LIVE : भाविकांनी महाविकास आघाडीच्या अहंकारी सरकारला कधीही माफ करु नये : राम कदम

राज्य आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट...

LIVE : भाविकांनी महाविकास आघाडीच्या अहंकारी सरकारला कधीही माफ करु नये : राम कदम
Follow us
| Updated on: Nov 16, 2020 | 11:36 AM

मुंबई : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे तब्बल 9 महिन्यांनी आज महाराष्ट्रातील प्रत्येक मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले झाले आहेत. राज्यातील सर्वधर्मीय मंदिरे, प्रार्थनास्थळं आजपासून खुली करण्यास राज्यसरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे आजच्या मंगल दिनी प्रत्येक मंदिरात भक्तांना प्रवेश देण्यात येत आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आज भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. (temple reopen in Maharashtra today)

[svt-event title=”भाविकांनी महाविकास आघाडीच्या अहंकारी सरकारला कधीही माफ करु नये : राम कदम” date=”16/11/2020,11:33AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादच्या सुपारी मारोती मंदिरासमोर भाजपचा जल्लोष” date=”16/11/2020,11:13AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : मंदिरं उघडल्यामुळे भाजपकडून जल्लोष सुरू, औरंगाबादच्या सुपारी मारोती मंदिरासमोर भाजपचा जल्लोष सुरू, सामूहिक हनुमान चालीसा पठण करून जल्लोष, भाजपचे अनेक कार्यकर्ते मंदिरासमोर एकत्र, सुपारी मारुती मंदिर शहरातील महत्वाचं मंदिर [/svt-event]

[svt-event title=”दादर येथील स्वामी समर्थ मठ भाविकांना दर्शनासाठी खुला” date=”16/11/2020,11:11AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पाडव्याला मंदिरं पुन्हा खुली, रोहित पवार ग्रामदैवत गोदड महाराजांच्या दर्शनाला” date=”16/11/2020,11:11AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=””इम्तियाज जलील यांनी आता मंदिरात यावं आम्ही स्वागत करू”” date=”16/11/2020,10:53AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांनी आता मंदिरात यावं आम्ही स्वागत करू, खडकेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांचं इम्तियाज जलील यांना आवाहन, खडकेश्वर मंदिर उघडण्यासाठी इम्तियाज जलील यांनी केले होते प्रयत्न, खडकेश्वर मंदिर उघडण्यावरून एमआयएम आणि शिवसेनेत झाला होता राडा, आता इम्तियाज जलील मंदिरात आले तर आम्ही स्वागत करू, खडकेश्वर मंदिराचे पुजारी पद्मनाभ चौधरी यांची प्रतिक्रिया [/svt-event]

[svt-event title=”तुळजाभवानीच्या पेड दर्शन पासवर आक्षेप, पास काऊंटर बंद पाडले” date=”16/11/2020,10:49AM” class=”svt-cd-green” ] तुळजाभवानी देवीचे दर्शन पास काऊंटर बंद पाडले असून, तुळजापूर मंदिरातील पेड दर्शन पासवर पुजारी आणि भाविक यांनी आक्षेप घेतला आहे. 300 रुपये भरून ऑनलाईन पद्धतीने पेड दर्शन सुरू होते, मात्र ते पुजारी आणि भाविकांनी आक्रमक होत बंद पाडले. मोफत आणि पेड दर्शन दुजाभाव थांबविण्याची मागणी त्यांनी केली. तुळजाभवानी देवीचे रोज 4 हजार भाविकांना दर्शन देण्याची व्यवस्था केली असून सकाळी 10.30 पर्यंत जवळपास 2 हजार 500 पास वितरण केले आहेत. या भाविकांना सायंकाळी 5 नंतर दर्शनाची वेळ दिली आहे. पेड दर्शन लवकर तर मोफत दर्शनाला तासनतास लागत असल्याने पुजारी आक्रमक झाले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”अधिकाऱ्यांनी सोशल डिस्टंसिंगचा नियम मोडला – सेना खासदाराचा आरोप” date=”16/11/2020,9:06AM” class=”svt-cd-green” ] संस्थान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सोशल डिस्टन्ससिंगच्या नियमाचा भंग केला असल्याचा आरोप शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केला आहे. काकड आरतीला उपस्थित असताना नियम मोडल्याचं लोखंडे यांनी म्हटलं आहे. आरतीच्या वेळी उभे असलेला फोटो व्हायरल झाला आहे. ऑनलाईन दर्शन व्यवस्थेचाही फज्जा उडाला असल्याचा खासदारांनी आरोप केला आहे. [/svt-event]

