मुंबई: भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी ठाकरे कुटुंबीयांवर आणखी एक मोठा आरोप केला आहे. कोमो स्टॉक अँड प्रॉपर्टीज प्रा. ही कंपनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्या परिवाराने स्थापन केली आहे. आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरेही त्यात पार्टनर झाले. 23 मार्च 2014ला ही कंपनी बनवली. नंतर नंदकिशोर चतुर्वेदीची (nandkishor chaturvedi) मदत घेतली. 7 कोटी रुपये फक्त कोमो स्टॉक मार्फत ठाकरे परिवाराने मनी लॉन्ड्रिंग केलं आणि 3 सप्टेंबर 2019 रोजी नंदकिशोर चतुर्वेदीला ठाकरे परिवाराने ही कंपनी विकली. या कंपनीचे पार्टनर नंदकिशोर चतुर्वेदी यांचा या कंपनीत 56 टक्के, लुक बॅनेटिक ऑस्ट्रेलियाचा 34 टक्के आणि इतरांचा 10 टक्के हिस्सा आहे. म्हणजे ठाकरे परिवार मनी लॉन्ड्रिंग करण्यात ऑस्ट्रेलियनचीही मदत घेत आहेत. हा सर्व घोटाळा मी ईडी, इन्कम टॅक्स आणि कंपनी मंत्रालयाला पाठवला आहे, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. सोमय्या यांच्या या नव्या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.
किरीट सोमय्यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला. मी सोमावारी परत दिल्लीत जाणार आहे. मी दिल्लीत गेलो तर इथले घोटाळेबाज सक्रिय होतात. सक्रियता इथे आहे. घोटाळेबाज चिंतीत होतात. अब किसका नंबर लगेगा असं त्यांना वाटतं, असा टोलाही किरीट सोमय्या यांनी लगावला. मी तर फकिर आहे. मला जनतेनं मोठं केलं आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, सोमय्या यांनी कालही या प्रकरणावरून ठाकरे कुटुंबावर आरोप केले होते. नंदकिशोर चतुर्वेदी कुठे आहे हे आदित्य ठाकरेंना विचारा. त्यांच्याच कंपन्यात यांची गुंतवणूक आहे. अनेक कंपन्या टेक ओव्हर केल्या गेल्या आहेत. त्यांनी बहुतेक चतुर्वेदीला वर्षी किंवा मातोश्रीवर लपवलं असावं, असा टोलाही त्यांनी लगावला. कर्जतला असेलेली हिंदू देवस्थानची जमीन श्रीधर पाटणकर यांनी घेतली आहे. त्यांनी अनेक जमिनींचे घोटाळे केले आहेत, पैसे ब्लॅकचे व्हाईट केले आहेत, असंही ते म्हणाले.
माझ्यावर आरोप झाले, राकेश वाधवानशी संबंध असल्याचं सांगितलं गेलं. 7 जणांचे स्टेटमेंट रेकॉर्ड केले. कोर्टाने सांगितलंय की नील सोमय्यांविरोधात काही पुरावे नाही. तो निर्दोष आहे. सरकारनं स्वत:चं हसं करून घेतंय. जितेंद्र नवलानीचंही प्रकरण लवकरच बाहेर येणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या:
Mango : नुकसानीनंतरही फळांच्या ‘राजा’चा तोरा कायम, स्थानिक बाजारपेठेत हापूस दाखल..!
‘RRR’ first review | ‘RRR..’खतरनाक , Ram charan, Jr NTR यांचा फुल पैसा वसूल परफॉर्मन्स