फुटकळ चर्चेसाठी सरकारकडे वेळ आहे, पण मराठा आरक्षणावर चर्चा करायला वेळ नाही; मेटेंची टीका

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. (Thackeray Govt not serious on maratha reservation, vinayak mete's Blames)

फुटकळ चर्चेसाठी सरकारकडे वेळ आहे, पण मराठा आरक्षणावर चर्चा करायला वेळ नाही; मेटेंची टीका
Follow us
| Updated on: Dec 15, 2020 | 2:43 PM

मुंबई: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. या सरकारकडे फुटकळ चर्चा करण्यासाठी वेळ आहे. पण मराठा आरक्षणावर चर्चा करायला वेळ नाही, अशी घणाघाती टीका विनायक मेटे यांनी केली. (Thackeray Govt not serious on maratha reservation, vinayak mete’s Blames)

आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेत गोंधळ झाल्यानंतर सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी विधानसभेबाहेर मराठा आरक्षणावरून जोरदार घोषणाबाजी केली. विनायक मेटे तर सरकारचा निषेध म्हणून काळा शर्ट घालूनच आले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मेटे आणि दरेकर यांनी सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. विधानपरिषदेचे सर्व कामकाज थांबवून मराठा आरक्षणावर चर्चा घडवून आणावी अशी आम्ही मागणी केली होती. तसा प्रस्तावही सरकारला दिला होता. पण या मुद्द्यावर सरकारने कालही चर्चा करू दिली नाही आणि आज तर एक शब्दही काढू दिला नाही. येत्या 25 जानेवारी रोजी मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणी होणार आहे. त्याचं काय करणार आहे? सरकारने काय तयारी केलीय? याबाबतची कोणतीही माहिती द्यायला सरकार तयार नाही, असा आरोप मेटे यांनी केला.

विद्यार्थी आंदोलन दडपलं जातंय

मुंबईत आझाद मैदानात मराठा विद्यार्थी आंदोलन करत आहेत. नोकरीच्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले हे विद्यार्थी थंडीत कुडकुडत आहेत. पण त्यांची दखल घ्यायलाही हे सरकार तयार नाही. उलट त्यांचं आंदोलन दडपण्याचं काम सरकारकडून सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.

पुरवणी मागण्या मंजूर करण्याचा डाव

या सरकारला फुटकळ विषयावर चर्चा करण्यासाठी वेळ आहे. पण आरक्षणावर चर्चा करायची नाही. गोंधळ निर्माण करून पुरवण्या मागण्या मान्य करून घ्यायचा सरकारचा डाव असल्याचा आरोपही मेटे यांनी केला. (Thackeray Govt not serious on maratha reservation, vinayak mete’s Blames)

गेंड्याची कातडी असलेलं सरकार

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर मराठा आरक्षणावरून सडकून टीका केली. हे सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावरून पळ काढत असून हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, अशी टीका दरेकर यांनी केलं. आम्ही सभागृहात मराठा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला. पण आम्हाला बोलू दिले नाही. त्यामुळे आम्हाला वेलमध्ये उतरून प्रश्नाला वाचा फोडावी लागली. मराठा तरुणांच्या नियुक्तीवरून सरकारचं मौन आहे. अडीच हजार विद्यार्थी आझाद मैदानात आंदोलन करत असून त्याकडे सरकारने दुर्लक्ष केलं आहे, असं ते म्हणाले.

सरकार सामाजिक सलोखा बिघडवत आहे

या सरकारच्या संवेदना मेल्या आहेत. त्यांना मराठा आरक्षणाचं सोयरसुतक राहिलं नाही. ओबीसी आरक्षण टिकवण्याची भूमिकाही या सरकारकडे नाही, धनगर समाजाच्या विकासाकडेही त्यांचं लक्ष नाही. सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम हे सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. डिसले गुरुजींच्या अभिनंदनाचा साधा ठरावही हे सरकार आणू शकलं नाही, यावरून या सरकारची मानसिकता काय आहे हे दिसून येतं, असंही ते म्हणाले. (Thackeray Govt not serious on maratha reservation, vinayak mete’s Blames)

संबंधित बातम्या:

मोदी सरकार झिरो स्टँडर्ड; महाराष्ट्रात आणीबाणी लागू करून फडणवीसांना सत्तेत यायचेय: राऊत

मेट्रो कारशेडचा निर्णय अहंकारातून घेतल्यानेच प्रकल्प रेंगाळला; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

विधानसभेत कंगणा, अर्णव गोस्वामीवरून पुन्हा रणकंदन; हक्कभंगाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधक आमने-सामने

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.