ऑनलाईन शिक्षणापासून मुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने उभारली ‘शिक्षणाची भिंत’!

शालेय अभ्यासाचे काही चार्ट, पाढे, मुळाक्षरे यांचे बोर्ड बनवून ते परिसरातील एका भिंतीला लावून ठेवले आहेत. त्यामुळे परिसरातील मुले खेळण्यासाठी त्या ठिकाणी आली तरी त्यांचा अभ्यास सुरु राहत आहे.

ऑनलाईन शिक्षणापासून मुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने उभारली 'शिक्षणाची भिंत'!
भिवंडीमध्ये इक्बाल अन्सारी या शिक्षकाने उभारली शिक्षणाची भिंत
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 7:56 PM

भिवंडी : कोरोना संकटाच्या काळात मागील वर्षीपासून जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोरोनामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्यानं विद्यार्थ्यांचं कधीही न भरुन येणारं नुकसान झालंय. पर्यायी मार्ग म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आलं. असं असलं तरी ज्या प्रमाणात शहरी भागात ऑनलाईन शिक्षणाचा पर्यात पुरक ठरला, त्या तुलनेत तो ग्रामीण भागात, शहरातील झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखीच अधिक ठरल्याचं पाहायला मिळालं. अशावेळी भिवंडी पालिका शिक्षण मंडळातील शिक्षक इक्बाल अन्सारी यांनी विद्यार्थ्यांसाठी मोहल्ल्यात भिंतीवर अभ्यासाचे चार्ट लावून शिक्षणाची भिंत उभारली आहे. (Teacher Iqbal Ansari builds education wall in Bhiwandi)

आसबीबी परिसरातील उर्दू माध्यमाची शाळा क्रमांक 62 आहे. या शाळेत इयत्ता 1ली ते 4थी मध्ये 84 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, घरची परिस्थिती गरीब, मोलमजुरी करणारे पालक, चांगला मोबाईल नाही, त्यामुळे तब्बल 50 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते. त्यातच झोपडपट्टी परिसर असल्याने शाळा बंद तर ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल नाही. अशावेळी विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी रहावी, खेळत बागडत त्यांचा अभ्यास सुरू रहावा, त्यात खंड पडू नये यासाठी एका इमारतीच्या भिंतीवर हे अभ्यासाचे चार्ट लावून शिक्षणाची भिंत उभारली आहे. यासाठी शालेय अभ्यासाचे काही चार्ट, पाढे, मुळाक्षरे यांचे बोर्ड बनवून ते परिसरातील एका भिंतीला लावून ठेवले आहेत. त्यामुळे परिसरातील मुले खेळण्यासाठी त्या ठिकाणी आली तरी त्यांचा अभ्यास सुरु राहत आहे.

विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहण्यासाठी ‘शिक्षणाची भिंत’

लॉकडाऊनच्या काळात गराजवंतांसाठी ‘नेकी की दिवार’ वंजारपट्टी भागात बनविण्यात आली होती. त्याठिकाणी अनेकांनी मदत केली होती. त्या संकल्पनेतून आपण ही शिक्षणाची भिंत उभी केली असल्याची भावना शिक्षक इकबाल अन्सारी यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे अपंग असलेले इकबाल अन्सारी यांनी पहिल्या लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांना पोस्टकार्डावर अभ्यास आणि त्यावरील प्रश्न बनवून पाठवले होते. त्याची उत्तरं विद्यार्थांनीही पोस्टकार्डावर लिहून पाठविली होती. त्यानंतर अन्सारी यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी कायम राहावी, ते शिक्षणाच्या प्रवाहात राहावेत यासाठी ही शिक्षणाची भिंत उभी केली आहे.

अनेक ठिकाणी वाढदिवस निमित्त मोठमोठाले होर्डिंग लावले जातात. मात्र शहरातील अनेक गरीब झोपडपट्टी विभागात सध्या ऑनलाईन शिक्षण न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेकांनी पुढाकार घेतल्यास शाळेतून होणारी विद्यार्थ्यांची गळती रोखण्यात सर्वानाच यश मिळेल, असंही अन्सारी यांनी म्हटलंय.

‘आम्ही खेळत असतानाही मैत्रिणींसह अभ्यास करू शकतो’

आमच्या शाळा बंद असल्याने आमचं शिक्षणही बंद पडलं होतं. घरात मोबाईल फक्त फोन करण्यापुरता आहे. त्यामुळे आम्ही सध्या शिकवणी वर्गात जात आहोत. इकबाल अन्सारी सरांनी शिक्षणाची भिंत उभी केल्याने या भागात आम्ही खेळत असताना मैत्रिणींसह अभ्यासही करू शकतो अशी प्रतिक्रिया ईकरा अन्सारी या या विद्यार्थीनीने दिलीय.

संबंधित बातम्या :

15 जुलैपासून ग्रामीण भागात शाळेची घंटा वाजणार, कोणत्या गावातील शाळा सुरु होणार?

सोलापुरात दोन वर्षांनंतर पुन्हा शाळेची घंटा वाजणार, जिल्हा परिषदेच्या 83 शाळा सुरु

Teacher Iqbal Ansari builds education wall in Bhiwandi for students

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.