देहूचे संत तुकाराम महाराज मंदिर उद्यापासून दर्शनासाठी बंद; पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 14 जूनला देहूत येणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे पहिल्यांदाच श्री क्षेत्र देहू नगरीत येणार असून ते 14 जूनला देहू संस्थानला भेट देणार आहेत. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या (Santshrestha Tukaram Maharaj) शिळा मंदिरांचं मोदींच्या हस्ते या ठिकाणी लोकार्पण होणार आहे. तर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी यांचे देहूत आगमन होणार असल्याने प्रशासन आणि भारतीय जनता पक्षाकडून (Bharatiya Janata Paksha) जय्यत तयारी सुरू आहे. तसेच पंतप्रधान मोदी हे येथे येणार असल्याने संत तुकाराम महाराज मंदिर हे दर्शनासाठी राहणार बंद. तर पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
देशाचे पंतप्रधान मोदी हे प्रथमच पुण्याच्या देहूनगरीत येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि भारतीय जनता पक्षाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. तसेच संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरांचं लोकार्पण सोहळ्याचे काटेकोरपणे नियोजन केले जात आहे. त्यामुळे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे मंदिर उद्यापासून दर्शनासाठी बंद ठेवल जाणार आहे. मोदी हे 14 जूनला देहूत येणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. केंद्रीय सुरक्षा पथकाने देहू संस्थांनला तशा सूचना दिल्या होत्या. त्याची अंमलबजावणी उद्यापासून केली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान पंतप्रधान मोदी हे पहिल्यांदाच येथे येत असल्याने त्यांच्यासाठी खास स्वागत तयारी करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासाठी खास तुकाराम पगडी आणि उपरणे बनविण्यात आले आहे. तर या कार्यक्रमाकडे आणि त्याच्या नियोजनाकडे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील लक्ष ठेवून आहेत. तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे वेळोवेळी आढावा घेत आहेत.