Uddhav Thackeray: ठाकरे आणि शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा, उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना थेट आव्हान, उद्धव ठाकरेंचा संताप, वाचा १२ महत्त्वाचे मुद्दे
शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना निष्ठा काय असते ते दाखवून द्यावने लागेल, असे आवाहन उद्धव यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांना केले. एकनाथ शिंदेंना आपल्याकडची दोन खाती दिल्याचंही उद्धव यांनी म्हटलं आहे. हे सगळं भाजपाने केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. त्यांच्यी अग्राहून सुटका करावीच लागेल, असा टोला त्यांनी लागवला.
मुंबई – आपलं मुख्यमंत्रीपद अमान्य असणं, ही राक्षसी महत्त्वाकांक्षा असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)थेट एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde)केली आहे. आपलीच काही माणसे शिवसेनेवर सोडण्यात आली, असे उद्धव म्हणाले. विठ्ठल आणि बडव्यांवर जे बोलयातेय त्यांचा मुलगा खासदार असल्याची टीकाही उद्धव यांनी केली आहे. शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना निष्ठा काय असते ते दाखवून द्यावने लागेल, असे आवाहन उद्धव यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांना केले. एकनाथ शिंदेंना आपल्याकडची दोन खाती दिल्याचंही उद्धव यांनी म्हटलं आहे. हे सगळं भाजपाने (BJP)केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. त्यांच्यी अग्राहून सुटका करावीच लागेल, असा टोला त्यांनी लागवला. बंडखोरांना जर तिथे भविष्य दिसत असेल तर खुशाल जा, असेही ते म्हणाले त्यांच्या या भाषणातील महत्त्वाचे १२ मुद्दे
महत्त्वाचे मुद्दे
- ठाकरे आणि शिवसेना हे नाव वापरता जगून दाखवा
- माझा फोटो न वापरता समाजात वावरुन दाखवा
- मुख्यमंत्रीपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा
- मी आजारातून बरा होऊ नये म्हणून काहीजण देव पाण्यात घालून बसले होते
- आमदारांना फूस लावून मी सत्ता नाट्य का घडवेन
- मेलो तरी सोडणार नाही म्हणणारे पळून गेले
- कोण कसं वागलं, यात मला जायचं नाही.
- जे सोडून गेले त्यांच्याबद्दल वाईट का वाटावं
- एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केलं, त्यांना नगरविकास खातंही दिलं.
- संजय राठोड यांच्यावर वाईट आरोप झाले तरी मी सांभाळले.
- झाडाची फुलं न्या, फांद्या न्या, मूळं नेऊ शकत नाही
- कोरोनामुळे डोळ्यात पाणी पण ते अश्रू नाहीत.