Tauktae Cyclone : रायगडमध्ये हायटाईडचा इशारा, हजारो घरांचं नुकसान, 8,500 नागरिक स्थलांतरित, 2 महिलांचा मृत्यू

रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर 4 मीटरपर्यंत लाटा उसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. ताशी 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहत आहेत.

Tauktae Cyclone : रायगडमध्ये हायटाईडचा इशारा, हजारो घरांचं नुकसान, 8,500 नागरिक स्थलांतरित, 2 महिलांचा मृत्यू
Cyclone Tauktae
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 3:04 PM

रायगड : तौत्के चक्रीवादळानं कोकणातील समुद्र किनाऱ्यावर अक्षरश: थैमान घातल्याचं पाहायला मिळतंय. रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेकडो झाडं कोसळली आहेत. हजारो घरांचं नुकसान झालंय. तर चक्रीवादळाच्या तडाख्यात 2 महिलांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दुपारी 4 वाजता रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर 4 मीटरपर्यंत लाटा उसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. ताशी 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे रायगडमध्ये तौत्के चक्रीवादळानं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आता समोर येत आहे. (Major damage due to cyclone in Raigad district)

उरण परिसरात एक भिंत पडून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. उरणच्या बाजारपेठेत भिंत पडल्यानं भाजी विक्री करणारी महिला निता भालचंद्र नाईक आणि सुनंदाबाई भालचंद्र घरत यांचा मृत्यू झाला आहे. तर 800 पेक्षा जास्त घरांना आणि पत्र्याच्या शेडचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. 17 ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यानं महामार्ग बंद झालेत. पडलेली झाडं बाजूला करुन रस्ते वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरु आहे. श्रीवर्धन आणि मुरुड तालुक्यात कालपासून वीज प्रवाह खंडीत झालाय. तर रोहा, महाड आणि अलिबागमध्ये काही ठिकाणी वीज प्रवाह खंडीत करण्यात आलाय.

सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यातील 12 हजार 420 नागरिकांचे स्थलांतरण

रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवरील नागरिकांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर करणयात आलंय. तीन जिल्ह्यात मिळून एकूण 12 हजार 420 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आल असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आज दुपारी मुख्यमंत्री राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीतही आढावा घेणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील 3 हजार 896 ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 आणि रायगड जिल्ह्यातील 8 हजार 380 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.

संबंधित बातम्या :

Photo Story: ‘तौक्ते’चा तडाखा, मुंबईत दोन तासात 132 झाडे पडली, सी-लिंक बंद; विमानांचे उड्डाणही थांबवले

Tauktae Cyclone in Mumbai | तौत्के चक्रीवादळ मुंबईपासून 150 किमी अंतरावर, पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढणार, ऑरेंज अलर्ट जारी

Major damage due to cyclone in Raigad district

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.