[svt-event title=”नाशिक-त्रंबकेश्वर मंदिराबाहेर मनसेचा जल्लोष ” date=”16/11/2020,8:57AM” class=”svt-cd-green” ] त्रंबकेश्वर मंदिराबाहेर मनसेनं जल्लोष केला आहे. फटाके फोडून आणि पेढे वाटून आंनदोत्सव साजरा करण्यात आला आहे. त्रंबकेश्वर मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं झालं आहे. त्रंबकेश्वरचे पुरोहित राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते तर राज ठाकरे यांच्या पाठपुराव्यामुळे यश आल्याने मनसेने जल्लोष केला आहे. [/svt-event]

[svt-event date=”16/11/2020,8:41AM” class=”svt-cd-green” ] आजपासून विरारचे जीवदानी मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. जीवदानी मातेचा जयजयकार करीत भाविकांनी घेतले दर्शन [/svt-event]

[svt-event title=”स्वामींच्या दर्शनाने भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू” date=”16/11/2020,8:00AM” class=”svt-cd-green” ] आज अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिर उघडण्यात येणार असल्याची बातमी कळल्यानंतर पहाटेपासूनच स्वामी भक्तांनी स्वामी चरणी लीन होण्यासाठी स्वामी नगरीत पोहोचले आहे. यावेळी भक्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले. [/svt-event]

[svt-event title=”तुळजाभवानी मातेची शिवकालीन विशेष अलंकार पूजा ” date=”16/11/2020,7:57AM” class=”svt-cd-green” ] तुळजाभवानी मातेची आज पाडवानिम्मित शिवकालीन विशेष अलंकार पूजा आहे. देवीचा हा साज तब्बल 9 महिन्यांनी पाहता येणार असल्याने भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर दर्शनासाठी परिसरात मोठी गर्दी झाली आहे. [/svt-event]

[svt-event title=”प्रत्येक मंदिरातून LIVE ” date=”16/11/2020,7:24AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”12 ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचं ज्योतिर्लिंग आजपासून दर्शनासाठी खुलं” date=”16/11/2020,7:20AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद जिल्ह्यातील घृष्णेश्वर मंदिर आजपासून दर्शनासाठी खुलं करण्यात आलं आहे. घृष्णेश्वराला दुग्धभिषेक करून मंदिर भक्तांसाठी उघडं करण्यात आलं. यावेळी 10 वर्षांखालील मुलं आणि 65 वर्षांवरील नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात बाप्पाच्या दर्शनाची लगबग” date=”16/11/2020,7:09AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातही श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची गर्दी आहे. आठ महिन्यांनी आज सर्वांसाठी मंदिर खुलं होणार असल्याने आनंदाचं वातावरण आहे. [/svt-event]

[svt-event title=”आज भक्तांसाठी असणार देव दिवाळी” date=”16/11/2020,7:08AM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे मंदिर तब्बल 8 महिन्यानंतर खुलं झाल्यामुळे राज्यभरातून अनेक भाविक भल्या पहाटे तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले आहेत. पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद या ठिकाणाहून भाविक सहकुटुंब दाखल झाले आहेत. आई भवानीच्या दर्शनाची आतुरता होती ती पूर्ण झाल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली आहे. [/svt-event]

[svt-event title=”साई भक्तांमध्ये उत्साह” date=”16/11/2020,7:08AM” class=”svt-cd-green” ] साई मंदिर खुलं झाल्याने भाविकांनी पहाटपासुनच दर्शनासाठी गर्दी केली आहे. यामुळे दर्शन रांगेत भाविकांनी गर्दी दिसून येत आहे. आठ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर भाविकांना मंदिरात ‌जावून साईंबाबांचं दर्शन मिळत असल्याने भाविकांमध्ये‌ समाधानाचं वातावरण आहे. [/svt-event]

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.