Uddhav Thackeray VS Eknath Shinde live : आजची सुनावणी संपली, आता ‘या’ तारखेला होणार सुनावणी

| Updated on: Feb 24, 2023 | 6:03 AM

Supreme Court Hearing on MLA disqualification Live Updates : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सलग तिसऱ्या दिवशी ही सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी गेल्या दोन दिवसांपासून युक्तिवाद केला.

Uddhav Thackeray VS Eknath Shinde live : आजची सुनावणी संपली, आता 'या' तारखेला होणार सुनावणी
supreme court of indiaImage Credit source: tv9 marathi

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सलग तिसऱ्या दिवशी ही सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी गेल्या दोन दिवसांपासून युक्तिवाद केला. सिब्बल आजही युक्तिवाद करणार असल्याचं सांगितलं जात आहे. कालच्या सुनावणीवेळी गटनेत्याची निवड, प्रतोदची निवड, पक्षप्रमुखांचे अधिकार, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार आदी मुद्द्यांवर युक्तिवाद करण्यात आला. तसेच राज्यपालांच्या भूमिकेवरही बोट ठेवण्यात आलं. आज इतर मुद्द्यांवर सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 Feb 2023 03:24 PM (IST)

    सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी संपली

    पुढील सुनावणी २८ फेब्रुवारी रोजी

    ठाकरे गटाचे वकील मंगळवारी २८ फेब्रुवारी रोजी भूमिका मांडणार

    सत्तासंघर्षाच्या खटल्याची सुनावणी आता पुढील आठवड्यात

  • 23 Feb 2023 03:23 PM (IST)

    आजची सुनावणी संपली, आता मंगळवारी सुनावणी

    पुढच्या आठवड्यातही पुन्हा 3 दिवस सुनावणी होण्याची शक्यता

    या आठवड्यात तीन दिवस ठाकरे गटाच्या वकिलांनी बाजू मांडली

    आता पुढच्या आठवड्यात ही सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता

    शिंदे गटाचा युक्तिवाद पुढच्या आठवड्यात होणार

  • 23 Feb 2023 02:44 PM (IST)

    Live- लंच ब्रेकनंतर सुप्रीम कोर्टात पुन्हा युक्तिवाद सुरू

    ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद

    नबाम रबिया केसमध्ये ८ महिन्यानंतर जुनं सरकार परत आलं, तसं इथेही येऊ शकतं- सिंघवी

  • 23 Feb 2023 01:07 PM (IST)

    तुम्ही राजीनामा दिल्यानं अधिकार गमावला; सर्वोच्च न्यायालयाचं मोठं विधान

    तुम्ही बहुमत चाचणीला सामोरे गेला नाही

    तुम्ही बहुमत चाचणीला सामोरे गेला असता 39 आमदारांनी हरला असता तर आम्ही ती बहुममत चाचणी रदद्द केली असती

    तुम्ही राजीनामा दिल्यानं अधिकार गमावला. आम्ही परिस्थिती जैसे थे कशी करणार?; सरन्यायाधीशांचा सवाल

    जे झालं ते आता आम्ही बदलू शकत नाही, अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद

  • 23 Feb 2023 12:41 PM (IST)

    सिब्बल यांचे मुद्दे अभिषेक मनु सिंघवी यांनी नेले पुढे

    कपिल सिब्बल यांनी थेट राज्यपालांचे अधिकार आणि भूमिकेवरच बोट ठेवलं होते

    ठाकरे गटाकडून सिंघवी यांचा युक्तीवाद सुरु

    सिब्बल यांचे मुद्दे अभिषेक मनु सिंघवी यांनी पुढे नेले

    राज्यपालांनी नैतिकता पाळायला हवी होती- सिंघवी

  • 23 Feb 2023 12:06 PM (IST)

    अपात्रतेचा मुद्दा निकाली लागल्यावरच राज्यपालांनी बहुमत चाचणीचा निर्णय घ्यायला हवा होता : कपिल सिब्बल

    राज्यपालांनी घेतलेली बहुमत चाचणी चुकीची आहे

    आमच्याकडे अजूनही बहुमत आहे

    भाजपचं संख्याबळ फक्त 106 आहे. शिंदे फडणवीसांकडे 127 जणांचं बहुमत नाही

    मला वाटलं म्हणून मी असं केलं. असं राज्यपाल म्हणू शकत नाही.

