महापौर किशोरी पेडणेकर

  • 17 May 2021 11:17 AM (IST)

    Tauktae LIVE worli rain update : मुंबईचा वरळी केळीवाडा जलमय

    मुंबईचा वरळी केळीवाडा जलमय, समुद्राला उधाण आल्याने समुद्राचं पाणी , पावसाचं पाणी लोकांच्या घरात शिरलं, गुडगाभर पाणी भरल्याने नागरिक हैराण, दक्षिण मुंबई परिसरात तुफान पाऊस

  • 17 May 2021 11:13 AM (IST)

    CM Uddhav Thackeray on Tauktae Cyclone : मुख्यमंत्र्यांकडून सचिवांमार्फत वादळाचा आढावा

    “ताऊक्ते” (Tauktae Cyclone) चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मुख्य सचिव तसेच मदत व पुनर्वसन सचिवांकडून सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे अशी माहिती यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. आज दुपारी मुख्यमंत्री राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीतही आढावा घेणार आहेत

    रत्नागिरी जिल्ह्यातील 3 हजार 896 ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 आणि रायगड जिल्ह्यातील 8 हजार 380 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.

  • 17 May 2021 11:03 AM (IST)

    Cyclone Tauktae LIVE Raigad : तौत्के चक्रीवादळाचा रायगडला फटका, नुकसानीचा आकडा वाढता

    रायगडला ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका, रायगडमध्ये नुकसानीचा आकडा वाढत आहे. आत्तापर्यंत एकाचा मृत्यू तर दोघे जखमी, नीता रमेश नाईक वय 58 राहणार आवेडा येथील महिलेचा मृत्यू.

    एका पशूधनाचाही मृत्यू, 2263 कुटुबांतील 8383 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. मागील 24 तासात 23.42 mm पावसामुळे जिल्ह्यात मोठं नुकसान.

  • 17 May 2021 10:59 AM (IST)

    Cyclone Tauktae Tracker LIVE worli rain : वरळी कोळीवाड्यात गुडघाभर पाणी

    मुंबईतील वरळी कोळीवाड्यात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं, वरळी, प्रभादेवी, लालबाग, लोअर परळ परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस, जोरदार पावसाने वरळी कोळीवाडा परिसरात गुडघाभर पाणी

  • 17 May 2021 10:51 AM (IST)

    Tauktae Live : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्याकडून बचावकार्याचा आढावा

    राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन आणि नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.

  • 17 May 2021 10:40 AM (IST)

    Tauktae Cyclone Live update Goa : गोव्यात चक्रीवादळ थंडावले

    गोव्यात चक्रीवादळ थंडावले, पहाटेपासून पाऊस नाही, थोडा वारा, गोव्यात वादळानंतरची शांतता. तिकडे चक्रीवादळ गुजरातला १० ते ११ च्या दरम्यान पोहचेल, गुजरातकडे जाणारा वेग १६५ किमी प्रती तासाच्या जवळपास असणार, मुंबईतील एअरपोर्ट खबरदारीचा उपाय म्हणून ११ ते ३ वाजेपर्यंत बंद

  • 17 May 2021 10:37 AM (IST)

    Tauktae Cyclone Live Mumbai : मुंबईत ८० ते ९० किमी प्रति तास वादळाचा वेग

    तौक्ते वादळाची तीव्रता वाढली, मुंबईत ८० ते ९० किमी प्रति तास वादळाचा वेग, गुजरातला १० ते ११ च्या दरम्यान पोहचेल, गुजरातकडे जाणारा वेग १६५ किमी प्रती तासाच्या जवळपास असणार, मुंबईतील एअरपोर्ट खबरदारीचा उपाय म्हणून ११ ते ३ वाजेपर्यंत बंद, गुजरातमधील एअरपोर्ट देखील खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवले आहेत, महाराष्ट्रात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळाची तीव्रता असेल, इतर भागात वादळी वाऱ्यासह हलक्या सरी, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं IMD चे कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं.

