धाराशिवमध्ये टेम्पो-दुचाकीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू
धाराशिवमधून मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. टेम्पो आणि दुचाकीची धडक झाली, या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे.

धाराशिवमधून मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. टेम्पो आणि दुचाकीची धडक झाली, या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. उमरगा- लातूर रोडवरील माडजपाटी जवळ हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही, मात्र वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा- लातूर रोडवरील माडजपाटी परिसरात हा अपघात झाला आहे. टेम्पो आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. टेम्पो लातूरहून उमरग्याकडे येत होता. तर मोटरसायकलस्वार लातूरकडे जात होता. याच दरम्यान हा अपघात झाला. या अपघातामध्ये एकूण तिघांचा मृत्यू झाला, मृतांमध्ये एक दुचाकीस्वार तर दोन टेम्पोमधील व्यक्तींचा समावेश आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
तिघांचा मृत्यू
या अपघातामध्ये एकूण तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दुचाकीस्वार आणि टेम्पोमधील दोघांचा समावेश आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. दिगंबर कांबळे, रा. येळी तालुका उमरगा, दीपक गणू रामपुरे रा. मंगरूळ तालुका औसा आणि आकाश सूर्यकांत रामपुरे रा. मंगरूळ तालुका औसा अशी या अपघातातील मृतांची नावं आहेत. वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असावा असा अंदाज आहे, मात्र अद्याप अपघाताचं नेमकं कारण समोर आलेलं नाहीये.
वाहनांचं नुकसान
हा अपघात इतका भीषण होता की, अपघातामध्ये दोन्ही वाहनांचा चुरडा झाला आहे. वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. मृतांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दिवसेंदिवस अपघातांच्या घटना वाढतच आहेत.