Property Tax : उल्हासनगरात मालमत्ता कराचे 193 चेक बाऊन्स, महापालिकेकडून थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात

पालिकेच्या दरबारी मात्र या करबुडव्यांनी कर भरलेला असल्याची नोंद होते. त्यामुळं असे प्रकार महापालिकेनं शोधले असता तब्बल 193 जणांनी अशाप्रकारे चेक बाऊन्स केल्याचं समोर आलं. या सर्वांना 15 दिवसांची अंतिम नोटीस देण्यात आली असून त्यानंतर त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. आतापर्यंत अशा दोन करबुडव्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Property Tax : उल्हासनगरात मालमत्ता कराचे 193 चेक बाऊन्स, महापालिकेकडून थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात
उल्हासनगरात मालमत्ता कराचे 193 चेक बाऊन्स
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 5:40 PM

उल्हासनगर : उल्हासनगरात मालमत्ता करा (Property Tax)चे चेक बाऊन्स (Check Bounce) करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया महापालिकेनं सुरू केली आहे. यंदा तब्बल 193 जणांनी चेक बाऊन्स केले असून त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया महापालिकेनं सुरू केलीय. उल्हासनगर महापालिकेत मालमत्ता कराची तब्बल 450 कोटी रुपयांची थकबाकी आहे. महापालिकेनं मध्यंतरीच्या काळात करबुडव्यांच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. यानंतर या करबुडव्यांनी महापालिकेला चुना लावण्याचा एक नवा फंडा शोधलाय. मालमत्ता कराच्या रकमेचा पालिकेत चेक देऊन कर भरल्याची पावती हे करबुडवे घेतात. मात्र प्रत्यक्षात बँकेत बॅलन्सच नसल्यानं हे चेक बाऊन्स होतात. (193 check bounce of property tax in Ulhasnagar, The Municipal Corporation has started filing cases directly)

करबुडव्यांना 15 दिवसांची नोटीस

पालिकेच्या दरबारी मात्र या करबुडव्यांनी कर भरलेला असल्याची नोंद होते. त्यामुळं असे प्रकार महापालिकेनं शोधले असता तब्बल 193 जणांनी अशाप्रकारे चेक बाऊन्स केल्याचं समोर आलं. या सर्वांना 15 दिवसांची अंतिम नोटीस देण्यात आली असून त्यानंतर त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. आतापर्यंत अशा दोन करबुडव्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आणखी 3 ते 4 जणांवर लवकरच गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती कर विभागाच्या प्रमुख आणि उल्हासनगर महापालिकेच्या उपायुक्त प्रियांका राजपूत यांनी दिली आहे. त्यामुळे आता तरी हे करबुडवे मालमत्ता कर भरतात का? हे पाहावं लागणार आहे.

भंडार्ली येथील कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या प्रकल्पास नागरिकांची सहमती

ठाणे महापालिकेच्यावतीने भंडार्ली येथे कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणारा तात्पुरता प्रकल्प उभा करण्यात येत असून या प्रकल्पांस स्थानिक नागरिकांनी सहमती दर्शविली आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाणार असून 14 गावांच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. भंडार्ली येथे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पासंबंधी महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघर्ष समिती समवेत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आज प्रकल्पाबाबत सविस्तर सकारात्मक चर्चा झाली आहे. (193 check bounce of property tax in Ulhasnagar, The Municipal Corporation has started filing cases directly)

इतर बातम्या

Ambernath Shiv Temple : महाशिवरात्रीला अंबरनाथचं शिवमंदिर खुलं ठेवा, भाजपनं राज्यपालांची भेट घेत केली मागणी

Ravindra Chavan : विकासकामांवरुन आमदार रविंद्र चव्हाण यांची खासदार श्रीकांत शिंदेंवर टीका

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.