  • 17 May 2021 10:14 AM (IST)

    अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर भागात सकाळपासून हलका पाऊस

    अंबरनाथ :

    अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर भागात सकाळपासून हलका पाऊस

    ढगाळ वातावरण आणि पावसाची रिमझिम सुरू

    गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झाल्यानंतर हवेत निर्माण झाला सुखद गारवा

  • 17 May 2021 10:13 AM (IST)

    रत्नागिरीत विद्युत खांब कोसळले, युद्ध पातळीवर काम सुरु

    रत्नागिरी- चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात मोठे नुकसान

    अनेक ठिकाणी विद्युत खाब कोसळले

    विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून युद्ध पातळीवर ती कामाला सुरुवात

    वादळामुळे लोखंडी पोल वाकले

  • 17 May 2021 10:11 AM (IST)

    तौक्ते चक्रीवादळाचा पहिला बळी, भिंत कोसळून महिलेचा मृत्यू

    रायगड उरण

    तौक्ते चक्रीवादळाचा जिल्ह्यातील पहिला बळी.

    उरण शहरातील बाजारपेठेत भिंत कोसळली,

    एका महिलेचा मृत्यू.

    एक भाजीविक्रेती महिला जखमी

  • 17 May 2021 10:10 AM (IST)

    पनवेल, नवी मुंबईत पावसाचा जोर वाढला, सखोल भागात पाणी साचले

    पनवेल, नवी मुंबईत पावसाचा जोर वाढला

    सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची दमदार हजेरी

    काही ठिकाणी सखोल भागात साचले पाणी

    वादळाचा धोका असल्याने आपत्ती व्यवस्थापन सज्ज

    कुठलीही जीवित तसेच वित्त हानी नाही

    अत्यावश्यक सेवेतील मंडळी छत्री रेनकोट घेऊन घराबाहेर

  • 17 May 2021 10:09 AM (IST)

    विरारमध्ये इमारतीवरील पत्रे उडाले, जीवितहानी नाही

    विरार:- विरार पश्चिम विराट नगरमधील धन्वंतरी इमारतीवरील पत्रे उडाले

    आज सकाळी 8 च्या सुमारास ची घटना

    जोरदार सुटलेल्या वाऱ्याने इमार्टिवरील पत्र्याचे शेड तुटून पडले खाली

    सकाळ ची वेळ असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र इमारतीचे नुकसान झाले आहे

  • 17 May 2021 09:49 AM (IST)

    Cyclone Tauktae Live Ambernath | अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर भागात सकाळपासून हलका पाऊस

    अंबरनाथ :

    अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर भागात सकाळपासून हलका पाऊस

    ढगाळ वातावरण आणि पावसाची रिमझिम सुरु

    गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झाल्यानंतर हवेत निर्माण झाला सुखद गारवा

  • 17 May 2021 09:35 AM (IST)

    Cyclone Tauktae Live Mumbai | पुढील तीन तासात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

    पुढील तीन तासात पाच जिल्ह्यात वादळीदळ वाऱ्यासह पाऊस

    90 ते 100 किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह अति मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

    मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

  • 17 May 2021 09:34 AM (IST)

    येत्या तीन तासात पाच जिल्ह्यात सर्तकतेचा इशारा, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

    पुढील तीन तासात पाच जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

    ९० ते १०० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह अति मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

    मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

  • 17 May 2021 09:19 AM (IST)

    Cyclone Tauktae Live Raigad | खोपोलीतील काजुवाडी येथील वस्तीमध्ये दोन घरांवर झाड पडले

    रायगड

    खोपोलीतील काजुवाडी येथील वस्तीमध्ये दोन घरांवर झाड पडले

    खोपोली नगरपालिका यत्रंणानी तात्काळ घटनास्थळ गाठले

    कटरच्या सहाय्याने झाड तोडुन बाजुला करण्याचे मदत कार्य चालु

  • 17 May 2021 09:04 AM (IST)

    Cyclone Tauktae Live Satara | साताऱ्यात रात्रभर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, पाचगणी, वाई, महाबळेश्वर परिसरात तौक्ते चक्रीवादळाचा फटका

    सातारा

    साताऱ्यात रात्रभर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

    जिल्ह्यातील पाचगणी, वाई, महाबळेश्वर परिसरात तौक्ते चक्रीवादळाचा फटका

    पाचगणी शहरात विजेचे खांब,झाडे पडल्याने पाचगणी,महाबळेश्वर परिसरात वीज पुरवठा खंडित

  • 17 May 2021 08:23 AM (IST)

