Lockdown Extension | ठाणे, कल्याण-डोंबिवलीत 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन, काय सुरु, काय बंद?

ठाण्यात सर्व हॉटस्पॉटमध्ये अत्यंत प्रभावी लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार आहे. (Thane KDMC Lockdown Extension Guidelines)

Lockdown Extension | ठाणे, कल्याण-डोंबिवलीत 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन, काय सुरु, काय बंद?
Follow us
| Updated on: Jul 01, 2020 | 12:23 AM

ठाणे : मुंबईनंतर आता ठाणे, कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे, कल्याण डोंबिवलीत लॉकडाऊन करण्यात आला आहे. यानुसार 2 जुलैपासून 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात येणार आहे. तसेच सर्व हॉटस्पॉटमध्ये अत्यंत प्रभावी लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार आहे. (Thane KDMC Lockdown Extension Guidelines)

कोरोनाच्या साखळीला तोडण्यासाठी हा लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनाबाबत पालिका प्रशासनाने नियमावली जारी केली आहे.

ठाणे, कल्याण डोंबिवलीत काय सुरु, काय बंद?

1) आकर्षक आणि नाशवंत वस्तूंच्या ने-आण करण्याशिवाय इतर आणि सर्व कारणांकरिता महापालिका हद्दीत लॉकडाऊन लागू असेल.

2) इंटरसिटी एमएसआरटीसी बसेस आणि मेट्रो सह सर्व सार्वजनिक परिवहन सेवांना परवानगी नाही .

3) टॅक्सी, ऑटो रिक्षा यांना परवानगी नाही. मात्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा घेण्यासाठी देण्यासाठी प्रवाशांच्या वाहतुकीस परवानगी असेल. या ऑर्डरअंतर्गत ड्रायव्हरशिवाय केवळ एका प्रवाशाचा खाजगी वाहनांना परवानगी असलेल्या जीवनाश्यक वस्तू आरोग्य सेवा आणि या अंतर्गत मान्य कृतीकरिता परवानगी असेल.

4) सर्व आंतरराज्य बस आणि प्रवासी वाहतूक सेवांचे (खाजगी वाहनांसह) तसेच खाजगी ऑपरेटरकडून कामकाज बंद असेल. तर बाहेरून येऊन बाहेर जाणाऱ्या वाहनांना परवानगी असेल.

5) ज्या प्रत्येक व्यक्तीला घरात वेगळे ठेवणे आवश्यक आहे त्यांनी त्यांचे सक्त पालन केले पाहिजे. नाहीतर तो/ ती कठोर दंडात्मक कारवाईसाठी जबाबदार असेल. त्या व्यक्तीला महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये स्थलांतरित केले जाईल.

6) सर्व रहिवासी घरीच राहतील. सामाजिक परवानगीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. केवळ परवानगी असलेल्या कामासाठी बाहेर येतील.

7) सार्वजनिक ठिकाणी आकर्षक बाबीच्या खरेदीसाठी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध आहे.

8) व्यावसायिक आस्थापना कार्यालय आणि कारखाने, कार्यशाळा, गोदाम इत्यादींसह सर्व दुकानांनी त्यांचे कामकाज बंद ठेवावे.

9) सतत प्रक्रिया आणि फार्मासयुटीकल्स इत्यादी आवश्यक असलेल्या उत्पादन आणि उत्पादक युनिटला परवानगी असेल .

10) डाळ व तांदूळ गिरणी खाद्य आणि संबंधित उद्योग दुग्धशाळा खाद्य व चारा इत्यादींचा आवश्यक वस्तूंच्या उत्पादनांत गुंतलेल्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालवण्यास परवानगी असेल.

11) सरकारी कार्यालये या कालावधीत कमीत कमी कर्मचाऱ्यांचा ऑपरेट करण्याची परवानगी असेल. चेक काऊंटरजवळ एकमेकांपासून तीन फूट अंतर ठेवणे बंधनकारक, आवारात योग्य स्वच्छता आणि सॅनिटायझर हात धुण्याच्या सुविधांची उपलब्धता गरजेची

12) वस्तू आवश्यक वस्तू आणि सेवा प्रदान करणाऱ्या खालील दुकाने आस्थापना वरील प्रतिबंधा बँका एटीएम विमा आणि संबंधित बाबी, आयटी आणि आयपीएस टेलिकॉम टपाल इंटरनेट आणि डेटा सेवांना वगळण्यात आले आहे.

मिरा-भाईंदरमध्येही लॉकडाऊन

मिरा भाईंदर महानगरपालिकेत पुन्हा 1 जुलै ते 10 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. यात केवळ घरपोच सुविधा देणाऱ्या विक्रेत्यांना वेळेची मर्यादा घालून परवानगी देण्यात आली आहे. मिरा भाईंदर शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. (Thane KDMC Lockdown Extension Guidelines)

संबंधित बातम्या : 

Thane Lockdown Extension | ठाण्यात 2 जुलैपासून 10 दिवस कडक लॉकडाऊन

Maharashtra Corona Update | राज्यात 4,787 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 74 हजार 761 वर

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.