ठाण्यात बर्ड फ्लूचा शिरकाव, 3 पाणबगळे आणि 1 पोपट बर्ड फ्लू पॉझिटिव्ह, प्रशासन सतर्क

नागरिकांनी मृत पक्ष्यांची माहिती मिळताच तात्काळ नियत्रंण कक्षाला कळविण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे (Thane Municipal Corporation starts Control Room on Bird Flu).

ठाण्यात बर्ड फ्लूचा शिरकाव, 3 पाणबगळे आणि 1 पोपट बर्ड फ्लू पॉझिटिव्ह, प्रशासन सतर्क
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 4:54 PM

ठाणे : भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवलेल्या नमुन्यांचा प्राथमिक निकाल समोर आला आहे. यामध्ये ठाण्यातील 3 पाणबगळे आणि 1 पोपट बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आल्याचे अहवालात  स्पष्ट झाले आहे. याबाबत अद्याप मात्र ठाणे महापालिकेकडे याचा अहवाल आला नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेच्यावतीने बर्ड फ्लूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये तसेच नागरिकांना योग्य माहिती मिळावी यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. नागरिकांनी मृत पक्ष्यांची माहिती मिळताच तात्काळ नियत्रंण कक्षाला कळविण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे (Thane Municipal Corporation starts Control Room on Bird Flu).

देशात काही राज्यांमध्ये बर्ड फ्लूची साथ आली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने सतर्कतेचा उपाय म्हणून नियंत्रण कक्ष निर्माण केला आहे. या साथीमुळे नागरिकांनी घाबरून न जाता मृत झालेल्या पक्ष्यांची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षास देण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्त यांनी केले आहे. ठाणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या निगरानीखाली हा नियंत्रण स्थापन करण्यात आला आहे. नागरिकांनी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष येथील टोल फ़्री -1800 222 108 तसेच 022 -25371010 या हेल्पलाईनवर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे (Thane Municipal Corporation starts Control Room on Bird Flu).

पाहा आखाडा, दररोज दु. 4 वा टीव्ही 9 मराठीवर

दरम्यान, राज्यातील परभणीसह मुंबई, ठाणे, रत्नागिरीतील दापोली आणि बीडमध्ये बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. बीड आणि परभणीतील मुरुंबा गावात कोंबड्याचा मृत्यू झाला होता. भोपाळच्या प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाल्याचं स्पष्ट झालं आहे. रत्नागिरीतील दापोली आणि मुंबईतील चेंबूरमधील कावळ्यांचा आणि ठाण्यातील पोपटांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूनेच झाल्याचंही प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालात नमूद केलं आहे. त्यामुळे प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले असून राज्य शासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

80 हजार कोंबड्या मारणार

परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावातील 800 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोंबड्या दगावल्याने स्थानिक प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेऊन या कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्यात या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूनेच झाल्याचं निदान करण्यात आलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून जिल्हा प्रशासनाने मुरुंबा गावातील एक किलोमीटर परिसरातील दहा हजार कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. आज संध्याकाळपर्यंत या दहा हजार कोंबड्या मारून जेसीबीने खड्डा खोदून त्यात या कोंबड्या गाडण्यात येणार आहे.

हेही वाचा :Bird Flu | मुंबईकर बर्ड फ्लूने धास्तावले, ग्राहकांअभावी अंड्यांचे दर घसरले Eggs Rate Drop (tv9marathi.com)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.