thane hospital death : शिवाजी रुग्णालयात आठवड्याभरात किती रुग्ण दगावले? 29 की 22?; मनसेचा सनसनाटी दावा काय?
आमचा रुग्ण दवाखान्यात दाखल होता. त्याच्यावर नीट उपचार होत नव्हते. त्यामुळे आम्ही डिस्चार्ज मागितला. पण दिला नाही. उर्मट भाषेचा वापर केला गेला.
ठाणे | 13 ऑगस्ट 2023 : कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्री 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच याच रुग्णालयात पाच रुग्ण दगावले होते. त्यामुळे गेल्या आठवडाभरातील रुग्णांच्या दगावण्याची संख्या 22 वर गेली आहे. मात्र, मनसेने रुग्णांच्या मृत्यूबाबत वेगळंच विधान केलं आहे. त्यामुळे आणखीनच खळबळ उडाली आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना नवा दावा केला आहे. त्यामुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.
मनसे नेते अविनाश जाधव यांच्या मते छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कालच्या रात्रीत 17 रुग्ण दगावले. त्याआधी 7 रुग्ण दगावले होते. त्याच्या आधी 5 रुग्ण दगावले आहेत. जाधव यांच्या दाव्यानुसार आठवड्याभरात या रुग्णालयात 29 रुग्ण दगावल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रुग्णांच्या मृत्यूवर जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच रुग्ण दगावत असतील तर आम्हाला अशा मुख्यमंत्र्यांची गरज नाही. रुग्ण दगावल्यानंतर आम्ही आंदोलन केलं होतं. तेव्हा मनसेकडून आम्हाला धोका असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं होतं. पण सरकारने तेव्हाच आमचं ऐकलं असतं तर आज एवढे रुग्ण दगावले नसते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता तरी नाकर्त्यांना काढून टाकलं पाहिजे. नाही तर रुग्णालयात मृतांचं तांडव वाढत जाईल, अशी भीतीही अविनाश जाधव यांनी व्यक्त केली.
रुग्णालय म्हणजे बकासुराचं पोट
शिवाजी रुग्णालयात रात्री 10.30 वाजल्यापासून ते आज सकाळी 8.30 वाजेपर्यंत एकूण 17 रुग्ण दगावले आहेत. मृतांमध्ये 12 रुग्ण आयसीयूतील आहेत. तर चार रुग्ण हे जनरल वॉर्डातील आहेत. मृतांमध्ये लहान मुल, स्त्रिया आणि 80 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. एका मुलाने रॉकेल घेतलं होतं. त्यामुळे त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याचं या मुलाच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. कळवा रुग्णालय बकासुराचं पोट झालं आहे. रुग्णांना गिळलं जात आहे, अशी संतप्त प्रतिक्रियाही रुग्णालयातील नातेवाईकांनी म्हटलं आहे.
इन्शूलीन अखेरपर्यंत दिलंच नाही
आमचा रुग्ण दवाखान्यात दाखल होता. त्याच्यावर नीट उपचार होत नव्हते. त्यामुळे आम्ही डिस्चार्ज मागितला. पण दिला नाही. उर्मट भाषेचा वापर केला गेला. आमच्या रुग्णावर काय उपचार सुरू आहेत याची माहिती विचारली. पेशंट दगावला पण माहिती दिली नाही. रुग्णालाय मधूमेह होता. त्याला इन्शुलीनची गरज होती. त्याला आयसीयूत ठेवलं होतं. पेपरवर इन्शुलीन दिल्याचं दाखवलं. पण प्रत्यक्षात इन्शुलीन दिलंच नाही. पेशंटला साधं जेवणही देऊ देत नव्हते. आम्हाला हाकलून लावलं जात होतं, असा आरोप रुग्णाच्या एका नातेवाईकाने केला आहे.
माझा भाऊ गेला, पण…
माझा भाऊ गेला. त्याला डेंग्यू झाला होता. त्याला इंटरनेल ब्लिडिंग झालं होतं. तो गंभीर होता. पण माझी तक्रार नाही. तो मिळाला असता तर आता फाईट केली असती, असं कल्याणहून आलेल्या एका महिलेने सांगितलं.