तर अनर्थ घडला असता… 3 हजार किलो थाई फिश जप्त; हा मासा खाल्ल्याने होतो जीवघेणा आजार
भारत सरकारने बंदी घातलेल्या थाई फिशची ठाण्यात शेती सुरु असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ही माहिती मिळताच पोलीस आणि मत्स्य विभागाने त्यावर तात्काळ कारवाई केली.
ठाणे : ठाणे मत्स्य विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. एका अवैध मासे उत्पादन फार्मवर मत्स्य विभागाने छापा टाकला आहे. या छाप्यात विभागाने एक दोन नव्हे तर तीन हजार किलो थाई फिश जप्त केल्या आहेत. या थाई फिश भारतात बॅन आहेत. या थाई फिशमुळे कॅन्सर पसरतो. त्यामुळे त्याच्या उत्पादनावर बंदी आहे. तरीही या फिशची शेती सुरू होती. मत्स्य विभागाने वेळीच कारवाई केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. बाजारात हे मासे विक्रीला आले असते किंवा बे मासे छुप्या पद्धतीने विकले असते तर अनेक जण कॅन्सरच्या विळख्यात आले असते. त्यामुळे वेळीच झालेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.
ठाण्यात थाई फिशची शेती केली जात असल्याची कुणकुण ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना मिळाली होती. तशी तक्रारच त्यांच्याकडे आली होती. पडघा येथील एका तलावात हे मत्स्यउत्पादन होत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांना समजलं होतं. जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत फिशरी कमिश्नरला त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर फिशरी डिपार्टमेंटचे अधिकारी आणि पोलिसांच्या टीमने पडघा येथील या फॉर्महाऊसवर धाड मारून ही कारवाई केली. या ठिकाणी पोलीस आणि फिशरी डिपार्टमेंटला थाई फिशचं उत्पादन करणारे अनेक स्पॉट सापडल्याचं सांगितलं जात आहे.
तलाव जाळून टाकले
ज्या ज्या तलावात अवैधरित्या थाई फिशचं उत्पादन केलं जात होतं, ते सर्व तलाव पोलिसांनी जाळून टाकले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या मत्स्य उत्पादनाचा मास्टर माइंड बंगाली व्यक्ती आहे. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. ही थाई फिश खाल्ल्यानंतर कॅनन्सरचा धोका अनेक पटीने वाढतो. त्यामुळे भारत सरकारने या माश्यांच्या विक्रीस बंद घातली आहे.
तीन वर्षापूर्वीच बंदी
भारत सरकारने 2000 मध्ये म्हणजे तीन वर्षापूर्वीच या थाई फिशच्या विक्रीवर बंदी घातली आहे. हा मासा खाल्ल्याने कॅन्सरचा धोका कित्येक पटीने असतो. हा मासा मांसाहारी असतो. सडलेलं मांस खालल्ल्याने या माशाचा विकास झटपट होतो. तीन महिन्यातच या माशाचं वजन दोन ते 10 किलो वाढतं. या माश्यांची शेती केल्यास स्थानिकांवरही परिणाम होतो. जल पर्यावरण आणि जन आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो.
या थाई मांगूर माश्यामध्ये 80 टक्के लेड आणि आयरन असतं. या शामध्ये हेवी मेटल्स आढळतात. म्हणजे आरसेनिक, कॅडमियम, क्रोमियम, मरक्युरी, लेड आढळते. त्यामुळे हा मासा खाल्ल्यास अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. या माश्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होतात. न्यूरोलॉजिकल, यूरोलॉजिकल, यकृताशी संबंधित समस्या, पोट आणि प्रजनाशी संबंधित समस्याही निर्माण होतात.