    Cyclone Tauktae Live Ratnagiri | रत्नागिरीच्या किनारपट्टी भागात पावसाने उडवली दाणादाण

    रत्नागिरी- रत्नागिरीच्या किनारपट्टी भागात पावसाने उडवली दाणादाण

    मिरकरवाडा परिसरात काही गाड्यांवर ती पडली पत्र्याची शेड

    गाड्यांचा मोठे नुकसान

    किनारपट्टी भागात पावसाचा वार्‍याचा वेग कायम

  • 17 May 2021 08:20 AM (IST)

    Cyclone Tauktae Live Vasai | वसई-विरारमध्ये सुसाट वाऱ्यासह रिमझिम पाऊस

    हवामान खात्याच्या अंदाज नुसार वसई-विरारमध्ये सुसाट वाऱ्यासह रिमझिम पाऊस सुरु,

    मध्यरात्री पासूनच ढगाळ वातावरण

    सुसाट वाऱ्यामुळे विरारच्या अर्नाळा किल्ल्यामधील किनाऱ्यालगतच्या घरांचे आणि छोट्या बोटींचे किरकोळ नुकसान

    सकाळच्या वेळेत समुद्र खवळला नाही, मात्र आज दिवसभरात समुद्राला भरती येऊन चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता

    समुद्र किनाऱ्यावर महसूल, महापालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले असून किनाऱ्यावरील रहिवाशांना सतर्क राहण्याचे अहवान केले आहे

  • 17 May 2021 08:09 AM (IST)

    Cyclone Tauktae Live Raigad | मुबंई गोवा हायवे, मुबंई पुणे राष्ट्रीय मार्ग, मुबंई पुणा एक्सप्रेस वे मात्र सुरळीत

    रायगड

    मुबंई गोवा हायवे, मुबंई पुणे राष्ट्रीय मार्ग, मुबंई पुणा एक्सप्रेस वे मात्र सुरळीत.

    आत्ता पर्यत 7866 नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर.

    जिल्ह्याच्या समुद्रकिनार लगत जोरदार पाउस वारा, तर ईतर ठिकणी हलकासा पाऊस.

    रात्री उशीरा पर्यंत जिल्हाधिकारी सौ. निधी चौधरी यांनी सर्व प्रातं, तहसिलदार, जिल्हापोलीस अधीक्षक, याच्यां सोबत विडीयो काँन्फरन्सिगं द्वारे परिस्थीतीचा आढावा घेऊन नियोजन केले.

  • 17 May 2021 08:08 AM (IST)

    Cyclone Tauktae Live Nashik | नाशिक शहरासह जिल्ह्यात नस्क भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

    नाशिक – शहरासह जिल्ह्यात नस्क भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

    जिल्ह्यातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित

    ओझर परिसरात फळ भाज्यांचे नुकसान

    तर अनेक ठिकाणी कांद्याला पाणी लागल्याने, कांदा खराब

    तोकते वादळाचा नाशिक सह उत्तर महाराष्ट्राला फटका बसण्याचा अंदाज

  • 17 May 2021 07:46 AM (IST)

    Cyclone Tauktae Live Mumbai | तौत्के चक्रीवादळ मुंबईपासून 150 किमी अंतरावर, पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढणार

    तौत्के चक्रीवादळ मुंबईपासून 150 किमी अंतरावर, पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढणार, ऑरेंज अलर्ट जारी

  • 17 May 2021 07:34 AM (IST)

    Cyclone Tauktae Live Ratnagiri | मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गाला

    रत्नागिरी – मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गाला

    लांजा तालुक्यातील वाकेड इथ महामार्गावरील मोरी खचली

    मोरी खचल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा

    मुंबई गोवा महामार्गावरील वाकेड घाटातील मोरी खचल्याने एकेरी वाहतूक

    महामर्गाच्या ठेकेदारा कडून उपाययोजना नसल्याने वाहतूकदार नाराज….

