धक्कादायक, नाशिकमधील शिक्षकाचे १५-२० विद्यार्थींसोबत अश्लिल चाळे, अखेर…

Nashik News | नाशिक जिल्ह्यातील एका आदिवासी एकलव्य निवासी शाळेत विद्यार्थींनीशी अश्लिल चाळे करत असल्याच्या तक्रारी आल्या. या तक्रारीनंतर विशाखा समितीने चौकशी केली. त्यात संबंधित शिक्षक आणि 2 महिला शिक्षक दोषी आढळले. त्यांचे निलंबन करण्यात आले.

धक्कादायक, नाशिकमधील शिक्षकाचे १५-२० विद्यार्थींसोबत अश्लिल चाळे, अखेर...
Follow us
| Updated on: Jan 19, 2024 | 10:55 AM

चंदन पुजाधिकारी, नाशिक, दि.19 जानेवारी 2024 | नाशिक जिल्ह्यातील एका आदिवासी शाळेत १५ ते २० विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकानेच विनयभंग केल्याची खळबळ घटना उघड झाली. या प्रकरणाच्या चौकशीत संशयित शिक्षक दोषी आढळाला. त्याच्यावर आदिवासी विभागाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली. या शिक्षकाने विद्यार्थी-गुरु यांच्या नात्याला कलंक लावत मुलींसोबत अश्लील चाळे केल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणात शाळेच्या प्राचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात संबंधित शिक्षक आणि 2 महिला शिक्षकांचे निलंबन करण्यात आले.

मुलींनी केली पालकांकडे तक्रार

नाशिक जिल्ह्यातील एका आदिवासी एकलव्य निवासी शाळेत विद्यार्थींनीशी अश्लिल चाळे करत असल्याच्या तक्रारी आल्या. हा शिक्षक विद्यार्थिनींना शिकवण्याच्या बहाण्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होतो. जवळपास १५ ते २० विद्यार्थिंनीसोबत त्याने हा प्रकार अनेकदा केला. सुरुवातीला मुलींनी या प्रकाराकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर काही मुलींनी धाडस दाखवले. त्यांनी या प्रकाराची तक्रार आपल्या पालकांकडे केली. त्यानंतर पालकांनी या प्रकरणी शाळेतील प्रशासनास जाब विचारला. शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली.

चौकशीत शिक्षकाचे प्रताप उघड

पालक आणि विद्यार्थिंनीकडून आलेल्या तक्रारीनंतर कळवण प्रकल्प कार्यालयाच्या विशाखा समितीने चौकशी सुरु केली. समितीकडून मुलींचे जबाब घेण्यात आले. या जबाबात मुलींनी संबंधित शिक्षकाने वारंवार अश्लील वर्तन केल्याचे सांगितले. शिक्षकाने कारनामे उघड झाल्यानंतर विशाखा समितीने आपला अहवाल दिला. त्यांनी प्रकल्प कार्यालयाला हा अहवाल सादर केला. त्यानंतर आदिवासी विकास उपायुक्त विनीता सोनावणे यांनी कारवाई केली. या प्रकरणात संबंधित शिक्षक आणि 2 महिला शिक्षकांचे निलंबन करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

आदिवासी विकास परिषद आक्रमक

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद या प्रकरणात आक्रमक झाली. परिषदेचे युवा प्रदेशाध्यक्ष गणेश गवळी यांनी आंदोलनाच्या इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, या प्रकरणात त्या शिक्षकावर निलंबानी केले आहे. परंतु मुलींच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर आम्ही आंदोलन करणार आहोत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.