चर्चा तर होणारच! बर्थ डे आहे शहेनशहाचा, जल्लोष साऱ्या गावाचा, ठाण्यातील व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल
पाळीव प्राण्यांचा सांभाळ करत असतांना त्यांच्या बद्दलचा एक लळा निर्माण झालेला असतो. त्यामुळे कुटुंबातील एक सदस्य म्हणूनच सर्वजण त्याला आपलं मानत असतात. त्याचा प्रत्यय अलीकडे येऊ लागला आहे.
ठाणे : आपल्याकडे हौसेला मोल नसतं असं म्हंटलं जातं. त्यासाठी वाट्टेल ते करून हौस पूर्ण करणारे आपल्याकडे कमी नाहीत. आणि हे खरं करून दाखवलं आहे डोंबिवली मोठा या गावातील तरुणाने. आपल्या शहेनशहा नावाच्या बैलाचा मोठ्या धूमधडक्यात वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. अलीकडच्या काळात अनेक शेतकरी आपल्या बैलाचा वाढदिवस ( Bull Birthday ) साजरा करतांना दिसून येत आहे. कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपणाऱ्या जनावरांचा वाढदिवस साजरा केल्याने जोरदार चर्चा होत असते. अशीच चर्चा किरण म्हात्रे यांनी केलेल्या शहेनशहा’ नामक बैलाच्या वाढदिवसाची होऊ लागली आहे. सोशल मिडियावर या वाढदिवसाचे व्हिडिओ व्हायरल होत आहे.
वाढदिवस म्हटला की, केक आणि जल्लोष हे ओघाने आलेच! पण अगदी मित्रच नव्हे तर कुटुंबातील सदस्याप्रमाणे डोंबिवली मोठा गावात किरण म्हात्रे नावाच्या तरुणाने आपल्या ‘शहेनशहा’ नामक बैलाच्या वाढदिवसा केक कापून मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला.
एवढ्यावरच न थांबता कुटुंबातील सदस्यांचा वाढदिवस साजरा करतो, त्याप्रमाणे सजावट करून शहेनशहाच्या वाढदिवसानिमित्त म्हात्रे यांनी ऑर्केस्ट्रा सह जंगी पार्टीचे आयोजन केले होते .बर्थडे निमित्त शहेनशाह ला देखील सजवण्यात आलं होतं.
शेकडो ग्रामस्थ आपल्या लाडक्या शहेनशहाच्या वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. म्हात्रे कुटुंबीयांनी शहेनशहाला केक भरवूनन आनंद साजरा केला. शहेनशहा सोबत सेलिब्रिटी प्रमाणे सेल्फी घेताना आलेल्या पाहुण्यांची एकच गर्दी उसळली होती.
शहेनशाच्या वाढदिवसाच्या जल्लोषाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. प्राण्यांवर असलेले प्रेम यावेळेला म्हात्रे कुटुंबाचे दिसल्याने सोशल मिडियावर त्यांचे कौतुक होत आहे. या वाढदिवसाला उपस्थित असलेल्या नागरिकांनी फोटो व्हिडिओ काढून सोशल मिडियावर शेयर केले आहे.
पाळीव प्राण्यांचा सांभाळ करत असतांना त्यांच्या बद्दलचा एक लळा निर्माण झालेला असतो. त्यामुळे कुटुंबातील एक सदस्य म्हणूनच सर्वजण त्याला आपलं मानत असतात. त्यामुळे अगदी आठवणीने त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची पद्धत अलीकडे रुजू लागली आहे.
यापूर्वी असे अनेक वाढदिवस ठिकठिकाणी साजरे झाले आहे. बैलजोडीचा वाढदिवस साजरा झाला आहे. बैलाच्या वाढदिवसानिमित्त शहरात बॅनर झळकले आहे. बैलाचा केक कापून पार्टी दिली गेली आहे. असे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले गेल्याने त्याची जोरदार चर्चा यापूर्वीही झाली आहे.
तशीच काहीशी चर्चा डोंबिवली मोठा येथील किरण म्हात्रे यांनी केलेले सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरत असून सोशल मिडियावर बैलाचा वाढदिवसाची चर्चा होऊ लागली आहे.