  • 17 May 2021 07:29 AM (IST)

    मुंबईत 34 ठिकाणी झाड पडण्याच्या घटना, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

    मुंबईत झाड पडण्याच्या 34 घटना

    मुंबई शहर 11, पश्चिम उपनगर 17 , पूर्व उपनगरात 6

    कोणतीही जीवित हानी नाही

  • 17 May 2021 07:17 AM (IST)

    तौत्के चक्रीवादळ मुंबईपासून 150 किमी अंतरावर, मुंबईत जोरदार पाऊस

  • 17 May 2021 07:14 AM (IST)

    Cyclone Tauktae Live Raigad | रायगड जिल्ह्यात रात्रभर पाऊस आणि वारे

    रायगड

    जिल्ह्यात रात्रभर पाऊस आणि वारे

    मात्र कोणतेही नुकसान अथवा जिवीतहनी नाही

    रस्त्यावर खुप कमी प्रमाणात वाहनांची रहदारी

  • 17 May 2021 07:01 AM (IST)

    Cyclone Tauktae Live Ratnagiri | चक्रीवादळाचा परिणाम अद्यापही कोकण किनारपट्टीवर, रत्नागिरीसह सिंधुदुर्गातही तुफान पाऊस

    रत्नागिरी – चक्रीवादळाचा परिणाम अद्यापही कोकण किनारपट्टीवरती

    रत्नागिरीसह सिंधुदुर्गातही तुफान पाऊस

    रात्रभरा पासून रत्नागिरी किनारपट्टीवर ती वाटत वेगवान वारे

    ताशी 80 ते 90 किलोमीटरहून अधिक वाऱ्याचा वेग

    रात्रीपासून कोसळतोय मुसळधार पाऊस

    रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनारपट्टीवरची विज अद्यापही गायब

  • 17 May 2021 06:57 AM (IST)

    Cyclone Tauktae Live Ratnagiri | चक्रीवादळाचा फटका रत्नागिरी जिल्ह्याला, दोन्ही जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडित

    रत्नागिरी- चक्रीवादळाचा फटका रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला, दोन्ही जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडित

    रत्नागिरि राजापुर देवगड मालवण वेगुर्ले या भागातील बत्तीगुल

    काही ठिकाणी सकाळपासून तर काही ठिकाणी दुपारपासून वीज खंडित

  • 17 May 2021 06:37 AM (IST)

    Cyclone Tauktae Live Bhivandi | भिवंडी शहरात पहाटेपासून पावसाची रिमझिम

    भिवंडी –

    भिवंडी शहरात पहाटे पासून पावसाची रिमझिम संततधार सुरू ,या पावसाने रस्ते झाले ओलेचिंब

  • 17 May 2021 06:35 AM (IST)

    Cyclone Tauktae Live Raigad | तौक्ते चक्रीवादळामुळे म्हसळा येथील हमजा मस्जिद मध्ये सर्व धर्मियांनी घेतला आसरा

    रायगड – म्हसळा –

    तौक्ते चक्रीवादळामुळे म्हसळा येथील हमजा मस्जिद मध्ये सर्व धर्मियांनी घेतला आसरा

    बेलदार समाज, आदिवासी समाजासह मुस्लीम समाजातील अदांजे 170 नागरिकांना घेतला आसरा

  • 17 May 2021 06:31 AM (IST)

    Cyclone Tauktae Live Raigad | रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या 7 हजार 866 नागरिकांचे स्थलांतरण

    रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या 7 हजार 866 नागरिकांचे स्थलांतरण

    तालुका निहाय

    अलिबाग-605, पेण-193, मुरुड-1067, पनवेल-168, उरण-451, कर्जत-45, खालापूर-176, माणगाव- 1309, रोहा- 523, सुधागड-165, तळा- 135, महाड-1080, पोलादपूर- 295, म्हसळा- 496, श्रीवर्धन- 1158

  • 17 May 2021 06:28 AM (IST)

    Cyclone Tauktae Live Mumbai | मुंबईमध्ये चक्रीवादळाचा धोका टळला, समुद्र किनाऱ्यावर वाऱ्यासह रिमझिम पाऊस

    मुंबई: मुंबईच्यामध्ये चक्रीवादळाचा धोका टळलेला आहे. मात्र, येथे वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईतील वर्ली सी फेस परिसरातील समुद्र किनाऱ्यावर वाऱ्यासह रिमझिम पाऊस पाहायला मिळत आहे. मुंबईतील  काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडतोय. सोमवार मुंबईमध्ये 60 ते 70 किलोमीटर  वेगाने वारे वाहतील अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Published On - May 17,2021 11:27 PM

Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.