३० घरांचं गाव, २० विद्यार्थी झाले डॉक्टर; असंही एक डॉक्टरांचं गाव

कोण्या गावात धानाचे उत्पादन जास्त घेतले जाते. तर कोण्यात गावात सैनिकांत जाण्याचं प्रमाण जास्त आहे. असंच एक छोटसं गाव आहे. तेही फक्त ३० घरांचं.

३० घरांचं गाव, २० विद्यार्थी झाले डॉक्टर; असंही एक डॉक्टरांचं गाव
Follow us
| Updated on: Aug 15, 2023 | 4:31 PM

ठाणे : राज्यात सुमारे २७ हजार गावं आहेत. यापैकी काही गावं ही वेगवेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहेत. कोण्या गावात आंबेचे उत्पादन जास्त घेतले जाते. कोण्या गावात धानाचे उत्पादन जास्त घेतले जाते. तर कोण्यात गावात सैनिकांत जाण्याचं प्रमाण जास्त आहे. असंच एक छोटसं गाव आहे. तेही फक्त ३० घरांचं पण, या गावाचं वैशिष्ट्ये म्हणजे २० जण डॉक्टर्स झालेत. त्यामुळे या गावाला आता डॉक्टरांचं गाव अशं म्हटलं जात आहे. आजपर्यंत सैनिकांचे गाव, अधिकाऱ्यांचे गाव आपण पाहिलीत. मात्र कल्याणमधील घारीवली गावाने डॉक्टरांचे गाव, अशी ओळख निर्माण केली आहे. या गावात २५ ते ३० घरे आहेत. गावातील बहुतांश कुटुंब शेती आणि इतर व्यवसाय करत उपजीविका भागवतात. मात्र शिक्षणाचे महत्व ओळखून ग्रामस्थांनी मुला-मुलींना उच्च दर्जाचे शिक्षण दिले. परिणामी या गावात २० विद्यार्थी वैद्यकीय पदव्या मिळवून डॉक्टर झाले आहेत. ग्रामस्थांनी या मुलाचे कौतुक म्हणून गावाच्या प्रवेशद्वारावरच डॉक्टरांचे गाव असा फलक लावला आहे.

घारीवली गावाचा आदर्श

आगरी समाज म्हटले की पदवीपर्यंतचे शिक्षण मुल कसेबसे पूर्ण करतात. हाताच्या बोटावर मोजण्याइतपत मुले उच्च शिक्षण घेतात. घारीवली गावातील मुलांनी मात्र एक वेगळाच आदर्श सर्व समाजापुढे निर्माण केला आहे. त्यांच्या कामाची पोचपावती आणि इतरांना त्यातून प्रेरणा मिळत आहे.

गावाच्या सीमेवर डॉक्टर्सची नावं

गावकऱ्यांनी मुलांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाचा फलक गावाच्या वेशीवर लावला आहे. सातारा, पुणे या भागात काही अशी गावे आहेत की त्या गावातील प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती हा लष्करात असतो. त्यामुळे सैनिकांचे गाव, जवानांचे गाव अशी ओळख त्या गावांना पडते.

वैद्यकीय सेवेत कार्यरत

ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवलीमधील 27 गावांतील घारीवली गावानेही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या गावातील मुलांनी शिक्षणात प्रगती करत वैद्यकीय शिक्षण घेतले. राज्यातील नकाशावर गावाची डॉक्टरांचे गाव अशी ओळख करुन दिली आहे. गावातील 20 जणांनी डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केले. आज ते वैद्यकीय क्षेत्रात सुविधा देत आहेत. मुलांच्या या कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.