Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambernath: अंबरनाथ शहरासाठी एमएमआरडीकडून 214 कोटी तर नगरविकास विभागाकडून 42 कोटी रुपये मंजूर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंची माहिती

गेल्या काही वर्षात अंबरनाथ शहराची लोकसंख्या झपाट्यानं वाढली असून त्यामुळे शहरात नागरी सुविधा उपलब्ध करून देणं सुद्धा गरजेचं बनलं आहे. याच अनुषंगानं अंबरनाथ शहरातील विकासकामांसाठी भरीव विकासनिधी मिळावा, अशी मागणी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए आणि नगरविकास विभागाकडे केली होती.

Ambernath: अंबरनाथ शहरासाठी एमएमआरडीकडून 214 कोटी तर नगरविकास विभागाकडून 42 कोटी रुपये मंजूर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंची माहिती
रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 12:00 AM

अंबरनाथ : अंबरनाथ शहरासाठी एमएमआरडीएनं तब्बल 214 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तर नगरविकास विभागानं 42 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज अंबरनाथमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अंबरनाथ शहराला मुंबईजवळ असलेली मोबाईल सिटी म्हणून संबोधलं जातं. कारण मुंबईत जाणारे बहुतांशी नोकरदार हे अंबरनाथ शहरात वास्तव्याला आहेत.

अंबरनाथ शहरात लोकसंख्या झपाट्याने वाढतेय

गेल्या काही वर्षात अंबरनाथ शहराची लोकसंख्या झपाट्यानं वाढली असून त्यामुळे शहरात नागरी सुविधा उपलब्ध करून देणं सुद्धा गरजेचं बनलं आहे. याच अनुषंगानं अंबरनाथ शहरातील विकासकामांसाठी भरीव विकासनिधी मिळावा, अशी मागणी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए आणि नगरविकास विभागाकडे केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर एमएमआरडीएनं अंबरनाथ शहरासाठी 214 कोटी रुपये मंजूर केले आहेत. तर नगरविकास विभागानं 42 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

रस्ते, सॅटिस प्रकल्प आणि दोन उड्डाणपूल उभारणे ही प्रमुख कामं केली जाणार

या निधीतून अंबरनाथ शहरातील चार प्रमुख रस्त्यांसह 12 अंतर्गत रस्ते, रेल्वे स्थानक परिसरात ठाण्याच्या धर्तीवर सॅटिस प्रकल्प उभारणे, मोरिवली आणि एएमपी गेट परिसरात पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारे दोन नवीन उड्डाणपूल उभारणे ही प्रमुख कामं केली जाणार आहेत. यापैकी 11 रस्त्यांना तांत्रिक मंजुरी सुद्धा मिळाली असून त्यांची निविदा प्रक्रिया येत्या काही दिवसात पूर्ण केली जाणार आहे. या सगळ्याबाबत आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी इतका भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारचे आभार मानले. (214 crore from MMRD and Rs. 42 crore from Urban Development Department for Ambernath city)

इतर बातम्या

Dombivali Crime : डोंबिवलीतील ‘त्या’ बेकायदा इमारतीवर केडीएमसीचा हातोडा, 40 कुटुंब बेघर

Ulhasnagar: सहकाऱ्यांच्या जामिनासाठी आला, अन पोलिसांना सापडला, उल्हासनगरच्या चालिया साहेब मंदिरातील चोरीचा उलगडा

..याची माहिती CM यांना आहे का?, बीड हत्या प्रकरणावरून दमानियांची टीका
..याची माहिती CM यांना आहे का?, बीड हत्या प्रकरणावरून दमानियांची टीका.
गोऱ्हेंना अंधारेंची कायदेशीर नोटीस, ठाकरेंबद्दलचं 'ते' भाष्य करण भोवलं
गोऱ्हेंना अंधारेंची कायदेशीर नोटीस, ठाकरेंबद्दलचं 'ते' भाष्य करण भोवलं.
त्र्यंबकेश्वरमधील वादावर प्राजक्ता स्पष्ट म्हणाली, मनातले किंतू परंतू
त्र्यंबकेश्वरमधील वादावर प्राजक्ता स्पष्ट म्हणाली, मनातले किंतू परंतू.
देख तूनी बायको.. गाण्यावर थिरकले महसूलचे अधिकारी; वडेट्टीवारांचा संताप
देख तूनी बायको.. गाण्यावर थिरकले महसूलचे अधिकारी; वडेट्टीवारांचा संताप.
धंगेकर पक्षप्रवेशावर स्पष्टच म्हणाले, 'निर्णय घ्यायचा की नाही ते...'
धंगेकर पक्षप्रवेशावर स्पष्टच म्हणाले, 'निर्णय घ्यायचा की नाही ते...'.
'..माझ्यावर दबाव होता', कोल्हेंचा 'स्वराज्यरक्षक संभाजी'बाबत मोठा दावा
'..माझ्यावर दबाव होता', कोल्हेंचा 'स्वराज्यरक्षक संभाजी'बाबत मोठा दावा.
'पण ब्राम्हणांची औकात...', इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांना धमकी
'पण ब्राम्हणांची औकात...', इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांना धमकी.
गोऱ्हेंच्या वक्तव्यानं शिवसेनेत नाराजीचा सूर?आता पक्षाची भूमिका काय?
गोऱ्हेंच्या वक्तव्यानं शिवसेनेत नाराजीचा सूर?आता पक्षाची भूमिका काय?.
राऊतांचा फोटो थेट रेड्याच्या गळ्यात, शिवसेनेचं कुठं अनोखं आंदोलन?
राऊतांचा फोटो थेट रेड्याच्या गळ्यात, शिवसेनेचं कुठं अनोखं आंदोलन?.
त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध, पोलिसात पत्र
त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध, पोलिसात पत्र.