    राज्यपाल आणि अध्यक्षांकडून सर्व दस्ताऐवज मागवा

    ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद

  • 23 Feb 2023 12:05 PM (IST)

    भाजपने दिलेला शपथविधी चुकीचा ठरल्यास सरकार जाईल; कपिल सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद

    राज्यपालांनी सर्व गोष्टी मंत्रिमंडळाला विचारून करायला हव्यात

    राज्यपालांनी विद्यमान सरकारला नियम डावलून शपथ दिली

    राज्यपालांनी अपात्रतेची नोटीस असलेल्या आमदारांना वगळून बहुमत चाचणी घेणं अपेक्षित होतं

    राज्यपाल स्वत:हून बहुमत चाचणीसाठी विनंती करू शकत नाही

    एखादा गट राज्यपालांकडे जाणं गरजेचं असतं

    आजवर इतिहासात कोणत्याही राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी कुणलााही बोलावलं नाही

    ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद

  • 23 Feb 2023 12:03 PM (IST)

    चालू असलेलं सरकार राज्यपालांनी मुद्दाम पाडलं, कपिल सिब्बल यांचा दावा

    सत्तास्थापनेवेळी राज्यपालांची भूमिका संशायस्पद होती

    राज्यपालांनी अधिकाराचा गैरवापर केला

    शिवसेनेचं सरकार असताना शिवसेनेचे काही आमदार सरकार कसं पाडू शकतात?

    शिवसेनेचे आमदार अविश्वास प्रस्ताव कसा आणू शकतात?

    कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तीवाद

  • 23 Feb 2023 12:01 PM (IST)

    सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाची जोरदार सुनावणी

    नवी दिल्ली : राज्यपाल यांनी मोठ्या पक्षाला आधी विचारायला हवं होतं – सिब्बल,

    सिब्बल हे कोर्टाची दिशाभूल करत असल्याचा आक्षेप जेठमलानी यांनी घेतला आहे,

    सगळ्यात मोठ्या पक्षाला राज्यपाल यांनी बोलवायला हवं होतं – सिब्बल,

    गोगावले यांची केलेली प्रतोद म्हणून निवड योग्य आहे का ? – सिब्बल,

    ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद सुरू.

  • 23 Feb 2023 11:53 AM (IST)

    सिब्बल यांच्या युक्तीवादावर जेठमलानी यांचा आक्षेप

    सिब्बल यांचा युक्तीवादावर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी आक्षेप घेतला

    कपिल सिब्बल कोर्टाची दिशाभूल करत आहे- जेठमलानी

    राज्यपालांकडे अविश्वास प्रस्ताव व बहुमत चाचणी यांची पत्र होती

    राज्यपालांची कार्य, भूमिका यावर युक्तीवाद सुरु आहे

  • 23 Feb 2023 11:25 AM (IST)

    सलग तिसऱ्या दिवशी कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद

    सलग तिसऱ्या दिवशी कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद

    राज्यपाल स्वत:हून बहुमत चाचणीसाठी विनंती करु शकत नाही- सिब्बल

    एखादा गट राज्यपालांकडे जाणे गरजेचे असते

    राज्यपालांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला

  • 23 Feb 2023 10:52 AM (IST)

    थोड्याच वेळात सत्तसंघर्षाच्या सुनावणीला सुरुवात होणार

    नवी दिल्ली : ठाकरे गटाकडून अभिषेक मनूसिंघवी आणि देवदत्त कामत हे युक्तिवाद करणार,

    खासदार अनिल देसाई यांच्यासह वकिल सुप्रीम कोर्टात दाखल,

    सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज तिसरा दिवस.

  • 23 Feb 2023 10:22 AM (IST)

    मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित : अनिल देसाई

    शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र करावं

    आज अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत युक्तिवाद करणार

    विद्यमान विधानसभा अध्यक्षांची निवड बेकायदेशीर

  • 23 Feb 2023 10:17 AM (IST)

    समता पार्टी आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

    मशाल चिन्ह आम्हालाच मिळावं यासाठी याचिका दाखल करणार

    ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिल्यानंतर समता पार्टीचा आक्षेप

    आज सकाळी 11 वाजता समता पार्टी याचिका दाखल करणार

  • 23 Feb 2023 10:16 AM (IST)

    राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी थोड्याच वेळात, आज कोणते युक्तिवाद होणार?

    सलग तिसऱ्या दिवशी राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी होणार आहे

    ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आज सलग तिसऱ्या दिवशी युक्तिवाद करण्याची शक्यता

    सिब्बल आज कोणते मुद्दे मांडणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष

Published On - Feb 23,2023 10:09 AM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.